STORYMIRROR

ANIL SHINDE

Inspirational

3  

ANIL SHINDE

Inspirational

आईची माया

आईची माया

1 min
197

का गेलीस आई

सोडून तू मला 


का गेलीस आई सोडून तू मला 

रडता रडता डोळे झाले ओले

कोण पुसेल माझे अश्रूचे थेंब सारे


तुझी प्रतिमा दिसलीस जेव्हा 

प्रेमात पडलो मी तुझ्या

गायीच्या वासराला बघून 

ध्यान येते ग तुझे मला 


न कोणीच शिकवलं मला 

न कोणीच लावल वळण 

पाटीच्या लेखानिकडे बघून

आठवते आई तू मला 


तहानेने व्याकुळ झाला जीव

जग सारे सुने वाटे मला 

भाकरीच्या ताटाकडे बघितल्यावर

आठवते आई तू मला 


एखाद्याला एखाद्याची 

आई हाक मारते 

त्याच क्षणी मी थबकतो 

आणि आठवते आई तू मला 


मला सोडून जाण्याच्या अगोदर 

थोडा पण विचार केला नाही 

तुला जगायचच नव्हत तर

 मला जन्म घेण्याच्या अगोदर 

घोटून का टाकले नाही

😔😔😔😔😔😔😔


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational