STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Classics

4  

🤩ऋचा lyrics

Classics

आजी

आजी

1 min
347

सहावारी, कपाळी मोठा सूर्य

उंचीपूरी गोरी गोमटी

आज नसली आजी, सोबती

तरी तिचा गन्ध अवती भोवती


होती आजी माझी गोष्टींचं पुस्तक

 ती सुविचारांची खाणच होती

आजी मला सगळ्यात प्रिय

 हृदयाच्या जवळ होती...


मैत्रीणच होती माझी

जिला मी सगळं सांगायचे

माझं मन मी तिच्यासमोर

सम्पूर्ण मोकळं करायचे...


आज नाही ती माझ्यासोबत

परंतु आमच्या गप्पा मला आठवतात

वाऱ्याच्या झुळकेतून भेटते मला ती

अन माझ्या डोळ्याच्या कडा पाणावतात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics