प्रवास
प्रवास
त्या
प्रवसाची सुरुवात
अगदी
साधीच असते
क्षितिज खुणावत जाते
पावलाना ओढत राहते
पाहता पाहता
कलत जाते ऊन
अन सरकत जातात सावल्या
वळ्णावळणाने
कधीतरी
पोहोचतोच आपण
अगदी अरुण्द
अशा टोकावर;
जिथे सरकणे म्हणजे सम्पणे
आणि
मागे फ़िरावे तर
मागचे सरेच रस्ते बण्द
आता तोल सावरत
उभे राहणे
एवढाच असतो पर्याय
जो असतो
म्रुत्यु इतकाच जीवघेणा.!!
