Dr.Smita Datar

Fantasy Action

2  

Dr.Smita Datar

Fantasy Action

याला जीवन ऐसे नाव

याला जीवन ऐसे नाव

2 mins
3K


एक कचरा गोळा करणारा मुलगा. मोठा कचऱ्याचा ढीग. एका कोपऱ्यातून धूर येतोय. Thermacol plates, ग्लास, रिकाम्या पाण्य्याच्या बाटल्या. प्रचंड उन आहे. बाटलीत पाणी आहे बघतो. थेंबभर मिळेल म्हणून तोंडाला लावतो. रिकामी आहे म्हणून पिशवीत ठेवतो. एक तुटका काळा चष्मा मिळतो, तो घालून सूर्याकडे बघतो. इतक्यात कॉम्पुट चे सुटे भाग सापडतात. काही वायरी. मुलगा काहीतरी खेचाखेच करतो आणि छोटा स्फोट होतो. मुलगा घाबरून पिशवी घेऊन पळत सुटतो. धावताना रस्त्यावर धूर ओकणारी वाहने, वाहनांचे कर्कश होर्न. एवढ्यात पाण्याचा एक tanker जातो. त्याच्या मागच्या नळातून पाणी वाहतंय. मुलगा त्याच्यामागे पळतो. जोरजोरात अओरडतो, "ए tanker ..पाणी ..पाणी!"

tanker निघून जातो .

"आयला ..xxxx .." शिवी देतो.

पळत पळत घराकडे येतो. साधे कापड, प्लास्टिक लावलेली झोपडी. दारुडा बाप बिडी फुंकतो आहे आणि खोकतो आहे. तिथेच थुंकतो. बाहेर नळावर तीन चार बायका प्लास्टिक चे हंडे, डबे घेऊन रांगेत उभ्या अआहेत तोच पाणी जाते अआणि म्हणून बायका भांडायला लागतात.

मुलाची आई : "अग ए भवाणे, आज माझा नंबर व्हता."

दुसरी बाई: "ए चल हो बाजूला ..आली मोठी नंबर वाली." ( धक्का देते )

मुलाची आई :"तुला मी आज जीत्ती सोडत नाय ..( मारामारी )

मुलगा मारामारी न सोडवता हंड्यात पाणी आहे का बघतो आणि निराश होतो. झोपडीत परत येतो, आई पण येते आणि डोक्याला हात लावून बसते.

मुलगा रडवेला होऊन अआँला म्हणतो, "आय, आपुन गावाला आज्या कडे जाऊया."

आई : "कशापायी?"

"तितं आंबे ..चिचा तरी मिलतील."

"ठेवल्यात तुझ्या बा ने ..तिथे दुस्काल पडला म्हनून हिते हाव ना आपून!" (डोक्याला हात लावते )

मुलगा रागाने परत झोपडी बाहेर पडतो . हताश होऊन परत रस्त्याच्या कडेने भटकतोय .त्याला एक शहाळे दिसते .(रस्त्यावर कचरा, वाया जाणारे पाणी, वाया गेलेले अन्न दिसते. एका लग्नाच्या हाॉॉल बाहेर. आत तिथे जेवणावळी, चमचमणारे दिवे, वाया जाणारी वीज, बर्गर खाणारी मुले ... ....

शहाळे रिकामे असते. तोंडाला लावतो. खरवडतो.

वैतागून शहाळयाला लाथ मारतो. ते जिथे पडते, तिथे आंब्याची कोय सापडते. मुलगा खूष होतो. लगबगीने आणि उत्साहाने चांगली जागा शोधतो. कोय पेरतो. काटे, फांद्या आणून कुंपण घालतो . रिकामे शहाळे घेऊन वडापाव च्या गाडीवर जातो . एक बाई बश्या विसळत असते , त्यातले खरकटे पाणी शहल्यातून आणतो आणि आंब्याच्या कोयीला घालतो. खुषीत हसतोय.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy