आरसा
आरसा
आरसा सांगे मज
माझे व्यक्तीमत्व
स्विकार बदल , बदल व्यक्तीमत्व
कर स्विकार एक नवा बदल.
आरसा सांगे मज
माझे रुप
रूपापरी बदल स्वभाव
कर स्विकार एक नवा बदल.
आरसा सांगे मज
माझा रंग
रंगा परी गुण सुंदर असावं
कर स्विकार एक नवा बदल.
आरसा सांगे मज
माझी उंची
उंची परी विचार श्रेष्ठ असावं
कर स्विकार एक नवा बदल.
आरसा सांगे मज
माझ्या उणिवा
स्विकार बदल,बदल उणिवा
कर स्विकार एक नवा बदल.
आरसा सांगे मज
माझे प्रतिबिंब
प्रतिबिंबा परी जप अस्तित्व
कर स्विकार एक नवा बदल.