STORYMIRROR

Pandit Warade

Classics Inspirational Others

3  

Pandit Warade

Classics Inspirational Others

आई तुझे थोरपण

आई तुझे थोरपण

1 min
166

नुसत्या तुझ्या असण्याने

घर जणू गोकुळ बनते

तुला पाहता सकलांच्या

मुखावर हास्य  फुलते


तुझ्या वाचून या घराची

अवकळा काय सांगावी

घराचे  घरपण जाऊन

गोठ्याची अवस्था यावी


प्रेम  सरिता वात्सल्याची

निर्मळ गंगा झरते अशी

अविश्रांत तू झिजते आहे

अखंड जळते ज्योत जशी


तुझा रांगडा हात फिरतो

जेव्हा माझ्या पाठीवरती

फिकी वाटते मला तेव्हा

स्वर्गीच्या सुखाची महती


संस्काराची खाण माऊली

प्रत्येकाच्या नशिबी यावी

प्रत्येकाने सांज सकाळी

माऊलीची  महती गावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics