मनी ठेवावे असे
मनी ठेवावे असे
नवी जुनी आठवण
नव्या उभारीचे त्राण
चैतन्याचा क्षण
पुण्याईचे वसे
मनी ठेवावे असे
माणसाचे माणूसपण
देवाचे देवपण
सत्कर्माचे गोंदण
सुखाचे पाऊल ठसे
मनी ठेवावे असे
ममतेची माया
भक्तीची छाया
पवित्र मन पवित्र काया
सदैव जपावे जसे
मनी ठेवावे असे