STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational Others

2  

Latika Choudhary

Inspirational Others

आकाश नाचले

आकाश नाचले

1 min
2.7K


आकाश नाचले देता भेट सागराशी

 वाऱ्यास टोकले घेता घाव वादळाशी

 कोपेल वादळा तो,जाणून घे मनाला

 आत्ताच भेटूनी गेली नाव ती तळाशी

 सारी खुली व्यथांची दारे सताड माझी

 त्या बंद होत गेल्या भेटीच प्राक्तनाशी

 हा पाश भावनांचा बांधीत रक्तनाती

 आतूर भेट देण्या गर्भारल्या घनाशी

 वैराण वाळवंटी पेरीन बीज आता

 धावेल वेल हिर्वी ती भेटण्या नभाशी

 रक्तात वाहते चपला,तप्त खड्ग हाती

 (सैराट आज झाले,खेटेन कातळाशी)

 सैराट भेट झाली, खेटेन कातळाशी

 वैशाख या धरेची हिर्वळ गिळून घेई

 आले पराग भेटी आजन्म श्रावणाशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational