यु अँड मि (क्यूट लव स्टोरी)
यु अँड मि (क्यूट लव स्टोरी)


मितेश एक वर्षांनी आलो असु आपण सिंहगडावर ,हो ना? संयुक्ताने विचारले. हो संयु मितेश म्हणाला. कॉलेज मध्ये असताना किती वेळा यायचो आपण ,आता तू आणि तुझे काम ,टेन्शन बस्स,,माझ्या साठी पण तुला वेळ नसतो मितु, मितेश ने तिला आपल्या जवळ बसवले ,तिचा हात हातात घेत म्हणाला,काय करू ग कामाचा इतका ताण असतो की बाकी काही सुचत नाही. आपल्या लग्नाला 2 वर्ष कशी झाली हे ही समजले नाही. हवेत गारवा पसरला होता,आभाळ ही भरुन आलेलं होत,पाऊस कोणत्या ही क्षणी बरसणार होता, संयुक्ता त्याला म्हणाली,मितेश कामात इतका पण बिझी राहू नकोस की मला ही विसरून जाशील. नाही ग,तुला कसा विसरेन,,बस थोडं कामातून वेळ मिळत नाही इतकंच. मितु तुला आठवत का रे,,याच गडावर बेधुंद पावसात तू मला प्रपोज केलं होतंस, हो संयु तुला पाऊस प्रिय आणि मला तितकासा नाही आवडत पाऊस,पण तुझा हट्ट होता ना की भर पावसात मी तुला प्रपोज करावं, हो,किती मस्त मजा करायचो आपण त्या दिवसात,एकमेकांच्या प्रेमात आंकंठ बुडालेलो आपण, जगाची, लोकांची पर्वा न करता मनसोक्त फिरायचो ,तू आणि मी इतकं छोटं जग होत ना आपलं. आणि आता मी सोडून बाकी सार जग तुझं आहे मितेश, संयुक्ता लटक्या रागाने म्हणाली.
आता पावसाचे मोठे मोठे थेंब अंगावर बरसू लागले, तसा मितेश म्हणाला चल संयु त्या झाडाखाली जाऊ पाऊस सुरु झाला,ती म्हणाली ,नाही तू जा मी आज पावसात भिजणार,अस म्हणत संयुक्ता दोन्ही हात पसरून पावसाचे थेंब अंगावर झेलू लागली, आणि मितेश झाडा खाली उभं राहून संयु कडे पहात होता. अगदी लहान मुला सारखं ती पावसात भिजत होती,पाण्याचे तुषार पुनःपुन्हा उंच उंच उडवत होती. पाण्याचे थेंब तिच्या केसांमधून अलगद ओघळून तिच्या गालावर येत होते,पर्पल येल्लो चुडीदार मध्ये संयु खूपच छान दिसत होती. एका हाताने ओढणी सावरत दुसऱ्या हाताने कपाळा वर येणारी चुकार बट काना मागे सरकवत होती,गालावरून येणारा पाण्याचा थेंब अवखळ पणे एखाद्या अल्लड प्रियकरा सारखा संयु च्या ओठाचे हलकेच चुंबन घेत ,पुन्हा पावसात लुप्त होत होता,,हे तिचे मोहक रूप मितेश दुरुन च पाहत होता आणि गालातल्या गालात हसत होता. किती अजून अवखळ लहान मुलीसारखी निरागस आहे माझी संयु.. किती बिनधास्त पणे प्रत्येक क्षणाचा आनंद घेते,आणि तसंच निरपेक्ष निस्वार्थी प्रेम माझ्यावर करते, मला समजून घेते,कधी कधी रुसते पण लगेचच माझ्या जवळ पण येते,आणि मी मात्र कामाच्या स्ट्रेस मुळे कायम तिला हर्ट करतो,कधी कधी ओरडतो सुद्धा ,पण ती कायम मला समजून घेते,काय मागते ती माझ्या कडून फक्त माझा थोडा वेळ आणि थोडा सहवास,,असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. संयु त्याच्या जवळ आली,ती पूर्ण भिजली होती,त्याला हाताला धरून ओढत म्हणाली चल ना मितु किती मस्त वाटत बघ पावसात भिजून,,सगळं टेन्शन विसरून रिलॅक्स वाटत,,ये ना,,मितेश हॉऊ अनरोमँटिक यू आर,,,तिने त्याला चिडवले,,तसा मितेश तिच्या साठी पावसात आला,,तिला अचानक त्याने आपल्या हाताचा विळखा घालून आपल्या जवळ आणले. तिच्या डोळ्यात पहात म्हणाला, काय म्हणालीस, मी आणि अनरोमँटिक.. ती लाजली आणि खाली नजर फिरवली, त्याने पुन्हा हाताने तिचा चेहरा वर उचलला,,म्हणाला,किती गोड दिसतेस यार,,तुझी ही गालावरची लाली, हे गुलाबी ओठ आणि हे तुझे चिंब भिजलेले रूप सजलेले,,तो एकटक पहात होता तिच्या कडे,,ती म्हणाली,मितेश काय एकदम फिल्मी, हो,,तूच म्हणाली ना मी अनरोमँटिक आहे ,,मग आता सांग ,म्हणत तिच्या ओठावर आपले ओठ टेकवणार तितक्यात संयुक्ता त्याला ढकलून दूर पळाली,आणि पुन्हा त्याला चिडवत म्हणाली,काय मग मिस्टर रोमँटिक पावसाने जादू केली ना,तो तिला पकडायला जाऊ लागला तशी संयु पुढे पळत होती,,तसा मितेश ओरडला संयु पावसात पळू नकोस पडशील,,इतके म्हणे पर्यंत संयु एका दगडाला पाय लागून पडणार होती तेव्हा मितेश ने पटकन पळत जाऊन तिला आपल्या मिठीत पकडले आणि तिला ओरडला तुला बोललो ना पडशील म्हणून का ऐकत नाहीस तू संयु,,त्याने बोलताच तिचा चेहरा पडला. तिच्या कडे पहात मितेश जोरजोरात हसू लागला,बघ बघ कशी घाबरलीस मला,,कशी गंमत केली,,म्हणत तो अजूनच तिला चिडवू लागला,ती त्याला मारायला लागली तसा तो ही पळू लागला.
वरून पाऊस बरसत होता आणि इथे हे दोघे एकमेकांच्या सहवासात चिंब चिंब होत होते,संयु ला आता थंडी वाजत होती ती एका झाडा खाली थांबली मितेश ही आला,म्हणाला काय मग दमलीस का इतक्यात अजून भिजायचं नाही का? मितेश नको आता बास मला थंडी वाजते आहे,, तसा मितेश खट्याळ पणे म्हणाला,मग मी काय करू ज्याने तुझी थंडी पळून जाईल,, गप बैस मित्या,,संयु लाडाने त्याला मित्या म्हणत असे. मितेश ने तिचे हात हातात घेतले ,तिच्या डोळ्यात पहात म्हणाला,संयु खूप दिवसांनी आपण असे एकत्र फिरत आहोत ना,मी फक्त कामच काम करत राहतो,पण तू माझी वाट पहात असतेस हे ही माझ्या गावी नसते,खूप कमी वेळ देतो ना मी तुला. संयुक्ता बोलली,मितेश तुला वर्क लोड असतो खूप हे मला माहित आहे,मग जमेल तसा वेळ तू मला देतोस ना,मी काही तक्रार केली का,? हेच संयु तू तक्रार करत नाहीस कारण मी ओरडतो चिडतो म्हणून तू समंजस पणे गप राहतेस,,किती समजून घेतेस तू मला.. आणि मी मात्र, मितु असे काही नाही, तू देशील तितका वेळ मला पुरेसा आहे राज्या,,मितेश ने तिला आपल्या बाहुपाशात घेतले,म्हणाला,आज खूप छान वाटलं तुझ्या सोबत वेळ घालवला,इथून पुढे मी नक्की तुझ्या साठी वेळ काढेन संयु,,मी इतके दिवस काय गमवत होतो हे आज मला समजले ग,आपला हा क़्वालिटी टाइम किती मिस केला मी. मितेश आय लव यू अण्ड ऑलवेज विथ यु डियर,,असे म्हणत सयुक्ता ने त्याला घट्ट मिठी मारली. मितेशने आपली मिठी सोडली आणि तीला म्हणाला,संयु हे बघ,आणि तो गुडघ्या वर बसला तिचा हात् आपल्या हातात घेत म्हणाला,माय स्वीटहार्ट संयु आज मी पुन्हा एकदा नव्याने तुझ्या प्रेमात पडलो आहे ,आय लव यू जान,,आय रियली लव यू,, आणि त्याने तिच्या हाता वर किस केले,सयुक्ता ही खुप खुश झाली.मितेश ने पुन्हा तीला आपल्या मिठित घेतले आणि म्हणाला जायचे का आता घरी,, हो मितेश म्हणत ते दोघे त्यांच्या कार कड़े निघाले,घरी आले,संयु फ्रेश होउन् आली तर मितेश ने दोघां साठी मस्त कॉफी बनवली होती,कॉफी संपली तसे मितेश म्हणाला,मग सांग संयु कशी झाली होती कॉफी? ती म्हणाली ठीक पन तूझ्या इतकी स्वीट नव्हती ना! अच्छा म्हणत मितेश तिच्या जवळ आला,तिच्या गालावरुन आपले बोट फिरवत म्हणाला ओह्ह म्हणजे तुला स्वीट हवे आहे तर,, तसे काही नाही मित्या,,मग असे बोलत मितेश ने तिचे ओठ आपल्या ओठानी कैद केले,पुन्हा एकदा हे प्रेम वेडे प्रेमाच्या पावसात चिम्ब भिजत होते. बाहेर पाऊस अजुन ही बरसत होता,जणु या दोघांच्या प्रेमाचा तो एकमेव साक्षीदार होता...!!!!