STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

आई जाते मी

आई जाते मी

1 min
337

आई जाते मी

येते म्हणायला लावू नकोस

माझ्या चिंतेत बाहुली घेवून 

उभी राहू नकोस


मला माहीत आहे

तू हातात बाहुली घेवून 

दारात उभी राहतेस

सारख सारख घरात बाहेर करतेस

तुझ्या जिवाची घालमेल

कोणाला बघवत नाही

मी घरी आल्याशिवाय 

तू उंबरठा सोडत नाही


मी तुझी लाडकी मुलगी आहे म्हणून

तुला भिती वाटते

घर सोडताना मला डोळेभरून बघतेस

पण तुला सांगुका आई

ज्यांच्या मुली घरी आल्याच नाही त्या आईंच काय?

ती आई आजही बाहुली घेवून दारात उभी आहे

लेक घरी येण्याची वाट बघते आहे


तुला सांगु का

कितीही मान खाली घालून निघाले ना

तरी हजार नजरा अंगभर फिरत असतात

पाहून डोळे तृप्त करून घेताना दिसतात

रोज कितीतरी अपशब्दांचा मारा असतो

छेडायला प्रत्येक चौकात एक एक ऊभा दिसतो


मार्ग कितीही बदलवला 

तरी नजर बदलत नसते

त्यांच्या नजरेला

त्यांची आई बहिण 

का दिसत नसते

कोण किती चांगला

किती वाईट

काहीच कळत नाही

 कोणाचीही नजर 

नरमेने झुकतं नाही


या पुरूषप्रधान देशात

स्त्री खरच बाहुली आहे

तिला कधी नाचवले जाते

तर कधी बंधनाच्या पिंजऱ्यात

बंदिस्त असते

तिने फक्त घाबरून जगायच असतं

माणसाच्या गर्दीत 

जळून मरायच असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational