आई
आई
आई देवानी बनवलेली सगळयात सुंदर कलाकृती
आई वात्सल्याची मूर्ती
आई जीला कधी ही नाही येत आळस
आई अंगणातली पवित्र तुळस
आई आपल्या मुलांच्या सुखातच आपला सुुख मानणारी
आई मनातलं दुःख कधी ही ओठावर न आणनारी
आई जिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसु असतं
आई काटा जरी मुलाच्या पायाला रुतला तरी घाव मात्र तिच्याच काळजाला होतं
आई कधी मोठे मोठे डोळे करुन रागवते
आई तितक्याच प्रेमाने हृदयाशी ही कवठाळते
आई क्षणात खूप कठोर असते
आई क्षणात तितकीच हळवी असते
आई मुळेच घराला घरपण असते
आई मुळेच मुलांच स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते
