आडोशे ( प्रेम कविता)
आडोशे ( प्रेम कविता)
भेटीचे ते गुपीत आडोशे
तुझ्या माझ्या सवयीचे
ओठ अधीर ओठांसाठी
गरम उसासे मिठीचे ...
धडधड वाढते तुझी माझी
जवळ येता दोघे जेव्हा
फुलं सोडती सुगंध ताजा
पक्षी फक्त जागे जेव्हा
हात हाती गच्च गच्च
विळखा अतुट कमरेचा
आडोशाला संकोच कसला
लाज, हया शरमेचा

