Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Priti Dabade

Classics


4  

Priti Dabade

Classics


आधुनिक स्त्री

आधुनिक स्त्री

1 min 188 1 min 188

कामात नारी

खूप चपळ

उगीचच नाही 

काढत पळ


वावरते जगात

ती आत्मविश्वासाने

नाती जपते

बोलून प्रेमाने


आव्हानांना सामोरी 

जाते धैर्याने

समस्या सोडवते

मोठ्या चातुर्याने


नृत्य करते

स्पर्धांमध्ये उतरते

सिद्ध करण्याचा

प्रयत्न करते


तंत्रज्ञान लगेच

अवगत करते

गप्पागोष्टीत क्षणभर

मन रमवते


कुठेच पडत

नाही कमी

पूर्ततेची देते

नेहमीच हमी


आकाशात घेते

उत्तुंग भरारी

किमया संशोधनातही

दाखवते न्यारी


आसवांनी डोळे

पाणावले जरी

खंबीरपणे लढते

शेवटपर्यंत तरी


सारं करतांना

घेते मेहनत

सांभाळताना होते

तारेवरची कसरत


Rate this content
Log in

More marathi poem from Priti Dabade

Similar marathi poem from Classics