Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Abstract

3  

AnjalI Butley

Abstract

आभासी सहप्रवासी

आभासी सहप्रवासी

2 mins
122


प्रवास कसा कुठे केला, त्याच्या आठवणी आज तो मनात घोळत होता. एका ठीकाणी शांत बसणे त्याच्या रक्तातच नव्हते. सतत बाहेर फिरणे. कधी कामासाठी तर कधी आवड म्हणून. 

प्रवास करतांना कधी सार्वजनिक वाहन, तर कधी स्वतःचे वाहन! 

प्रवासाच्या आवडीमुळे अनेक मित्र मैत्रिणी झाल्या त्याच्या, बायको पण ह्या प्रवास आवडीच्या गटातील एका प्रवासात भेटली.. हो मला प्रवास करतांना आशा भेटली व माझा प्रवास सुकर झाला! अविनाश हसत हसत आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या बायकोची ओळख करुन देतांना सांगायचा! 


आशा व अविनाश दोघेही खूप भटकंती करायचे.. घरी खूप कमी असायचे. एका प्रवासासाठी ठीकाण निवडणे, तेथे काय काय पहायचे, काय खायचे, कोणाला भेटायचे हे ते महिनाभर आधीच ठरवायचे. ठरवले तसेच प्रत्यक्ष घडेल असे नाही हे माहित असल्यामुळे प्लॅन बी तयार... अगदी प्लॅन झेड पर्यंत!! 

आज असाच छोटा तीन दिवसांचा प्रवास करण्यास आशा व अविनाश आपल्या स्कूटरवरून निघाले.. 

कसे जाणार, प्रवासाची माहिती त्यांनी आपल्या सामाज माध्यमातून म्हणजेच फेसबुकवर, व्हॉट्स अॅप स्टेटस, मेसेजद्वारे आपल्या मित्र मैत्रिणींना वेळोवेळी देत राहिले..त्यामुळे त्यांच्या प्रवासात आभासी सहप्रवासी म्हणून त्यांचे बरेच मित्र मैत्रिणी जोडल्या गेल्या.. 

जसे काही आपणच प्रवास करत आहो करत ते आशा व अविनाशला सूचना देत, हे खा, ते खा, हे पहा, ते पहा, यांना भेट, त्यांना भेट वैगेरे ...

आशा व अविनाश आपल्या ह्या आभासी सहप्रवाश्यांना आपल्या प्रवासात मानाचे स्थान देत! 

प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचे फोटो समाज माध्यमावर टाकले जात असे.. 

त्यात काही मित्र मैत्रिणी असूया असलेलेपण होते, उघड नाही पण कधी एखादाच कॉमेंट असे करायचे की इतरांना कळायचेपण नाही पण आशा व अविनाशला त्यांचा खोचकपणे समजायचा.. 

दोघेही अशा मित्रमैत्रिंणींकडे दुर्लक्ष करायचे! 

तीन दिवसांचा छोटा प्रवास संपवुन आशा व अविनाश घराजवळ पोहचले तेंव्हा त्यांचा छोटा अपघात झाला, स्कूटरचे नुकसान होऊ नये म्हणून आशा व अविनाशने पायाने आधार देत  स्कूटर जमिनीवर पडू दिली नाही. पण ह्यात दोघांच्याही पायाला दुखापत झाली.. 

दोघांनाही कॉलनीतील लोक ओळखत असल्यामुळे पटकन मदतीचे हात पुढे आले.. डॉक्टरांना दाखवणे वैगरे, डॉक्टरांनी तपासुन पाय मुरगळला असल्यामुळे औषधे दिली.. पायाला प्लॅस्टर लावले गेले.. त्यांना भेटायला बरेच मित्रमैत्रिणी आल्या.. त्यात एक-दोन जण असूयेवाल्यापण होत्या... बरे झाले आता तुम्ही काही दिवस आराम करणार घरी... नेहमी आम्ही तुमचे आभासी सहप्रवासी होतो आता पुढच्या आठवड्यात आम्ही केसरी टूर्स सोबत पंधरा दिवसांची युरोप टूर करणार आहोत तर तुम्ही त्यात आभासी सहप्रवासी म्हणून सहभागी व्हा आत!! 

आशा व अविनाश दोघेही फक्त गालात हसले!!

आभासी सहप्रवासी होणार... तुम्हाला शुभेच्छा प्रवासासाठी देत आशा व अविनाशने वेळ निभावून नेली! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract