STORYMIRROR

Kanchan Thorat

Romance

3  

Kanchan Thorat

Romance

स्वप्न सुंदरी माझी

स्वप्न सुंदरी माझी

1 min
382

या नयनांनी बाण सखे 

नकोस मारुस या हृदयात

 जखमांनी घायाळताना 

नाव असे तुझेच मुखात


गुलाब पाकळ्यांच तुझ्या या 

अलगद उघड बोलताना

प्रेमगीत गुलाबी झाले 

तव ओठांतून येताना


गाल गोरे रेशमी मुलायम

तीळ साजिरा असे तयावर

हळूच यावे घ्यावे चुंबन

वाटत राही मम् हृदयास


चाफ्याची कळी कोवळी

खुलवी रुप मोहक जरी

एक मोत्याची नथ साजणी

हवीच होती तिथे तरी


सौंदर्याची राणी साजणी 

तू लावण्याची खाणी

जीव माझा तुझ्यात गुंतला

तू स्वप्न सुंदरी माझी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance