आधार
आधार
आपण आलात
खूप बरं वाटलं,
गळाभेट झाल्यानं
मन भरून आलं.
आपल्या येण्यानं
नवचैतन्य निर्माण झालं,
पाठीवर हात ठेवताच
जीवन सार्थकी लागलं.
आधार दिल्यानं
जगण्याला नवी दिशा मिळाली,
चार शब्द बोलल्यानं
सारी दुःख दूर झाली.
कळत नकळतच
विचारांची देवाणघेवाण झाली,
तुमच्यातील सकारात्मकता
आमच्यात परिवर्तीत केली.
