STORYMIRROR

Anuradha Kalyani

Inspirational

4  

Anuradha Kalyani

Inspirational

जात...

जात...

1 min
602

माणूस जन्माला येतानाच घेऊन ही जात,

जाता जात नाही अशी ही जात,

सर्व धर्म समभाव शिकवणा-या शाळेतच,

दाखल्यावर मागितली जाते ही जात,

जाता जात नाही अशी ही जात,

जातीसाठी माती खाणारी अशी आमची ही जात,

कशी करावी आपण या जातीवर मात,

जाता जाता एक प्रयत्न जरूर करावा,

जाती-धर्माचा पडदा चिरून टाकावा,

माणूसपणाच्या जातीच्या रंगाने,

अवघा समाज रंगून जावा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational