Lata Rathi

Comedy

1  

Lata Rathi

Comedy

वर्क फ्रॉम होम

वर्क फ्रॉम होम

3 mins
521


  टीव्हीवर बातम्या सुरू होत्या, महाराष्ट्र शासनाने महत्वाचा निर्णय घेतलाय....

मी किचनमध्ये... पण लक्ष मात्र पूर्णतः टीव्हीवरील बातम्यांकडे...

  कालच ऐकण्यात आलं, दुबई, इजिप्त मधून प्रवास करून परतलेली एक स्त्री ....ती कोरोना ची patient म्हणून डिटेक्ट झालीय...आमच्या गोंदिया जिल्ह्यातील ही पहिलीच केस.

खूप भीती वाटली प्रथमतः ही बातमी ऐकून....कारण मुलगी विदेशात....मुलगा पुण्याला...

दोन्ही कडे कोरोनाच वास्तव्य.

पून्याला तर आचार संहिता पण लागू झालीय म्हणे....

तिथे सुद्धा कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम" चालू केलय.

  तेच तर सांगायचं होत....मी माझंच पुराण लिहीत बसले...

 लेखनाचं असच असतं... जे लिहायचं ते राहून जातं.... आणि नेमकं विषयांतर होत...

  तर झालं असं....

टीव्ही वर बातम्या सुरू होत्या, कॉरोना पासून बचाव करण्यासाठी शाळा, collage ला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम" दिलं गेलं...,घरी बसून ऑफिसच काम करा..

  एवढ्यात आमची कामवाली बाई..."शांताबाई" आली. तीच चहापाणी झालं... हातात झाडणी घेतली, नि निघाली स्वारी घराची झाडलोट करायला.

टीव्ही तर सुरू होताच...कधी कार्टून तर कधी news... म्हणजे ब्रेक आला की आलटून-पालटून...नवरा आणि बच्चे पार्टी दोन्ही खुश....

टीव्ही वरील बातमी देणारी व्यक्ती एकच बातमी दहा वेळा तर नक्कीच बोलणार...आमची "शांताबाई" झाडत होती....घर

आणि नेमकं तिच्या कानावर आलं... महाराष्ट्र शासनाने आत्ताच निर्णय घेतलाय... सर्वांनी "वर्क फ्रॉम होम" करावं.... जेणेकरून एकमेकांच्या संपर्कात न राहता कोरोना पासून बचाव करता येईल...पण काम बंद नाहीं करता येणार.....काम तर करायचंच पण...

घरी बसून...

हे ऐकून शांताबाईच्या डोक्यात कोनतं भूत घुसलं.... काय माहिती....

पटकन झाडणी खाली ठेवली...दोन्ही कमरेवर हात ठेवून उभी राहिली....

आणि म्हणाली," ताई आता मी घरी जातेय"...

मी म्हटलं...का गं,  काय झालं एकदम तुला....चक्कर-बिक्कर तर नाही ना येतं...

शांताबाई म्हणाली, "ताई म्या ठीक हाये,....पण आता मीबी ठरवलं....मी पण "वर्क फ्रॉम होम" करणार.....तो करोना का काय आला ना...तं आत्ताच आपले मुख्यमंत्री साहेब म्हणले...बाहेर निंगु नका....घरात बसून काम करा...

पहा बरं ....तुमचे साहेब बी घरीच...., पोर बी घरीच.... तुमी बी घरीच....मंग मी बी घरीच जाते आता....नाहीत तो कोरोना का फेरोना मलेच पकडन ताई....सगळे घरी आणि मी मातर बाहेर....

नाही...नाही.. बाई....

मी तिला समजावलं, "अग तू काम करू शकतेस....काही होणार नाही... फक्त तू काळजी घे...प्रत्येक घरी काम केल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे, तोंडाला स्कार्फ बांधायचा.....

पण "शांताबाई" मात्र अडूनच बसली...अहो ताई...मी काम बंद करायला कुठं नाही म्हणते...

मी बी काम करीन.... पण घरी बसून... वाटल्यास तुमी माया घरी कपडे, भांडे, साबण, सर्फ सगळं पाठवून द्या....मी सगळं करून ठेवीन.... मंग सायंकाळी तुमि आपल्या घरी घेऊन जा....बस....एवढंच कराचे तुमाले....आता साहेब बी त घरीच हायेत....आणतील ना गाडीतून माया घरी ....धुन-भांडी... रायल ...झाडू-पोछा....तर "ते" बी मदत करतीलच की....

  आता मात्र माझी " खूप सटकली"...

एक जळता कटाक्ष टीव्ही कडे टाकला...आणि डोक्यावर हात ठेवून खालीच बसले...काय बोलू आता????

अनुत्तरित होते मी....

"जळलं मेलं- वर्क फ्रॉम होम"

मी उठले, पदर खोसला, आणि म्हटले, "शांताबाई, खुशाल घरी जा.... आम्ही पोहोचवू हा... तुमच्या घरी धून आणि भांडी...

जा तू घरी.....आणि कर बाई 

" वर्क फ्रॉम होम"

   आणि माझ्या आदेशाची जणू ती वाटच बघत होती....मस्त ऐटीत निघाली... "वर्क फ्रॉम होम करायला."

  आणि मी मात्र बसले....घरातला पसारा आवरायला, धुनी- भांडी करायला....

अशी ही "WORK FROM HOME" .....ची कहाणी

"शांता बाईच्या जुबानी"

   आणि मनात विचार आला...

(सगळ्यांना "वर्क फ्रॉम होम".....मग गरिबांना का नाही. माहिती आहे मला....आपल्याला त्याच्याशिवाय जमतच नाही...

दहा घरी काम करणारी "ती"

तिला काही झालं तर...

मनाला भेळसावणारा प्रश्न?

पण त्यांनाही जीव आहे....आणि विशेष म्हणजे तिला कळतंय...अशिक्षित असूनही.... आपली काळजी आपण कशी घ्यायची ते.)

देऊयात त्यांना पण सुट्टी

आपल्याला काय वाटतं, तिने घेतलेला निर्णय योग्य आहे.....नक्की कळवा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy