Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

पुस्तक

पुस्तक

1 min
193


पुस्तक मानवी मन 

पुस्तक धन आहे 

येणाऱ्या साऱ्या पिढ्यांचे 

खरे जीवन आहे 


पुस्तक आनंदाचा सागर 

पुस्तक मनोरंजनाचा खजिना 

पुस्तक नवीन चेतना 

जगाची जीवंत प्रेरणा  


पुस्तक दु:खाचा आधार 

सुखाचा मार्गदर्शक आहे 

पुस्तक धरतीची गाथा 

अनाथांची साथ आहे  


त्याच्यात विश्वास आहे 

प्रामाणिकपणा आहे 

जगाचा सारा कारभार 

तोच चालवत आहे.


पुस्तक ज्ञानाचे मस्तक 

विश्वाचा ज्ञानदाता महागुरू 

त्याच्या अगाध दानशूरतेला 

सांगा आपण का विसरू 


 पुस्तक न्याय देणारा बाप 

 कष्टाची शिकवण देणारा 

 अथांग सागरा सारखा 

 निर्मळ मनाचा राहणारा 


सत्संगाची माहिती देणारा 

कायम भले करणारा 

तोच खरा मित्र आहे 

प्रगतीच्या वाटेवर नेणारा 


पुस्तकाला नसतो जातभेद 

जो आचरण करील तयाचे 

त्याला साक्षात्कार आहे 

आदर्श जीवन सत्याचे 


निसर्गाचा खरा मित्र 

विश्वातील जीवांचा नाथ 

त्याच्यासोबत नेहमी रहाल 

तो करणार नाही अनाथ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational