आधार !
आधार !
तू आहेस म्हणून ,
जगावंसं वाटतं..
कधीतरी खुदकन ,
हसावसं वाटतं..
तू जणू माझ्या ,
जीवनाचा शिल्पकार..
तुझ्यासाठी पुनःपुन्हा ,
घडावंसं वाटतं..
तुझ्यामुळे मिळाली ,
जगण्याची आशा..
भरकटल्या मनाला,
एक नवी दिशा..
तू जणू काळोखात ,
मिणमिणता दिवा..
निराश गर्तेतल्या ,
आशेचा काजवा...
तू असा अनामिक ,
आहेस तरी कोण ?
ज्याची जीवाला ,
लागली रे ओढ..
तूच आहे जणू ,
सर्वस्व माझे..
फक्त तुझ्यासाठीच ,
जगावंसं वाटतं !