Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational

3  

Neha Ranalkar

Inspirational

आई असते स्त्री

आई असते स्त्री

1 min
244


आईचं अस्तित्व समजून

घेण्यासाठी घे ना स्री जन्म |

तेव्हाच कळेल तुला तिचे

आजवरचे भोग आजन्म | |१| |


किती दिव्यातून येते ती जन्मा

गर्भात चुकूनच कधी वाचली तर | 

स्रीच्या नशिबात असते क्वचितच

कन्याजन्म स्वागत करणारे घर | |२| |


आईचं अस्तित्व टिकविण्यासाठी 

तिलाच करावा लागेल संघर्ष |

पुरुषी अहंकार,जाचाला तोंड

देऊनच करु पहातेय ती उत्कर्ष | |३| |


तिचं अस्तित्व तिलाच तरी कुठे

होते पुर्णपणे जराही उमगलेले ?

शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर स्री

होती कळसुत्र बाहुलं बनवलेलं‌ | |४| |


आई सुज्ञ होऊन जपू पहातेय

तिची अस्मिता अस्तित्व टिकवून |

शिकून स्वतःच शिकवतेय मुलींना

नकारात्मक अंधश्रद्धांना मिटवून | |५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational