Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anu Dessai

Romance Tragedy Others

4.1  

Anu Dessai

Romance Tragedy Others

गोष्ट तुझी माझी - भाग १

गोष्ट तुझी माझी - भाग १

27 mins
1.2K


   "अभिनंदन विश्वा..पाॅलिटीकल सायन्स मध्ये 100 गुण मिळवल्या बद्दल.."त्यानी विश्वाचं अभिनंदन केले. "थँक्यू सर" विश्वा म्हणाली.."विश्वा तू येणार आहेस का लवकर..आपल्याला ऑफिस मध्ये बोलावलयं नं..."पाठून तिचा आवाज आला."अं....ऑफिसमधे..अगं कधी कोणी??" विश्वा गोंधळून म्हणाली..डोळ्यांनी इशारा करत ती बोलली,"अगं हो बाॅनफाइड सर्टिफिकेट कलेक्ट करायची आपल्याला मघाशी तो शिपाई आला होता सांगायला....तू ऐकलं नाहीस वाटतं..तुझंही नाव होतं त्यात..म्हणून म्हटलं सोबत जाऊ" तिने पटपट बोलून संपवलं.."हो हो जाऊया.." म्हणत विश्वा जे काय समजायचं ते समजली... "अरे अश्लेषा,तुझं ही अभिनंदन मराठीत प्रथम आल्याबद्दल.." "थँक्यू सर.." ती त्याच्या कडे न बघताच उद्गारली.."विशू तू ये मागून मी पुढे जाते." असं म्हणून ती ताडताड निघून गेली..." आणि विश्वा आणि तो तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहातच राहिले..."विश्वा हे खरं नव्हतं ना..."तो उद्गारला.."हो सर..पण मलाही कळलं की ती अशी का बोलली.." विश्वा म्हणाली.."पण मला माहित आहे ना.." त्याने हळूच म्हटलं..."काही म्हणालात का सर..??" विश्वाने विचारले.."अं नाही गं..काही नाही..तू हो पुढे मी आलोच..."असं म्हणत तो पुढे गेला..


     तर हा संवाद होता सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थिनींमधला..हो ती त्याची विद्यार्थिनी होती..अश्लेषा...अश्लेषा गर्दे..वय वर्षे अठरा..दिसायला साधीच..साधारण गोर्‍या रंगाची..लालचुटुक ओठ..जराशी स्थूल जरी असली तरी तिचे डोळे फार बोलके होते..ती जरी काही बोलत असली तरी तिच्या डोळ्यातून तिला नेमक काय बोलायचयं ते सहज कळायचं...त्यात फार बडबडी..तिला लेखन वाचनाचा छंद होता..कविता कथा लिहायची..


   तर तो तिच्या उच्च माध्यमिक विद्यालयात मराठीचा शिक्षक होता..एकोणतीस वर्षाचा तरूण सडपातळ शरीरयष्टी..गोरापान चेहरा..अशा त्याचं नाव होतं मुकुंद बर्वे..त्याची शिकवण्याची शैली छान होती...अगदी कोणीही त्या शैलीच्या प्रेमात पडावं..त्यामुळे तो तिचा आवडता शिक्षक होता.तो ही काॅलेजला असताना कविता करायचा...त्याचमुळे दोन वर्ष झाली ती त्याच्या कडे त्याची एक कविता मागत होती..तिची बारावी झाली..निकाल लागला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती त्याच्या विषयात प्रथम आली होती..आणि तिने पुन्हा त्याच्याकडे कवितेची मागणी केली होती त्याने पाठवली नाही म्हणून ती त्याच्यावर रुसली होती..


   आज सारे जमले होते तिच्या बॅचच्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्यासाठी.तो तिच्या भेटीसाठी आतूर झाला होता पण आता त्याला तिचा रुसवा घालवावा लागणार होता..तो तिला शोधत वाचनालयाजवळ जात होता कारण त्याला माहित होतं ती तिथेच असेल..त्याला ती वाटेतच भेटली.बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरींकडे पाहत होती..चेहरा उदास दिसत होता तिचा..त्याने तिच्या जवळ जात तिला हाक मारली, "अश्लेषा..." ती जायला वळली..तितक्यात त्याने तिचा हात हळुवार पणे धरला..ती वळली दोन क्षण शांतता पसरली तिची नजर खाली गेली अन् ती किंचित लाजली हे त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं पण लगेच सावरून ती खालमानेनेच म्हणाली,"सर हात सोडा उगाच कोणी पाहिलं तर तुम्हाला नाव ठेवतील.." "माझी एवढी काळजी करतेस मग मघाशी आणि आता सुध्दा मला टाळत का होतीस..आणि पाहू देत कुणी पाहिलं तर.मला भिती नाही वाटत.." तो बोलला..एवढं बोलणं होत असतानाही हात हातातच होता.तो सोडत नव्हता आणि ती ही पुढाकार घेत नव्हती."पण मला वाटते..तुमची प्रतिमा एक आदर्श शिक्षकाची आहे ती माझ्या मूळे डगाळू नये असं मला वाटतं.." तिने लगेच हात मागे घेतला.तेवढ्यात पाठून आवाज आला.."मुकुंद..." पाठून एक शिक्षिका त्याला हाक मारत होत्या..ती तिथून मैत्रीणींच्या घोळक्याकडे गेली..


   कार्यक्रम सुरू झाला...सगळ्यांना सर्टिफिकेट देण्यात आली..आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरू झाला होता एक मुलगी आताच तिचं नृत्य संपवून गेली होती...आणि सूत्रसंचलन करणारी मुलगी काही बोलणार त्या आधीच आवाज आला,


रुसवा तुझा घालवायचा कसा

प्रश्न पडलाय हा मला असा 


डोळ्यातली ही उदासीनता 

जाईल का ऐकून ही कविता 


होती मागणी तुझी छोटीशी 

म्हणून मी ही झालो कवी फक्त तुझ्याचसाठी


ती कविता तिने अगदी मन लावून ऐकली होती..आणि तिथे कविता समजणारे आणि रसिक मनाने ऐकणारे खूप कमी जण होते त्यामुळे त्यातल्या भावना आणि संदेश फक्त तिच्या पर्यंत अचूक पोहचला होता..तो कविता करत प्रेक्षकांतून स्टेज वर आला होता..आता उतरणार एवढ्यात एका शिक्षिकेने मिश्कील पणे विचारले,"मुकुंद कविता संपली की ती कोणासाठी आहे हे ही सांगायचं असतं.."खाली मान घालून ऐकणार्‍या तिने एकवार त्याच्या कडे पाहिले आणि डोळ्यांनीच न सांगण्याचा इशारा केला.. "अनू राधा...माझी विद्यार्थिनी..."तो बोलला..अन् विद्यार्थ्यान मध्ये एकच गलका उडाला कारण त्याने मुलीचं नाव घेतलं होत.."कुठला वर्ग..??" त्या शिक्षिकेने प्रतिप्रश्न केला..."बारावी कला ब " तो म्हणाला..ती भांबावून गेली कारण त्याने वर्ग तिचाच सांगितला होता..'अनू ' हे तिला आवडणार नाव होतं..त्यामुळे फेसबुक वाॅट्स अप व इतर जागी खास करुन तिच्या कथा कवितांच्या खाली आवर्जून ती हेच नाव लिहायची..पण त्याने राधा का म्हटलं ह्याची तिला जराशी चाहुल लागली होती पण पुर्णपणे खात्री नव्हती..पण इथे सगळेच अनुराधाला शोधत होते..पण कोणाच्या ही शेवटपर्यंत लक्षात आलं नाही आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला..पण तिच्या बाजूला असलेल्या विश्वाला मात्र कळलं होतं कारण त्या दोघींची एकदम घट्ट मैत्री होती..पण ती ही गप्प राहिली..पण अनुला कोपरखळी मारून तिने खात्री करून घेतली..आणि अनूने ही जास्त आढेवेढे न घेता हसून होकार दिला..पुन्हा कार्यक्रम सुरू झाला..आणि तेवढ्यात तिच्या फोनवर वाॅट्स अपवर मेसेज आला..त्यावर नाव मुकुंद सर असं होत..."कशी वाटली कविता? " तिने रिप्लाय दिला," छान होती." त्याने जास्त वेळ न दवडता सर विचारलं,"कार्यक्रमानंतर घरीच जाणार आहेस ना..??" "हो" तिने ही सहज रिप्लाय दिला.."माझ्या सोबत येशील जरा महत्वाचं बोलायचयं...म्हणजे तुला आवडत असेल तर.." "येते मी..पण कसे आणि कुठे जाणार आपण माझ्या कडे रेनकोट नाहीये.." "काळजी करू नकोस फोर विलरने जाणार आहोत. " आणि मग दोघे ऑफलाईन गेले.विश्वा सगळं वाचत होती...ती हसली...


    कार्यक्रमानंतर सगळे एकमेकांचा निरोप घेऊन बाहेर पडली.ती ही त्याची वाट बघत गेटपाशी थांबली..एकवार चॅट वाचून आणि तारीख तपासून तिने खात्री करून घेतली की हे तिचं स्वप्न नव्हतं..!! तो आला ती पाठीमागे बसणार एवढ्यात त्याने पुढचे दार उघडले..ती छत्री मिटून आत बसली.


    जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता..पाऊस धोधो कोसळत होता..गाडीच्या काचा बंद होत्या..आत सारं थंड होतं...तिने मोरपंखी रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेगीन्स घातली होती..पाठीवर वेणी सोडली होती..त्यालाही निळ्या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची पॅन्ट शोभून दिसत होती..गाडी दोनापावलाच्या दिशेने धावत होती...तिने फोन उचलला आणि आईला फोन लावला "हॅलो आई, आज मी मैत्रिणींसोबत जातेय..जरा उशीर होईल.." आईचं बोलणं संपल्यावर परत म्हणाली,"जाऊ दे ना प्लीज..खूप दिवसांनी भेटलो गं.." थँक्यू आई म्हणत तिने फोन ठेवला...त्यानंतर ती आणि तो तिच्या काॅलेज विषयी बोलले शेवटी तो म्हणाला,"एक पर्सनल प्रश्न विचारला तर राग तर नाही ना येणार.." "नाही सर विचारा.." "तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आहे का..??" धीर एकवटून त्याने विचारले..."नाही सर..होता पुर्वी..खरंतर होते..चार जणांनी विचारलं होतं मला आणि मी होकार दिला होता पण काही कारणांमुळे नाही टिकू शकली ती नाती..."ती म्हणाली.."पण का..काय कारणं होती..."त्याने लगेच विचारले.." कारण सर्वांना शरीरभुक मिटवायची होती माझ्या कडून..आणि माझ्या साठी प्रेम म्हणजे फक्त शरीर सुख नव्हे..माझ्या माझ्या जोडीदाराकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत..आणि आता मी ठरवलयं तसा कोणी असल्याशिवाय हो म्हणायचं नाही..म्हणून सध्या मी त्या सगळ्या पासून लांब आहे..." ती खिन्न मनाने म्हणाली.."तुला कसा जोडीदार हवाय.."तो.."शिकलेला..मला राग लगेच येतो त्यामुळे समजा तसा काही प्रसंग आला तर अरे ला का रे न करता मला समजून घेणारा..माझ्यावर विश्वास ठेवणारा...मी एकुलती एक असल्यामुळे माझ्या बाबांच्या अटीनुसार आमच्या जाती-धर्मातला.माझ्यासाठी सर्वात आधी मानवता धर्म पण बाबांच्या एवढ्या इच्छेचा मान राखणं हे मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे.आणि रूपाने जास्त देखणा नसला तरी चालेल पण मनाने चांगला असावा..." तिने आपलं मन मोकळं केलं..."आणि वय..??" त्याने परत विचारले..."थोडासा मोठा असला तरी चालेल म्हणजे माझ्या पेक्षा जास्त मॅच्युरिटी असेल ना..तर जास्त समजूतदार असेल..आणि शरीराचं म्हणाल तर ती वेगळी गोष्ट आहे...मी पुर्णपणे त्यालाच सर्वस्व अर्पण करेन यावर त्याचा विश्वास असावा...आणि माझ्या प्रेमाचा शेवट सप्तपदीत व्हावा अशी माझी इच्छा आहे.."


   त्याने अचानक गाडी थांबवली...ते एका निर्जन माळावर थांबले होते..पाऊस कमी झाला होता..मेघांचा गडगडाट सुरूच होता."चल आपण मागच्या सीटवर जरा बसू बोलायचयं."दोघे मागच्या सीटवर बसले..पावसाचे थेंब गाडीच्या काचांवर आपटत होते..त्याने बोलायला सुरुवात केली,"मी काही बोलायच्या अगोदर मला वचन दे की मी जे काही सांगीन ते जर तुला पटलं नाही तरीही त्याचा आपल्या आताच्या नात्यावर काही परिणाम होता कामा नये." तिने मान डोलावली. त्याने पुन्हा हळूवार पणे तिचा हात हातात घेतला..आणि बोलू लागला,"अनू मला तू आवडतेस..गेली दोन वर्ष प्रयत्न करतोय सांगायचा पण हिम्मत होत नव्हती..पण आज ती केली आणि बोललो.मला तू तुझ्या सार्‍या गुणदोषांसकट मान्य आहेस..बोल होशील का माझी राधा..??" त्याने एका दमात सारं सांगितलं..ती त्याच्या डोळ्यात डोळे घालत बोलू लागली,"अहो, पण सर आपल्या वयात दहा ते बारा वर्षाचं अंतर आहे आणि समाज काय म्हणेल. त्यात आपले आई वडील ऐकतील का..?? आणि सर मीच का..माझ्यात आहे तरी काय एवढं त्यात मी हट्टी आहे रागीट आहे आणि हे असे ओबडधोबड शरीर चेहराही काही खास नाही दिसायला आणि तुम्ही एवढे देखणे आहात आणि तुम्हाला तुमच्या वयाची तुम्हाला साजेशी आणि देखणी हुशार मुलगी मिळेल की.. "हो मान्य आहे वयात अंतर आहे पण काळजी नको करू शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तुझ्या साठी भरभरून आयुष्य जगेन आणि अर्ध्यावर सोडून गेलो तरी उणीव भासणार नाही एवढं प्रेम देईन......"त्याने असं म्हणताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले.."तो हसत उद्गारला,"अगं ए वेडाबाई रडतेस काय मी आपलं सहज बोललो.." तर ती जरा रागातच म्हणाली,"सहज म्हणून काय मरणाच्या गोष्टी करायच्या.." " बरं चुकलो...परत नाही करणार मरणाच्या गोष्टी..तू म्हणालीस समाज काय म्हणेल.तो आज म्हणेल उद्या म्हणेल आणि परवा विसरून जाईल...आणि आई बाबा त्यांना समजावून सांगू ना आपण शेवटी आई बाबा आहेत ना गं ऐकतील..तुच का हे मला सांगता येणार नाही पण तुझ्या रूपापेक्षा तुझे इतर गुण मला अधिक प्रिय आहेत.एक दोन वाईट गुण सगळ्यांकडेच असतात गं पण ते सावरून घेता येत नसतील तर तो जोडीदार कसला..मला तु जशी आहेस तशी हवी आहेस.. बाकीचं सारं मी नीट करीन..तु फक्त तुझ्या मनातलं सांग ना...होशील का माझी..?" "हो " ती खालमानेने म्हणाली..


     पावसाने ही जरा जोर धरला होता.अजून दोघे दूर दूर बसले होता.त्याने तिला मिठीत घेण्यासाठी हात पसरवले आणि इशाऱ्याने तिला जवळ बोलावलं.."इश्श...मी नाही जा...मला बाई लाज वाटते.." "ये ना.." तेवढ्यात वीज कडाडली...अन् ती त्याला बिलगली..."काय गं लाज गेली वाटत." "अहो काही तरीच काय मला विजेची प्रचंड भिती वाटते..म्हणून हे...सोडा ना.." असं म्हणत ती सुटण्याचा लटका प्रयत्न करत होती. " असं आहे होय..आमच्या मॅडमना कशाची तरी भीती पण वाटते.धन्यवाद मेघराज.." तो गमतीने म्हणाला."भलतेच चावट आहात तुम्ही." असं म्हणत ती अजून त्याला बिलगली.दोघांना स्वर्ग अनुभुती होत होती.."राणीसरकार आज मी आपली इच्छा पूर्ण केली ना आता माझी पाळी.."तो तिला सांगत होता ती ही त्याला साथ देत बोलली "बोला राजे काय इच्छा आहे आपली.." "मला मुका हवाय.द्या आता.." असं म्हणत तो तिचा मुका घ्यायला गेला."अं हं मी वाट पाहिली की नाही..तसचं तुम्ही ही पाहा.योग्य वेळ आली की पुर्ण होईल तुमची इच्छा..तोवर दम धरा.." तोंड फिरवत ती बोलली आणि पुन्हा त्याला बिलगली ते कितीतरी वेळ एकमेकांच्या बाहूपाशात होते.त्याचं प्रेम तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होतं कितीतरी वेळाने तिच्या फोनच्या आवाजाने दोघं भानावर आली...


   ती लगेच बाजूला झाली आणि तिने फोन हातात घेतला," बापरे! पावणे सात वाजले आणि त्यात आईचा काॅल.." ती बोलली "उचल उचल" त्याने सांगितलं."हॅलो आई बोल.." असं म्हणत फोन स्पीकर वर ठेवला.."कुठे आहेस तू..कधी पासुन फोन करतेय आता लागला." मातोश्री गरजल्या."मी...मी कुठे आहे.."अगं मी बोललेच काय परत परत बोलते...उत्तर दे ना..बस मिळाली का..." " बस ना..हो अगं..पण आपली नाही दुसर्‍या रूटची मिळाली..मी फोन करेन तेव्हा बाबांना पाठव..तो वर पोहचतेच मी.." आईन चरफडत फोन ठेवला."हुश्श.." तिने उसासा टाकला."ये ना" असं म्हणत त्याने तिला जवळ ओढलं.."अहो सोडा निघावं लागेल आपल्याला.आधीच सार्‍या गाड्या गेल्या आणि उगाच आईला थाप मारली.." ती पुढच्या सीटवर बसत बोलली."मी सोडेन ना.." तो ही पुढच्या सीटवर येत बोलला."तुम्ही आणि मला घरी सोडणार..नको कुणी बघितलं तर.." ती जरा गांगरून बोलली.."नाही गं उगाच कुणाला काय दिसतयं काळोखात..तसही आपण रात्री पोहचणार..सांग कुणी गावातलं होतं म्हणून." "अहो पण किती ते खोटं आता ही आणि मघाशी पण खोटंच बोलले मी."ती अपराधी भावनेने म्हणाली."ठिक तर मग येतो तुझ्या सोबत घरी आणि सांगतो सासरेबुवा आणि सासू बाईना की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे तिला ऑफिशियली माझी बायको म्हणून मान्यता द्या..मी मग रोज विना टेंशन तिला घरी सोडू शकेन." तो गमतीत म्हणाला."गप्प ना" ती त्याला चापटी मारत म्हणाली.


    ते म्हापशाला पोहचले.जास्त ट्रॅफिक नव्हतं."अगं आपण जेवूयात का? " त्याने विचारले."नको उशीर होईल उगाच..आणि मग आईचे हजार प्रश्न." ती म्हणाली."ठिक तर मग..अगं आपण भेटायचं कधी.आता एखादा दिवस ठरवावा लागेल ना." "तुम्हीच सांगा ना..." ती.."अनायासे आज शनिवार आहे..आज आपण ऑफिशियली ऐकमेकांचे झालो..तर दर आठवड्याला शनिवारी भेटायचं आणि दुसर्‍या दिवशी पण आराम असेल ना..म्हणजे थकलेले असू ना आपण रात्रीचे..!!!" असं म्हणत त्याने डोळा मारला.."शु श्श्श्श्श..भलतेच चावट आहात तुम्ही..गप्प बसा हं..बरं तर मग शनिवार ठरला.आणि त्या दिवशी लवकर सुटतं काॅलेज.." तिने सांगितलं."हमारा प्यार हमसे मिलाने के लिए पूरी कायनात लगी है देखा जानेमन..." तो मिश्कीलपणे फिल्मी डायलॉग बोलला."फिल्मीपणा पूरे..जाताना गाडी हळू चालवा.जपून जा.पाऊस वाढलाय आणि पोहचल्यावर मेसेज करा हं सर.."ती काळजीने बोलली."अशं कश गं ते माजं पिल्लू..अगं सर काय..लायसन्स मिळालयं तुला नावाने हाक मारायचं..काय गोड नाव ठेवलयं माझ्या आईने..मुकुंद...घे की नाव मस्त.." "अं हं..मी लग्नानंतर सुध्दा तुम्हाला सरच म्हणणार.." ती."बरं राणीसरकार आपली आज्ञा शिरसावंद्य..पण उखाण्यात तरी घे.." तो..."उखाणा....बरं घेते..

    'कुणी नव्हतं सोबती 

    म्हणून जीवन होतं रिकामी

    मुकुंदा आले माझ्या जीवनी 

   अन् निशिगंध दरवळला मनी '


   "अरे वा...छान..नशीब मुकुंदा हे तरी शब्द आले आमच्या सरकारांच्या तोंडी." असं म्हणताच ती गोड लाजली...तेवढ्यात त्याने गाडी थांबवली..तिने छत्री उघडली आणि ड्रायव्हर साइडने आली..त्याने मान तिच्या कडे वळवली.ती खाली वाकली अन् हलकेच त्याच्या ओठांवर ओठ टेकले दोन क्षण ती तशीच राहिली..मग नीट उभी राहिली."जपून जा.मॅसेज करा हं.." म्हणत आत पळाली....


   आत गेल्यावर आईने विचारलं,"अगं कशी आलीस..कोणासोबत??" "आई ते खालच्या वाड्यावरचे काका भेटले लगेच उतरल्यावर म्हणून बाबांना नाही बोलावलं.." असं म्हणत ती बाथरूम मध्ये शिरली..हात पाय धुवून आली जेवण झाल्यावर सगळे निवांत बसले होते..तेवढ्यात आतून आईचा आवाज आला, "बाळा फोन वाजतोय बघ तुझा." "आले आई म्हणत ती आतल्या खोलीत गेली चार्जला लावलेला फोन तिने हातात घेतला त्यावर 'मुकुंद सर' नाव झळकत होता.तिने पटकन उचलला आणि बाहेर गेली.टिवी बघण्यात बिझी असलेल्या बाबांना काही कळलं नाही..असेल कुणा मैत्रीणीचा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं."हॅलो अहो फोन का केलात मेसेज करायचा ना.." ती म्हणाली."नाही गं मेसेज वर तुझा आवाज नसता ना ऐकू आला असता." तो खट्याळपणे म्हणाला."हं....पोहचलात ना व्यवस्थित.आणि जेवून घ्या मघाशी भुक लागली होती ना तुम्हाला.."ती.."अगं आताच जेवलो..अगदी मस्त बेत होता आज..मसाले भात, वांग्याची भाजी, आमटी,फुलके..मस्त झालं जेवण..." त्याने सांगितलं.."आणि गोड?? तुम्हाला नाही का आवडत जेवणानंतर गोड.."तिने भाबडेपणाने विचारलं."आवडतं ना..पण आज जेवणा अगोदरच गोड झालं तोंड.." तो..."ते कसं?"ती..."काय आहे ना आज माझ्या बायकोने काय गोड मुका दिला अगदी सगळं गोड गोड झालं होतं..म्हणून मग आईला तिखट बेत बनवायला सांगितलं.."तो तिला चिडवत म्हणाला.मुक्याची आठवण होताच तिच्या गालावर पुन्हा लाली चढली.."पुरे आता..झोपा शांत.." तिनं कसं बसं म्हटलं.."आपल्या आठवणीत निद्रा प्रसन्न होणं जरा कठीण दिसतयं..तरी प्रयत्न करतो..शुभ रात्री राणीसरकार.." असं म्हणत त्याने फोन ठेवला..ती ही आत येऊन टीवी पाहत बसली. ताईला संशय आलाच होता म्हणून रात्री तिने हिच्या कडून काढून घेतलं..तर आता तीन लोकांना त्यांच्या नात्याची कल्पना होती..तिची ताई, त्याचा दादा आणि विश्वा...


    त्या दिवशीची रात्र तिच्या आणि त्याच्या आयुष्यातली धुंद रात्र होती...दोघेही काहीसे बचैन झाले होते एकमेकांच्या ओढीने..आणि सुरू झाली त्यांची प्रेमकहाणी...ते दोघे रोज शनिवारी भेटायचे.आठवड्याभराच्या गप्पा मारत असायचे...तो तिला अभ्यासात मदत करायचा..तिच्या घरात तिच्या ताईला त्यांच्या बद्दल माहिती होतं आणि त्याच्या घरात त्याच्या दादाला याची त्यांनी एकमेकांना कल्पना दिली..तो तिला घ्यायला काॅलेजला जायचा तेव्हा विश्वा तिला लगबगीने पाठवून द्यायची..कारण त्या दोघी एकत्र शिकत होत्या.. कधी कधी त्याचे निरोप तिच्या पर्यंत आणि तिचे निरोप त्याच्या पर्यंत पोहचवायची...त्यांनी एकमेकांना बरचं समजून घेतलं होतं.एकमेकांच्या आवडीनिवडी राग-रूसवे सगळ्याची त्यांना माहिती झाली होती...ते कधी तरी मुवीला पण जायचे पण क्वचितच..कारण तिला अभ्यास असायचा..नाहीतर ऐरवी त्यांचा ठरलेला तो हिरवा माळ होता जेथे ते पहिल्यांदा आले होते.तेथे ते गाडीत शेजारी बसून तासनतास गप्पा मारायचे.. तो तिला बस स्टँडवर सोडायचा.आणि महिन्यातून एकदा तो तिला घरी सोडायचा.कुणाला ही संशय येऊ नये म्हणून एकदाच असं ठरवलं तिने...


    हिवाळा सुरू झाला होता..गुलाबी थंडी दोघांच्या प्रेमात रंग भरत होती..तिचं काॅलेज आणि त्याचा शिक्षकी पेशा सगळं सुरळीत चाललं होतं..आणि त्यांचा शनिवार तर ठरलेलाच..आजही ती त्याच्या साठी थांबलेली..काॅलेजच्या गेटपाशी..एकटी नव्हती विश्वा होती सोबत दोघींच्या गप्पा सुरू होत्या."अगं काय हे किती वेळ अजून किती वेळ लागणार आहे सरांना.?? तूला घेऊन जातील ते मला पंधरा मिनिटं थांबावं लागेल मला बससाठी." विश्वा कुरकुरत म्हणाली.."येतील अगं आणि तुला सोडतो मग म्हापसा बस स्टँडवर..मग तर झालं ना विशू तुच तर आहेस ना गं आमच्या मधला जोडणारा धागा तुझ्या मुळे तर ते भेटले ना मला.." अनू म्हणाली.."बरं मॅडम मस्का मारणं पूरे झालं..आणि काही नको सोडायला मी कशाला कबाब मे हड्डी..!!" विश्वा हसत म्हणाली."अगं आज त्यांना क्लास होता..मघाशी निघालेत असं म्हणाले होते फोनवर..आता ड्रायव्ह करत असतील थांबू ना थोडा वेळं."तिने स्पष्ट केलं..तेवढ्यात तो तिथे पोहचला."साॅरी लेट झाला मला..चल निघूया.." "सर विश्वाला आपण बस स्टँडवर सोडून मग पुढे जाऊ.." तिने सांगितलं "बरं जसं तू म्हणशील." तो. त्या दोघी मागे बसल्या..ते वीस मिनिटांत बस स्टँडला पोहचले.तिला सोडून ती पुढे बसली आणि त्यांची गाडी पणजीच्या मॅनग्रुसच्या दिशेने धावू लागली.ते फोटोशूटसाठीचं प्रसिद्ध ठिकाण होतं..त्यांनी सोबतचे नाजूक क्षण त्या दिवशी कॅमेरात बंद केले आणि ते घरी परतले.


    वर्ष सरलं..उन्हाळ्याची सुट्टी लागण्याअगोदर शेवटच्या शनिवारी ते भेटले होते कोलवा बिचच्या काही अंतरावर ' TWINKLE FAIRY' नावाचा शांत समुद्र किनाऱ्यचा स्पाॅट होता..जिथे सहसा कोणी येत नसे.. त्याला जेव्हा उदास वाटायचं त्यावेळी तो अनेकदा तेथे येऊन गेला होता तिला पहिल्यांदा घेऊन आला होता कारण आता दोन महिने त्यांना भेटता येणार नव्हतं त्यामुळे दोघेही दुःखी होते.तसंही फोन होते.पण दोन महिने सहवास लाभणार नव्हता म्हणून अंतःकरण जड झालं होतं..तो तिला मिठीत घेऊन समुद्रकिनारी फेसाळ लाटांवर चालत होता."ए पिल्लू बोल ना गप्प गप्प का आहेस..सवय नाही गं तुला असं शांत बसलेलं बघण्याची.." तो सौम्यपणे सांगत होता.."नाही ओ काही सुचत काही..असंच राहू द्या ना.." ती हळू बोलली. "बरं.."त्या दिवशी जास्त बोलणं झालं नाही.. खरंतर ती प्रचंड बडबड करायची पण तो तिची बडबड प्रेमाने झेलायला..आणि तिला गरमी अजिबात सहन व्हायची नाही..सतत काहीतरी थंड लागायचं आणि तो तिला ते घेऊन द्यायचा..कधीतरी थट्टेने तो तिला म्हणायचा,"अगं ए तू खरचं गर्लफ्रेंड आहेस ना माझी खाऊ सोडून काहीच मागत नाहीस कधीतरी शाॅपिंगचा निदान एखाद्या ड्रेससाठी तरी हट्ट कर की.." मग ती खळखळून हसायची आणि म्हणायची,"मला तुमच्या सोबत छोटे छोटे क्षण भरभरून जगायचेत त्या क्षणांचा पुरेपूर आनंद उपभोगायचायं.आणि वस्तू काय आपण कधीही घेऊ शकतो नाही का..आणि उगाचच वायफळ खर्च मला नाही आवडत आणि हे असे छोटे छोटे क्षण शेवटपर्यंत स्मरणात रहातात आणि खाल्लेलं निदान जीवाला तरी लागत आणि तुम्हाला जर मी हट्ट करावा असं वाटत असेल तर लग्नानंतर तुम्ही स्वतः सांगेपर्यंत की आता बस तोपर्यंत हट्ट करेन मग तर झालं ना...चला आता मला ऊसाचा रस हवाय.." अशी संभाषणे त्यांची चालायची.पण आज मावळतीला कललेल्या सूर्याच्या झळांपेक्षा ती विरहाच्या झळा अनुभवत होती आणि पर्यायाने शांत होती..आणि तिची ही शांतता त्याला अस्वस्थ करत होती..


   दोन महिने असेच गेले..रोज चॅट करायचे दोघे..बारीक सारीक गोष्टींची चौकशी करायचे..तिचं काॅलेज सुरू झालं अन् त्याला तीन आठवड्यांसाठी ट्रेनिंगसाठी जावं लागलं त्यामुळे दोन महिन्यांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर सुध्दा दोघांना भेटता नाही आलं..शेवटी चौथ्या आठवड्यात ते भेटले...ते आज कॅफेत भेटले होते...काॅफी ऑर्डर दिली आणि बोलत बसले तेवढ्यात त्याचा फोन वाजला..त्याने तो उचलला . तिच्या कानावर "येतो" एवढचं पडलं आणि तो समोर येऊन बसला."काय झाल??" तिने हिरमुसत विचारलं."साॅरी ना..अर्जंट आहे गं काम जरा.." " मग मी जाऊ का..??" घड्याळात बघत ती बोलली."आता दोन तासांनी बस आहे तोवर मला बस स्टँडवर माश्या मारत बसावं लागेल." "नको तु एक काम कर माझ्यासोबत घरी चल माझ्या..मी अर्ध्या पाऊण तासात काम उरकून आपण निघू.." त्याने सांगितले.."तुमच्या घरी.काय म्हणून येऊ..??नकोच मी बसते इथे." ती घाबरत म्हणाली."अगं चल ना.घरी फक्त आई आहे दुसरं कोणी नाही..बाबा गेलेत पिकनिकला.वहिनी माहेरी गेलीय तिला आणायला दादा गेलाय ते संध्याकाळी येतील..चल ना नाहीतर कामात लक्ष नाही लागायचं माझं.." तो बोलला "ठीक आहे येते मी." 


   दोघे पंधरा मिनिटांनी घरी पोहचले..आईशी तिची ओळख त्याने आपली विद्यार्थिनी म्हणून करून दिली.आणि आपलं काम असल्याने तिला घरी आणलं आल्यावर घरी सोडतो असं सांगून तो निघून गेला..ती ओळख झाल्यावर त्याच्या आईच्या पाया पडली..तो गेल्यावर त्यांनी तिला पाणी दिलं नाव विचारलं..तोंड ओळख झाली..त्या पाण्याचा ग्लास आत ठेवायला गेल्या..येताना जरा अडखळून पडल्या..गुडघ्याला मुका मार लागला."आई..गं..." त्यांच्या तोंडून अस्फुटशी किंकाळी निघाली..अनु धावत आत आली.त्यांना आधार देत बाहेर आणून सोफ्यावर बसवलं..त्या वेदनेने कण्हत होत्या..तिला अचानक काही आठवलं..आलेच म्हणत ती आत गेली..किचनमध्ये जाऊन तिने छोटे पातेले शोधून काढले..हळद आणि तेल समोर होतच..येताना अंगणातल्या कोरफडीवर नजर पडली होती तिची..त्यांच्या परवानगीने छत्री घेऊन ती बाहेरून कोरफड घेऊन आली.तिने पटकन सगळं उगाळलं.तिच्या भाषेत खता तयार झाला.ते मिश्रण घेऊन ती बाहेर आली..सोसाट्याचा वारा वाहत होता..बाहेर पाऊस धोधो कोसळत होता..वातावरण थंड होतं.ती त्यांचा पाय जरा चोळत होती..वेदनेवरून त्यांच लक्ष हटावं म्हणून तिने बोलायला सुरुवात केली, "मी तुम्हाला काय म्हणू??" "आईच म्हण की.." हं म्हणत तिने ते मिश्रण उचललं आणि कढत लेप शेकायला सुरवात केली..शेकताना त्यांच्या गप्पा रंगल्या आणि त्या वेदना विसरल्या..तिचं गाव तिचे आईवडील शिक्षण या दोघांची ओळख अशा गप्पा होत होत्या."अगं भांडी कपडे तसेच पडलेत आल्यावर ती बिचारी करत बसेल त्यात छोटी पण आहे ना गं तिच्या कडे लक्ष द्यावं लागेल तिलाच..मुकुंद नाहीये नाहीतर त्याच्याकडे रमते ती छान..काढ बाई हे जाते मी बरं वाटतयं आता.." "नको तुम्ही बसा इथे मी करते.." असं म्हणत तिने सरळ किचन गाठलं भांडी धुवून झाल्यावर ती कपड्याकडे वळली.तिने वॉशिंग मशीन सुरू केलं आणि त्यांच्या सूचनेनुसार सगळं करत गेली..तिने कपडे बादलीत काढले आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे सुकवायला घेऊन गेली..यात अर्धा पाऊण तास उलटला होता त्या दोघींना ही कळलं नाही..मी आल्यावर लेप काढू असं सांगून ती वर गेलेली.


   ती वर असताना तो आला."ए आई गेली की काय ही..आणि हे काय झालं.?" आईने सारा प्रसंग सांगितला.."आई मी आलोच तिला मदत करतो जरा." तो पाऊल न वाजवता वर आला आणि पाठून तिला मिठी मारली.ती दचकली.पण लगेच सावरली आणि मीठी सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली,"अहो सोडा काय करताय आई येतील ना.." "अरे वा आई का..चांगलं आहे...तू आता बोललीस ना हेच वाक्य असंच म्हणशील पण तेव्हा तुझ्या हातावर माझ्या नावाची मेहंदी असेल, गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल,हातात माझ्या नावाचा चुडा असेल भांगेत कुंकू माझं असेल........"तिला पलटत तो पून्हा मिठी घट्ट करत बोलला," आणि आदल्या रात्री मी प्रेमाने कुस्करलेल्या तुझ्या शरीरावरून ओघळणारं पाणी आणि साडी नेसलेल्या तुझ्या ह्या उघड्या कमरेवरून फिरणारा हात आणि ओलेते केस बाजूला सारून तुझ्या मानेवरून फिरणारे श्वास माझे असतील.."असं म्हणून त्यानं हलकेच तिच्या मानेचा चावा घेतला....." ती उत्तेजित झाली आणि तिच्या अंगातून विज सळसळत गेल्यासारखं वाटलं तिला क्षणभर..केस् न केस ताठ झाला कशीबशी स्वतःला सावरत ती त्याच्या पासून विलग झाली आणि थरथरत खाली आली..इतक्या थंड वातावरणात तिला घाम फुटला होता.."आ....ई तुम्हाला च..हा हवाय का..मी सरांसाठी ठेवतेय.." बोलताना तिचे शब्द अडकळत होते..आणि घाम चेहर्‍यावरून ओघळत होता."अगं हो ठेव तू चहा आपल्या तिघांसाठी ठेव..पण काय झालं एवढी घामाच्या धारा का लागल्यात.." त्या म्हणाल्या.."काही नाही" असं म्हणत ती किचनमध्ये गेली..त्यांना विचारून चहा ठेवला..बाजूलाच थोडीशी राहिलेली कोरफड आणि तेल दाट करून उकळले..ओटा साफ करून ठेवला.आणि बाहेर आली..तिने आधीचा लेप काढला आणि ताजं उकळलेलं तेल त्यांच्या पायावर चोळू लागली.


   तेवढ्यात तो खाली आला."सर चहा उकळला असेल प्लीज गॅस बंद करा ना..मी आलेच."असं तिने म्हणताच तो आत गेला..तिचा ही लेप लावून झालाच होता..चहा आणायला ती आत आली."काय राणीसरकार रागावलात का? "तो लाडीकपणे बोलला.."नाही तर.दुध किती लागत तुम्हाला.??का वाटलं तुम्हाला असं कि मी रागावले म्हणून..??" ती चहा ओतत म्हणाली.."अगं मघाशी फोन केला तेव्हा नुसतं हं हो हेच करत होतीस नीट बोललीच नाहीस..मला वाटलं मी मला काम आहे असं खोटं सांगून तुला इथं आणलं म्हणून तू रागावलीस..??" "काय..तुम्ही असं का केलत..ते राहू द्या मी इथे आल्यापासून फोनला हात सुध्दा लावला नाहीये.मग फोन कोणी उचलला..??" दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहीले आणि एकाच वेळी त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले "आई...."

"अरे देवा माती खाल्ली मी..असचं सगळं बोललो म्हणजे तिला सारं कळलं असेल.." दोघे काय ते समजले..


  चहाचा ट्रे घेऊन दोघे बाहेर आले.चहा पिता पिता आई उद्गारल्या,"मी सरळ विषयालाच हात घालते.बोलू का मुकुंद..??" "हो आई बोल ना.."तो दबकत बोलला.."मी कप बश्या आत ठेवते" असं म्हणत ती उठत होती."थांब मला तुमच्या दोघांशी बोलायचयं.." आता मार्गच नव्हता दोघांनाही त्या काय बोलणार हे आधीच कळलं होतं.ती बसली.."तुमचं एकमेकांवर प्रेम आहे हो ना..??" आईने पहिला बाॅम्ब टाकला.आता सगळं सांगावंच लागलं..तो म्हणाला, "आई तुला मान्य आहे की नाही..नसेल तर तसंही सांग आताच तिला तिच्या घरी सोडतो आणि तुझ्या पाया शपथ कधी ही तिला भेटणार नाही.." हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.तिची नजर खाली गेली..आणि अश्रू डोळ्यातून गालावर उतरले..आईने एकवार त्याच्या कडे पाहिले आणि तिला जवळ घेत बोलली,"काय रे मुकुंदा माझं पुर्ण ऐकून तर घे..माझ्या सोन्यासारख्या सुनेला रडवलंस बघ." तिने आईच्या डोळ्यात पाहिलं."म्हणजे आई तुला मान्य आहे..तुला तिला काहीच विचारायचं नाही." तो जवळपास ओरडलाच.."हो अरे..मघाशी तू जेव्हा फोन केलास तेव्हा ती आत भांडी घासत होती पाण्याच्या आवाजामुळे तिला तो ऐकू गेला नाही आणि तुझं नाव दिसलं म्हणून मी उचलला आणि मी बोलतेय हे सांगण्याअगोदरच तू बोलायला सुरुवात केलीस की तू कामाचं खोटं बोललास आणि तिला इथे आणून सोडलसं कारण तुला तिला आपलं घर दाखवायचं होतं..पण हे सगळ तिने ऐकण्या ऐवजी मी ऐकलं आणि मला तुमचं गुपीत मला समजलं..अनायासे मला लागलं आणि तिची परोपकारी वृत्ती मला समजली आता वेगळी परिक्षा घ्यायची जरूरी नाही.तिने प्रसंगावधान राखलं.यावरून तिची धीट वृत्ती कळते..फार गुणी पोर आहे हं छान सांभाळेल तुला आणि तुझ्या संसाराला." आई भरभरून बोलली . दोघे तिच्या पाया पडले.."सुखात रहा पोरांनो.." आईने आशीर्वाद दिला.."अरे जा तिला घर दाखवं.." आई म्हणाल्या.."काय गं आई तिनं सगळं घरं तर बघितलं आणखीन काय बाकी आहे." तो गमतीने म्हणाला."अरे वेड्या, तुझी----"तुमची" रूम दाखवं तिला.." ती लाजली..

   दोघे वरच्या त्याच्या रूममध्ये गेले.."राणीसरकार या स्वागत आहे तुमचं तुमच्या राज्यात..ही माझी आणि लग्नानंतरची आपली खोली..कशी वाटली.." "छान आहे..आवडली मला." 


   चार वाजत आले होते आई आणि ती गप्पा मारत होत्या.."काय तुम्ही बायका किती गप्पा मारता..कंटाळा नाही का गं येत तुम्हाला..त्यात तुम्ही सासवासुना होणाऱ्या असलात तरी सासवासुनाच ना आणि भांडायचं सोडून गोड गोड गप्पा काय मारताय.." तो त्या दोघींना चिडवत म्हणाला.."अहो सर काय बोलताय..आमच्यात का भांडण लावताय..??"ती म्हणाली.."तुझ्या पोटात का दुखतंय रे..सासू सून हे जूनं झालं.लेक आहे ती माझी..आई म्हणते मला ऐकलस ना."आई हसत म्हणाली.."काय गं एका दिवसात माझी आई पण तुझी करून घेतलीस का.." त्याने असं म्हणताच तिघेही हसायला लागले..


   तेवढ्यात त्याचे दादा वहिनी आणि त्यांची छोटी आले.तिने लगेच आत जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणलं..ते दोघे प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत होते..तिची मुकुंदची विद्यार्थिनी म्हणून आईनी तिची ओळख करून दिली आणि आपण पडलो म्हणून तिने पाणी आणलं असंही सांगितलं.."आई मी घेऊ का तिला.." आईंच्या हातात असलेल्या सहा महिन्याच्या छोटी कडे पाहात त्यांना विचारलं."अगं परवानगी कसली मागतेस घे की.."असं म्हणत त्यांनी छोटीला तिच्या कडे दिलं.तिच्या कडे दिलं."अय्या भावजींकडे हसते तशीच हसली बघा पिल्लू.." वहिनी म्हणाल्या..


    ती छोटीला खेळवण्यात रमली होती . तेवढ्यात तिला आईंची हाक ऐकू आली.ती त्यांच्या खोलीत आली.."ये इथे बस.."असं म्हणत तिला जवळ बोलावलं..ती त्यांच्या समोर येऊन बसली त्यांच्या हातात एक बाॅक्स होता.एखादा हार असावा त्यात असं वाटतं होत..तिने छोटीला मांडीवर झोपवली.त्यांनी तो उघडला त्यात एक सुंदर हार होता.."बाळा हा माझ्या सासूबाईंनी दिला होता आमचं लग्न ठरलं न तेव्हा.आमच्या थोरल्या जाऊबाईंना न देता मलाच का दिला असं विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "गार्गी, आज तू समजूतदारपणा दाखवलास त्याची ही भेट.." "तेव्हा यांच्या आत्या मला खूप बोलल्या कारण काय तर माझ्या हातून चुकून यांच्या वर पाणी सांडलं पण त्या नको तेवढं बोलल्या." पण मी सारं शांतपणे ऐकून घेतलं..नंतर सारं बोलणं झाल्यावर त्यांना मी खीर करून दिली आणि देताना बोलले," आज जी मी अक्षम्य चूक केली त्याची ही भरपाई.." अस म्हटल्यावर त्यांना त्यांची चूक उमगली..आणि त्यांनी सर्वासमोर माझी माफी मागितली आणि लग्न झाल्यावरसुध्दा मला सांभाळलं.." तो समजूतदार पणा मी दाखवला म्हणून हा हार मला मिळाला..आज तुझ्या संयमासाठी हा मी तुला देतेय.." असं म्हणत त्यांनी मंद हसत तिच्या गळ्यात तो हार घातला.."आई संयम पण मी कसला संयम दाखवला..??" ती म्हणाली..तिच्या गळ्यावरच्या दातांच्या वळावरून हात फिरवत म्हणाल्या,"हा संयम..आपण संयमी असतो गं..पण पुरूषाला आपला मोह आवरता येत नाही.माझा मुलगा असला म्हणून काय झालं..हे एवढे वळ म्हणजे तो अगदी उत्तेजित होता.पण अशा परिस्थितीत स्वतःला अन् त्याला आवरणं म्हणजे संयमच नाही का.."त्या तिला समजावत म्हणाल्या..ती तो विषय टाळत म्हणाली,"आई हा तुमच्या जवळ असू द्या योग्य वेळ आली की मी स्वतः घेईन तुमच्या कडून..कारण आता घरी नेला तर आईचे हजार प्रश्न पुढ्यात ठाकतील..प्लीज.." "अगं त्यात प्लीज काय ठेवते मी.."असं म्हणत त्यानी तो कपाटात ठेवून दिला..एव्हाना छोटी तिच्या मांडीवर पेंगत होती...ती तिला झोपवू लागली..


   "अनू चल निघायला हवं आपल्याला उशिर होतोय." असं म्हणत तो आत आला.."श्श्श्श्शु...छोटी झोपतेय ती झोपली की निघूच.." असं म्हणत तिने शांत होण्याचा इशारा केला.तिला झोपवून ते जायला निघाले."आई जाते.." "पोरी जाते नाही येते म्हणावं." त्या म्हणाल्या.."येते आई" असं म्हणत  ती त्यांच्या पाया पडली..दोघे निघाले.


जाता जाता त्याच्यात जास्त गप्पा झाल्या नाहीत पण तिने मघासचा विषय छेडला..."अहो, काहीतरी सांगायचंय.." "बोल काय झालंय.." ती वळ दाखवत म्हणाली," आईंनी हे पाहिलं.अहो इतकी लाज वाटली ना मला.माझ्या ही लक्षात नव्हतं आलं. पण त्या बोलल्या ना तेव्हा मला खरचं वेदना झाल्या.." "साॅरी बायको खरचं मला नाही कंट्रोल करता आलं."तो अपराधीपणे बोलला."असू दे." ती बोलली..सातला तिला घरी सोडून तो परतला..


    दोन तीन दिवसांनी ती लेक्चरला असताना त्याचा फोन आला..तिने त्याला मेसेज केला."नंतर काॅल करते आता लेक्चर सुरू आहे." तिला संध्याकाळी वेळ होता..तिने काॅल केला.."हॅलो" समोरून अनोळखी आवाज आला.."तिने परत डायल चेक केला त्याचाच होता.."हॅलो कोण बोलतय.मी आपल्याला ओळखलं नाही." "मी वसुधा,मिसेस बर्वे ह्यांची बायको.." " 'हे' म्हणजे कोण..??" "इश्श मला लाज वाटते तरी तुम्ही सांगताय तर सांगते..आमचे 'हे' म्हणजे मुकुंद बर्वे..." हे ऐकताना तिच्या कानात शिस ओतल्यासारखं तिला वाटलं.तरी तिने धीर एकवटून तिने विचारलं,"आपलं काही क्राॅसकनेक्शन झालयं मी गोव्याला फोन लावला होता आता कुठे लागलाय सांगू शकाल का? " "हो गोव्यातच लागलाय..'अमृतवेल' नियर ग्रीन लँन्ड होटेल काणका म्हापसा गोवा.." पत्ता त्याचाच होता हा तिच्या सहन शक्तीचा अंत होता.तिच्या डोळ्यासमोर सारं काही सरकत होतं.तिच्या डोळ्यातून पाणी ओथंबून वाहत होतं ती रडत रागाने बोलली, "काय काम आहे तुमचं" "तुम्हाला भेटायचंय.आता तुमचं काॅलेज आता सुटेल ना मी बाहेर थांबलेय आपण काॅफी पीत बोलूया."त्या फोनवरच्या बाईंनी सांगितलं."साॅरी, मी जरा बिझी आहे मला आज घरी लवकर जायचयं मी नाही भेटू शकत तुम्हाला.." ती बोलली आणि तिने फोन ठेवला..पुढच्या लेक्चरला तिचं लक्ष लागलं नाही..


  संध्याकाळी साडेचारला ती बाहेर पडली.गेट जवळ कोणीतरी तिची वाट पाहत होतं..त्यांना पाहिल्यावर तिने त्याला ओळखलं."तुम्ही मुकुंद सरांच्या वहिनी ना..?"तिनं विचारलं "हो..चल माझ्या सोबत तुझ्याशी बोलायचयं थोडं.."त्या बोलल्या."चला.." असं म्हणत दोघी गाडीत बसल्या.गाडी तो चालवत होता.पण तो काही बोलला नाही.आणि ती तर बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती..


गाडी एका हाॅटेलसमोर थांबली तिघेही उतरले.आत जाऊन टेबलवर जाऊन बसले.टेबल खिडकीच्या जवळ होतं काचेतून बाहेरचा पाऊस दिसत होता.वहिनी समोर बसल्या होत्या आणि ते दोघे शेजारी शेजारी.."मला माफ कर अनु." वहिनी म्हणाल्या.."काय कशासाठी..आपण तर अजून नीट एकमेकांना ओळखत सुध्दा नाही. त्या दिवशी सुध्दा धावती भेट झाली.मग माफी कशाबद्दल..??" तिनं गोंधळत विचारलं.."माफी अशासाठी की मघासशी मिसेस बर्वे मीच होते.अगं मला मस्करी करायची होती आणि शेवटी मी सांगणार होते पण तू रडत रडत फोनच कट करुन टाकलास..तुझा रडका आवाज ऐकून तुझे सर सुध्दा रडले बरं..म्हणून मग मी त्यांना घेऊन आले.मी पुन्हा एकदा तुम्हा दोघांची माफी मागते.." वहिनींनी स्पष्टीकरण दिलं..ते दोघे एकमेकांकडे पाहत होते.पण काही बोलले नाही..गप्प काॅफी प्यायले आणि गाडीच्या दिशेने चालते झाले..गाडीत बसले आणि ती वहिनींना म्हणाली,"वहिनी अहो किती छान अभिनय केलात..मला खरचं वाटलं की..."ती पुढं बोलणार एवढ्यात तिने जीभ चावली.."की फोनवर बोलणारी माझी बायको आहे...बघितलं वहिनी लग्नाआधीच हा विश्वास यांचा.." तो तडतडला.."हे चांगलं आहे स्वतः थट्टा करायची आणि माझ्यावर बिल फाडायचं म्हणे विश्वास.." ती ही काही कमी नव्हती.."बरं बरं माझ्यामुळे गैरसमज झाला ना..याची शिक्षा मी भोगणार..येणाऱ्या शनिवारी माझ्या कडून सगळ्यांना ट्रिट भावजी आमच्या जाऊबाईंना घरी घेऊन या..पार्टी करू होममेड.." वहिनींनी सांगितलं."वहिनी ते..." तो पुढे बोलणार एवढ्यात तिने खांद्यावर हात ठेवला तो पुढे काही न बोलण्याचा इशारा होता."काय झालं भाऊजी..काही अडचण आहे का शनिवारी..??" वहिनी म्हणाल्या.."नाही वहिनी काही नाही. "ती म्हणाली..तिला बस पर्यंत पोहचवून तो आणि वहिनी घरी आले..

   

रात्री त्याचा फोन आला.."अगं मघाशी का सांगू नाही दिलं वहिनीला तिनं समजून घेतलं असतं.अगं तीन महिने झाले आपण भेटून बोललो नाही..मागच्या शनिवारी आई सोबत आणि आता वहिनींना होकार दिला..मग मला कधी भेटणार आहेस..तू सगळ्याना भेट माझ्या कडे हल्ली लक्षच नाही तुझं..म्हटलं किती दिवसांनी भेटणार खुष होशील तर ते नाही.." तो रागात बोलत होता."अहो हो.मला बोलू तर द्या किती रागावता..किती प्रेमाने वहिनी बोलल्या म्हणून मला त्यांचं मन मोडवलं नाही म्हणून हो म्हटलं मी..आणि आपलं म्हणाल तर त्या नंतर तीन दिवसांनी आपण भेटूच की..." ती त्याला समजावत म्हणाली.."तीन दिवसांनी काय आहे..??" तो थंड होत म्हणाला.."तुम्हीच आठवून पहा..गुड नाईट..झोपा शांत.." त्याला कोड्यात टाकून तिने फोन ठेवला..दोन दिवसांनी काय आहे हा विचार करता करता कधी झोप लागली त्याला ही कळलं नाही.


    शनिवार उजाडला..दुपारी तो तिला घेऊन आला..विचारपूस झाली..तिची त्याच्या बाबांशी भेट झाली.धाकटी सूनबाई त्यांच्या पसंतीस उतरली..गप्पा रंगल्या.तो मात्र अजून ही रागातच होता..तिला आणून सोडलं त्यानंतर तो खोलीतून बाहेर आलाच नव्हता..ही त्याची राग दाखवण्याची पध्दत आहे हे तिला त्या दिवशी कळलं.तो रागात होता कारण सुट्टीनंतर भेट तर नीट झालीच नव्हती आणि मिठी दूरच राहिली साधा स्पर्श झाला नव्हता आणि त्याला तिची खूप सवय झाली होती गेल्या वर्षभरात बोलण्यापेक्षा तिने मारलेल्या मिठीतून त्याच्या पर्यंत अनेक गोष्टी पोहचायच्या..आता तो त्या भावना तो मीस करत होता..त्यादिवशी त्याने तिच्या इच्छेविरूध्द मीठी मारली होती त्यामुळे ती बावरली होती..पण आता खरचं ती त्याला जवळ हवी होती हे तिला ही कळलं होतं.


   तिच्या आवडीचा मेनु होता खास.तिला बसायचा आग्रह झाला पण तिने सांगितले की वहिनींन सोबत बसेन...तो खाली आला..हसत खेळत जेवणं झाली..वहिनी आणि अनूने दोघींनी सारं आवरलं..सारं आवरून झाल्यावर वहिनी बोलल्या "तू जा रूममध्ये बोला जरा तूम्ही आराम करा संध्याकाळी चहाच्या वेळेवर हाक मारेन मी..तसही सारे झोपलेत..जा बिनधास्त.." असं सांगून त्या आपल्या रूमकडे गेल्या..


   ती वर आली आणि दारावर टकटक केलं आणि त्यांनी वाट बघत असल्यासारखं दार उघडले.ती आत येऊन बेडवर बसली.त्याने दार लावून घेतलं.आणि येऊन तिच्या जवळ येऊन बसला..आज ती स्वतः हून त्याला बिलगली "साॅरी माझं दुर्लक्ष झालं ना तुमच्या कडे." ती म्हणाली.."मी पण साॅरी जरा जास्तच भडकलो ना माझ्या राणीवर..असं नको करायला हवं होतं."तो म्हणाला..तिने नुसता हुंकार दिला..गप्पा मारता मारता ती म्हणाली,"चला ना आपण गच्चीत जाऊ.पाऊस पण थांबलाय.."दोघे गच्चीत आले गच्चीत छोट्या छोट्या कुंड्या लटकवल्या होत्या त्यातून छोट्या फुलवेली खाली लगडल्या होत्या..दुर कुठेतरी हिरव्या टेकडीचं टोक दिसत होतं.आताच पाऊस थांबला होता त्यामुळे आकाश निरभ्र झालं होतं ओल्या मातीचा सुगंध सर्वदूर पसरला होता..अशा वातावरणात दोघांनी राहिलेल्या सार्‍या गप्पा मारल्या.फ्रेश होऊन चार वाजता दोघे खाली आले.घरच्यांशी थोड्याश्या गप्पा झाल्या नंतर ते पाचच्या दरम्यान निघाले.


   तीन दिवसांनी म्हणजे पाच जुलैला बुधवारी तिचा वाढदिवस होता आणि तो त्याला स्वतःहून आठवावा अशी तिची इच्छा होती..न जाणो तो काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असेल अशी शंका ही तिच्या मनात येत होती.आणि इथे त्याचा गोंधळ उडाला होता की तीन दिवसांनी नेमकं आहे तरी काय..शेवटी त्याने वैतागून विश्वाला काॅल केला अन् तिने त्याला तिचा वाढदिवस असल्याचे सांगितले..तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने आपण विसरल्याचं भासवायचं आणि संध्याकाळी छान सरप्राईज द्यायचं असं ठरवलं..


   ती वाढदिवसाच्या आदल्या रात्री तो विश करेल म्हणून बारापर्यंत बसून राहिली पण त्याचा फोन आलाच नाही त्यामुळे मग ती जरा नाराजीने झोपी गेली..सकाळी उठल्यावर घरच्यांनी विश केलं.काॅलेजला आल्यावर मैत्रीणींनी गलका केला शिक्षकांनी ही शुभार्शिवाद दिले. मैत्रिणींना पार्टी दिली पण पुर्ण दिवस तिला त्याच्या एका काॅलची प्रतिक्षा होती..पण जसजसा दिवस सरकत होता ती अस्वस्थ होत होती..शेवटी संध्याकाळ झाली काॅलेज सुटलं निदान आता तरी तो बाहेर उभा असेल या आशेने ती बाहेर आली पण बाहेरही तो नव्हता. शेवटी न राहून तिनेच मेसेज केला,"कुठं आहात." त्याने रिप्लाय दिला "कामात आहे नंतर बोलू." ती रिप्लाय वाचून हिरमुसली आणि घरच्या वाटेला लागली आता तिच्या मनात पक्क झालं होतं की तो तिचा वाढदिवस विसरला होता.तिला खूप वाईट वाटत होतं..म्हापशाला तिने बस पकडली तिला जागा ही मनाजोगती मिळाली तिला खिडकीजवळ बसायला आवडायचं. खिडकीतून येणारी मंद हवेची झुळूक आणि कानातल्या इयरफोनवर वाजणारी आवडीची गाणी आणि यांच्या लयीवर बंद होणारे डोळे..पण आज तिचे मन व्यथित होती.त्यामुळे येणाऱ्या हवेच्या झुळूकेचे तिला भान नव्हतं. कानात वाजणार्‍या गाण्यांशी ती आज एकरूप होत नव्हती.


   दुःखी मनाने ती बस मधून उतरली..घराच्या दारात एक चारचाकी गाडी उभी होती.तिला गाडी ओळखीची वाटली.असेल कुणा नातेवाईकाची असा विचार तिच्या मनात आला आणि ती सरळ घरात आली. आत येताना ती दारावरच थबकली कारण आत सगळे बसले होते..तो,त्याचे आई बाबा,दादा वहिनी,आणि छोटीपण सोबत तिचे आई बाबा आणि ताईपण होती. तिला आनंद झाला होता पण त्याच बरोबर ती खूप घाबरली होती.."अगं ये की आत तुझचं घर आहे.." वहिनी गमतीने म्हणाल्या . ती आत आली आणि पहिली नजर तिची तिच्या बाबांकडे गेली..त्यांची नजर अगदी थंड होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते..ती अगदीच गोंधळली होती..सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तो मात्र बाहेर उभा होता.वहिनींनी छान ड्रेस तिच्या हातात दिला आणि त्याच्या आईने तोच हार ठेवला."जा मस्त तयार होऊन ये.."आई बोलल्या तिने क्षणभर तिच्या आईकडे पाहिलं तिने होकारार्थी मान डोलावली..ती थँक्यू म्हणाली . ती आणि तिची आई आतल्या खोलीत गेल्या ."आई बाबांना मान्य आहे का गं..." ती अपराधी भावनेने म्हणाली.."हो गं बाळा आधी नव्हते ते तयार तुमच्या वयावरून वैगरे..पण नंतर जावईबापूंच्या बाबांनी सगळं नीट समजावून सांगितलं आता आम्हाला मान्य आहे अगं सगळं.. ते लवकर साखर पुडा करायचा म्हणताहेत ते नंतर ठरवायचयं.."आईने सारं सांगितलं..आकाशी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती गोड दिसत होता.तिच्या ताईने तिला सजवलं होतं..लांब केसांची वेणी पाठीवरून सोडली होती..हलकासा मेकअप..हातात कांकण गळ्यात हार अगदी मुकुंदाची राधा शोभत होती..


   केक ही त्यांनीच येताना आणला होती.तिचा आवडता चाॅकलेट फ्लेवर..केक कापायच्या वेळी तो आत आला आणि दोन क्षण तिच्याकडे पाहतच राहिला तिचं ते रूप मनात साठवतच राहिला.तेवढ्यात त्याच्या दादाचं लक्ष गेल त्याच्यावर तो म्हणाला,"अरे वेड्या काय बघतोयस तुझीच होणारी बायको आहे ती आणि माझी भावी वहिनी..उगाच नजर लावशील माझ्या सुंदर वहिनीला..!!"सगळे हसले तो मात्र तसाच तिला बघत म्हणाला,

"सखये रूप हे तुझे अती सुंदर 

अशी ललना दूजी नसावी 

विशेषता तुझी सांगता 

मज तू माझी राधा दिसावी "

अशी सुंदर चारोळी त्याने सादर केली..सर्वांनी टाळ्या वाजवल्या..केक कापला..त्याने तिला गिफ्ट म्हणून छान चांदीचे पैंजण दिले..त्यानंतर लगेचच जेवणं उरकली आणि सगळे बोलायला बसले की साखर पुडा कधी करायचा..तिच्या बाबांनी दोन आठवड्यांनी करू असे सांगितले म्हणजे सगळ्या नातेवाईकांना कळवता ही येईल असे त्यांचे म्हणणे होते..सर्वांनी त्यांच्या बोलण्याला मान्यता दिली.


     बाबांनी सगळ्यांना कळवलं. खूप जणांनी त्यांच्या वयांवरून आक्षेप घेतले पण बाबांनी त्यांना समजावले..आणि साखर पुड्याची तयारी सुरू झाली..त्यांचं आधीच ठरलं होतं की साखरपुडा जरी आता झाला असला तरी लग्न मात्र तिचं बी.ए.बी.एड झाल्यावर करायचं..आणि ते सर्वांना मान्य होत..मुहूर्त रविवारचा होता कारण तिच्या काॅलेज मध्ये त्याला व्यत्यय नको होता.रविवारी संध्याकाळी चारचा मुहूर्त होता..सगळं घर सजलं पावणे आले..तो आणि त्याच्या घरचे एक तास आधी पोहचले होते.वहिनी आणि तिची ताई दोघे तिला सजवण्यात गुंग होत्या..तर तो आणि बाबा गप्पा मारत होते त्याचं अर्ध लक्ष मात्र तिच्या खोलीकडे होतं..आया पावण्यांचं करण्यात गुंतल्या होत्या.सगळं घर हसत खेळत होतं.त्यांचे पावणे म्हणून त्याचे मामा आले होते त्यांनी मराठी विषयात डाॅक्टरेट केले होते..त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला होता..एक वर्ष तिला ही ते मराठीचे शिक्षक म्हणून लाभले होते.


     मुहूर्ताची वेळ झाली..तिला घेऊन ताई आणि वहिनी बाहेर आल्या. जांभळ्या रंगाची साडी त्याने दिलेली साडी आणि कोरीव असे दागिने तिने परिधान केले होते..पायात त्याने वाढदिवसाच्या दिवशी दिलेले पैंजण रूणझूणत होते.हातातली कांकण किणकिणत होती..नाजुक चालीने ती त्याच्या बाजूला उभी राहिली..त्याने ही त्याच रंगाचा कुर्ता आणि पांढरी पायजमा घातला होता..तो ही राजबिंडा दिसत होता..


   त्याने हळूवारपणे तिचा हात हातात घेतला त्या स्पर्शाने ती शहारली.या आधी अनेकदा ती त्याच्या मिठीत सुखावली होती. पण आजचा दिवस आणि स्पर्श वेगळेपण घेऊन आला होता..दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. साखरेचे पुडे फोडून एकमेकांना साखर भरवली..साखरपुडा छान पार पडला. रात्रीपर्यंत सगळे पावणे आपल्याला घरी परतले..त्याचा फोन आला.."राणीसरकार आज आपलं अर्ध लग्न पार पडलं बरं का..आता फक्त सप्तपदी आणि मंगळसूत्र घालायचं राहिलयं मग तू कायमची माझी होशील.." तिने हुंकार दिला.. गप्पा मारत मारत दोघांनी फोन ठेवला आणि भावी आयुष्याची गुलाबी स्वप्न बघत दोघे झोपी गेले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance