Sangieta Devkar

Romance Others

3  

Sangieta Devkar

Romance Others

यंदा कर्तव्य आहे #सरळ शब्दात

यंदा कर्तव्य आहे #सरळ शब्दात

5 mins
306


पल्लवी चा आज 26 वा वाढदिवस होता. सगळे नातेवाईक तिला फोन वर विश करत होते. घरच्या फॅमिली व्हाट्स अँप ग्रुप वर तर आता पल्लू ला 27 वय सुरू मग लग्ना चा काही विचार केला की नाही. अश्या आशयाचे बरेच मेसेज येत राहिले. या सगळ्यांना ती वैतागली होती. ग्रुप मधून बाहेर पडावे असे तिला वाटत होते पण घरचे च सगळे जवळचे नातेवाईक त्यात होते सो ग्रुप सोडला तर किती माज आहे हिला असे पण बोलतील. म्हणून ती गप्प राहिली. तिच्या आई ने मात्र हो चालू आहे पल्लू ला स्थळ पाहणं असा रिप्लाय दिला. तशी पल्लवी म्हणाली. आई कशाला उगाच खोट सांगतेस सरळ सांग ना मी सध्या लग्नाला तयार नाही म्हणून. पल्लू अग आता 26 वय पूर्ण झाले तुला अजून किती वर्षे थांबणार आहेस? योग्य वयात लग्न नाही झालं तर पुढे खूप अडचणी येतील. मनासारखा मुलगा पण नाही मिळणार आणि तब्येत पण नीट राहणार नाही. तुझे नुसते बैठे काम आहे घरी आणि ऑफिस नुसतं बसून असतेस काही व्यायाम सुद्धा करत नाहीस. आई मला कामातून वेळ मिळत नाही कधी मी जिम ला जाणार आणि लग्न व्हायचे तेव्हा होईल मला आधी सेटल होऊ दे. पल्लवी अग चांगला जॉब आहे पगार ही चांगला मिळतो सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेस तू अजून काय सेटल व्हायचं तुला? नाही आई अजून खूप स्वप्न आहेत माझी ती मला पूर्ण करू दे. एकदा लग्न झाले की काही करता येत नाही. मला प्रमोशन साठी प्रयत्न करायचा आहे पुढची पोस्ट मिळवायची आहे. पल्लू हे लग्नानन्तर पण होते. मुलगा समंजस असेल आणि दोघांनी एकमेकांसाठी तडजोड केली की सगळं जमते. नाही आई मी पाहिले आहे माझ्या मैत्रिनीं चे नवरे खूप इगो असतो ग त्यांना नवरा म्हणून मग बायको आपल्या पेक्षा मोठया पदावर काम करते आपल्या पेक्षा जास्त कमवते हे त्यांना सहन होत नाही.असे काही नसते पल्लू उगाच दुसऱ्याच्या अनुभवा वर आपले मत नको बनवू. आई आता राहू दे हा विषय बघू माझ्या मनात असेल तेव्हा मी करेन लग्न. मग आई ही गप बसली.

दुसऱ्या दिवशी पल्लवी ऑफिस ला गेली. हे गुड मॉर्निंग पल्लवी निषाद ने तीला विश केले. गुड मॉर्निंग निषाद. मग कसा झाला बर्थ डे काल? अरे काही नाही विशेष मी आई बाबा बस घरीच केला . आज ऑफिस नंतर भेटशील का पल्लवी कॉफी घेऊ . ओके चालेल म्हणत पल्लवी तिच्या डेस्क कडे गेली. निषाद तिचा कलीग स्वभावाने शांत आणि कामात परफेक्ट. दिसायला एकदम हँडसम चॉकलेट बॉय कोणी ही त्याच्या प्रेमात पडेल त्याला पाहता क्षणी. पण तो पठ्या पल्लवी वर जीव लावून बसला होता तिला याची माहिती होती तो बोलला ही होता तीला... पण हीच आपलं एकच मला आताच लग्न नाही करायच. निषाद तिला आवडत होता पण लग्नानंतर तो इतर पुरुषां सारखा वागू लागला तर? मला समजून नाही घेतले तर असे प्रश्न तिला पडले होते सो ती अजून त्याला हो बोलली नवहती. ऑफिस सुटल्यावर दोघे कॉफी साठी गेले. निषाद ने पल्लवी समोर एक बॉक्स ठेवला म्हणाला,हे घे तुझे बर्थ डे गिफ्ट . निषाद अरे मी नाही हे घेऊ शकत ? का नाही घेऊ शकणार तुला माहीत आहे ना पल्लवी माझं तुझ्या वर प्रेम आहे. म्हणूनच नको हे गिफ्ट. कारण मी तुला अजून होकार दिलेला नाही. पल्लवी एका मित्रा कडून म्हणून तरी घे गिफ़्ट प्लिज. ओके म्हणत पल्लवी ने ते घेतले. निषाद ने कॉफी ऑर्डर केली. पल्लवी उघडून तरी बघ ना. ओके म्हणत तिने बॉक्स उघडला. त्यात एक सुंदर मोत्याचा हार आणि कानातले होते. छान आहे निषाद थँक्स. पल्लवी तू काही विचार केला आहेस का? कशा बद्दल निषाद ? पल्लवी अग माझ्या प्रपोजल चा तू विचार केला का? नाही निषाद मला नाही करायचं इतक्यात लग्न तू माझा विचार सोडून दे. पल्लवी मी प्रेम करतो ग तुझ्यावर आणि काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. निषाद मला प्रमोशन मिळवायच आहे अजून सेटल व्हायचे आहे मना सारख. मग मी कुठे तुझ्या करियर च्या मधये येत आहे आणि तू जे करशील ते मला मान्य असेल. मी असेन सोबत कायम तुझ्या. निषाद माझ्यावर माझ्या आई बाबांची पण जबाबदारी आहे. मी कुठे नाही म्हणतो पल्लवी ते जसे तुझी जबाबदारी आहेत तसे मी ही घेईन ना त्यांची जबाबदारी. तुला विश्वास नाही का माझ्या वर?. निषाद तू आता सगळं मान्य आहेस असे बोलत आहेस पण उद्या लग्न झाल्यावर तू नवऱ्याच्या भूमिकेत जाशील मग माझं वागणं माझी नोकरी ,पगार सगळं खटकायला लागेल तेव्हा काय करू मी? पल्लवी अग मी तसा इगोस्टिक नाही ग. मला पण समजते की बायकोला ही पुरुषा इतकाच मान सन्मान द्यावा. तिला तिची स्पेस द्यावी. आणि मी माज्या मतावर ठाम आहे. बघू निषाद मला वेळ हवा. गेली वर्षंभर मी वाट पाहतोय पल्लवी तुझी वेळ येतच नाही. चल मला लेट होतोय म्हणत पल्लवी उठली. ओके बाय म्हणत निषाद ही निघाला. पल्लवी घरी आली.

निषाद चे बोलने तिला कुठे तरी पटत होते. जो मुलगा गेली वर्ष भर आपल्या होकाराची वाट पाहत आहे तो खरच तसा समंजस असेल. आजकाल ची मूल अशी वाट बघत बसनारी नाही आहेत. आई बाबांशी बोलू का निषाद बद्दल असा विचार पल्लवी करू लागली मग काहीतरी निर्णय घेवून तिने रात्री जेवताना निषाद बद्दल आई बाबा ना सांगितले. आई म्हणाली,पल्लू अग मग छानच आहे ना ! तुला जसा मुलगा हवा आहे तसाच आहे निषाद आता तू मनावर घे. उद्या वेळ निघुन गेली तर पश्चताप करण्यात काय अर्थ आहे? बाबा म्हणाले,हो बाळा आई बरोबर बोलत आहे. निषाद खरच चांगला वाटतो तू त्याला घरी बोलाव. पण आई बाबा माझी एक अट असेल. काय आता बोल पल्लू आई म्हणाली. जर निषाद लग्ना नन्तर बदलला तर मी त्याच्या सोबत नाही राहणार. बर तू म्हणशील तसे. बाबा बोलले. रविवारी निषाद त्याच्या आई बाबाना सोबत घेऊन पल्लवी ला पाहायला आला. त्याला एक बहिण होती तिचे लग्न झाले होते ती बाहेर देशी होती. पल्लवी निषाद च्या आई बाबाना आवडली. लवकरच साखरपुडा उरकुन लग्नाची तारीख फिक्स करू असे ठरले. निषाद पल्लवी ला म्हणाला थैंक यू पल्लू मी माझा शब्द नक्की पाळेन ट्रस्ट मि. हो रे आय ट्रस्ट यु. आय लव यू पल्लवी आय लव टू निषाद..दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून गेले.


 अलिकडे सर्वच मुला मुलीं च्या लग्ना बाबत खुप अपेक्षा वाढल्या आहेत. शिक्षण आणि करियर यात दोघांचे लग्नाचे वय निघुन जाते मग मना सारखे स्थळ मिळत नाही. आणि आजची मूल आई वडिलांच म्हणावे तितके ऐकत नाहीत. पण योग्य वयात लग्न होण हे ही गरजेचे आहे. आताच आपल्या सरकारने मुलीचे लग्नाचे वय अठरा वरुन एकविस केले आहे. पण आज ही खेड़ोंपाडयात मुलगी म्हणजे ओझ मानतात.तिचा शिक्षनाचा खर्च मग लग्ना साठी हुंडा या गोष्टि चा विचार प्रामुख्याने केला जातो . काही ठिकाणी मुलीचा जन्म आज ही नाकारला जातो. मुलगी नोकरी करणारी असली तरी जबाबदारी असच वाटत राहते. त्यात अजुन दोन वर्ष म्हणजे 21 वया पर्यंत तिला सांभाळने म्हणजे अवघड़च! अशी मानसिकता ग्रामीण भागात पाहायला मिळते. त्यातून ही मुलीची सुरक्षित ता हा प्रश्न आज ही गंभीर आहेच. बालिका असो किंवा तरुणी तिच्या वर होणारे लैगिक अत्याचार कमी झाले नाहीत. घरी बाहेर कुठेही मुलगी सुरक्षित नाही. लग्नाचे वय वाढवले तसे कायद्या मध्ये ही कठोर शासन हवे. आज च्या काळात मुलीं आणि महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance