STORYMIRROR

Shubhankar Malekar

Fantasy Inspirational

3  

Shubhankar Malekar

Fantasy Inspirational

गैरसमज...

गैरसमज...

2 mins
425

     गैरसमजातून आपल्या आयुष्यात खुप काही घडू शकते. उदा, आपली जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब जाऊ शकते, आपली चुकीची व्यक्तिरेखा कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकते, आपण बरोबर असताना देखील चुकीचे समजले जाऊ शकतो इ. म्हणून आपल्या आयुष्यात कोणाबद्दलही गैरसमज नसावेत.असाच गैरसमज माझ्याबद्दल माझ्या एका मैत्रिणीच्या मनात निर्माण झाला होता.

 

        आम्ही कॉलेजला असताना चांगले मित्र होतो. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध नव्हते.ती एक हुशार आणि शांत मुलगी होती.आम्ही दोघेही एकाच वर्गात होतो. आमच्या वर्गातला एक मुलगा तिच्या वर प्रेम करायचं. पण हे तिला माहिती नव्हते.ती नेहमी माझ्यासोबत असायची. हे त्या मुलाला आवडायचे नाही. त्याने मला खूप वेळा धमकावले की, "तू तिच्यापासून लांब राहा."मी ही त्याला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला की,आमच्या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचे प्रेम संबंध नाही.परंतु त्याला नेहमी असेच वाटायचे की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.


          एकदिवशी त्याने माझ्या नावाने प्रेम पत्र लिहुन तिला दिले. ते पत्र वाचुन तिच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला.तिच्या मनातही माझ्याबद्दल त्या प्रकारचा विचार नव्हता.तिला ते पत्र वाचुन असे वाटले की, मी तिच्या मैत्रीचा गैरफायदा घेतला.ती त्या दिवशी माझ्याशी एक शब्दही न बोलता निघुन गेली.पुढ़च्या दिवशी ती कॉलेजला आली तेव्हा मी तिला विचारला की "काय झालं तू माझ्याशी बोलत का नाहीस?"तेव्हा तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व पुढे निघून गेली.काही वेळानंतर पुन्हा मी तिला हाच प्रश्न विचारला, तेव्हा तिने माझ्या कानाखाली मारली आणि बोलली की,"माझ्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करु नकोस."मला त्यावेळी काहीच समजत नव्हते की माझ्याकडून काय चुकी झाली.आमच्या मधली मैत्री तेव्हा तुटली.हे पाहून तो मुलगा फार खूश झाला.


            त्या नंतर ती माझा चेहराही बघून घेत नव्हती. तो मुलगा त्यानंतर तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता.तिने त्याच्याशीही मैत्री केली.एका दिवशी त्याने तिला प्रपोज केले. तेव्हा तिने त्याच्या कानाखाली पेटवून दिली.रागाच्या भरात तो तिला बोलला की,"मी तुझ्यासाठी खूप काय केलं, मी तुझ्याजवळ जो कोण येत होता त्याला तुझ्यापासून तोडले. शुभांकरच्या नावाने पत्र लिहून तुला त्याच्यापासूनही तोडले तरी तू मला नाही बोलतेस." तेव्हा त्याने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी तिला वाचवले.त्यावेळी तिच्या मनातला गैरसमज दूर झाला.ती तेव्हा रडायला लागली आणि तिने माझी माफी मागितली.तिने ती सगळी हकीकत मला सांगितली.मी ही तिला सांगितले की ते पत्र मी नव्हतं लिहिलं.मी तिला बोललो की तू आधीच माझ्यासोबत ह्या बद्दल बोलली पाहिजे होतीस.तिने पुन्हा माझी माफी मागितली आणि आमच्या मैत्रीला पुन्हा एकदा सुरवात झाली.

   

सारंश:-कधीही कोणत्याही गोष्टी बद्दल गैरसमज करुन घेण्यापेक्षा ती गोष्ट बोलून सोडवता आली पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy