STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

आई म्हणजे माय

आई म्हणजे माय

1 min
210

आई म्हणजे माय असते

ममता तिची वेडी असते

पण ती कोणाला कळत नसते

तिच्यापासून कोणी दुर झालं

तरी ती कोणालाही सोडत नाही

तिला काहीही बोला काहीही म्हणा ती कोणालाच तोडत नाही

कारण......!

सर्वांना जोडून ठेवण्याची तिला गोडी असते 

म्हणून आई ची ममता वेडी असते


आई म्हणजे घराची छाया

आई म्हणजे प्रेमळ माया

आई म्हणजे प्रेमाची घागर

म्हणून तिच प्रेम सरत नाही

आई म्हणजे दयेचा सागर

म्हणून तिच्याशिवाय

जगण्याला अर्थ उरत नाही


सर्वच तिला जवळ हवे असतात

कोणालाही ती दुर जावू देत नाही

कोणी कसही वागल

तरी ती उपाशी कोणाला ठेवत नाही 


ती सर्वांची कळकळीने काळजी घेत असते

घरात कोणी दिसले नाही की पोटतिडकीने वाट पहात असते


डोळे भरून पाहिल्याशिवाय

पापणी तिची लवत नाही

डोक्यावरुन हात फिरवताना

मुका घेतल्याशिवाय

तिच मनं भरत नाही


आई नाही तर

घराला घरपणच नसते

नातीगोती कुटुंब तिला

तिर्थयात्रा असते

म्हणून आई असली की

घर मंदिरासारखे दिसते

आ...ई... म्हणताच

काळजाला कसं पाझर फुटतं असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational