आगमन पावसाचे
आगमन पावसाचे
उन्हाचे झाले रुपांतर सावलीत
उष्णतेचे झाले गारव्यात परिवर्तन
कळलेच नाही कसे अचानक
पावसाने घेतले भूईचे चुंबन ||
लागली होती चाहूल त्याची
पण वाटले पडेल कधीतरी
येउन दिला सुखद धक्का
सामावून त्यात भिजले मी पुरी ||
ओल्या मातीचा पसरला दरवळ
अलगद पानांनी छेडले फुलांना
कळला इशारा फुलांना देखील
येणार बहर कोमेजल्या कळ्यांना ||
तळी साठली नदीही खुलली
संपली प्रतिक्षा शेतकऱ्यांची
शेतात लागली रोपे कुजबुजू
आली वेळ आपली बहरण्याची ||
चहूकडे हिरवळ पसरे मखमली
फुलपाखरे रंग उधळती
स्वागत करती एकजुटीने
पावसाच्या आगमनाने नाती बहरती ||