आला पाऊस
आला पाऊस
आला पाऊस भरून
आला मृद्गंध वारा
झाली सळसळ पाने
झाला वारा ही भरारा
काळी मातीही डोलते
तुझ्या येण्याच्या चाहुली
बळीराजा सुखावला
काळी नटेल माऊली
वाट सरींची पाहते
आर्त तृषार्त धरणी
स्पर्श तुषार भिजाया
स्पर्शातूर ही अवनी
नभ बरसू दे आता
दाह तप्त करी शांत
युगायुगाची प्रतीक्षा
जशी शमते क्षणात

