STORYMIRROR

Shalini Wagh

Inspirational

4  

Shalini Wagh

Inspirational

आभास

आभास

1 min
898

सगळ्यांना कधी कधी होतात हे भास,

कधी सुखाचा, तर कधी दुःखाचा ध्यास.

कधी स्वतःच्या मनाचा अट्टाहास,

तर कधी केलेल्या प्रयत्नांचा विश्वास,

शांत मनाची हालचाल यास म्हणतात आभास.||१||


एखाद्या गोष्टीने मनाची केलेली छेडछाड,

आपलेपणाचा दुरावा ,तर दुसऱ्यांच्या आपलेपणा.

माणसाच्या मनात सतत होणारा खेळ.

मनाचा शरीराशी नसणारा ताळमेळ,

यास म्हणतात आभासा चा खेळ.||२||


उडणाऱ्या पक्षाप्रमाणे उंच जाणं,

माणसाला माणसापासून दूर करणं,

तर कधी जवळ आणणं,

त्यात खऱ्या प्रेमाचा विश्वास,

यालाच म्हणतात आभास.||३||


हे खेळ प्रत्येकाच्या जीवनात घडतात,

मनातल्या भावना व्यक्त करतात.

आभासाचा खेळ खेळता खेळता,

संपूर्ण जीवन मात्र सरून जाते

आभासाचे खेळ सुरूच राहतात.

सत्य परिस्थिती मात्र वेगळी असते,

पण आभास हे सतत होतच असतात.||४||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational