STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

4  

Mangesh Medhi

Inspirational

श्रावण सांज

श्रावण सांज

1 min
15.9K


शितल शितल मोहक हिरवळ

त्यावर कोवळ्या उन्हाची तीरीप

कुंद वाऱ्या सवे मुग्ध सुगंध

पाखरे किरिती मंजुळ साथ

प्रेमात नारंगी रंगे जलाशय

प्रसन्न आनंदी श्रावण सांज


शितल शितल....


हर्श सोह्ळी या तीच्या समेत

बेहोश व्हावे प्रेम नशेत

डाळींबी ओठांनी कानी गुंजन

गहिऱ्या लोचनी मदहोश बंधन


शितल शितल....


संधी प्रकाशी सुवर्ण तेज

खुलावा मुखी प्रेम मोहर

दिसावे ऒठी स्मित मधुर

गुलाबी खळी दोन्ही गालात


शितल शितल....


छेडती हळुच झुळुक अवखळ

नाजुक बोटांनी लाडीक सळसळ

रोमांच अंगी मनी आवेग

कर करात गुंफ़ुन बंध

सुटू नये कधी हा प्रेम छंद

सुटू नये कधी हा प्रेम छंद


शितल शितल मोहक हिरवळ

त्यावर कोवळ्या ऊन्हाची तीरीप.

प्रसन्न आनंदी श्रावण सांज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational