Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

चारुलता राठी

Inspirational


3  

चारुलता राठी

Inspirational


ओझे अपेक्षांचे

ओझे अपेक्षांचे

3 mins 225 3 mins 225

"बरबादियो का सोंग मनाना फजुल था।

मनाना फजुल था।

बरबादियो का जशन मनाता चला गया।

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया."


पुण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर रोज गाणी म्हणतं आपलं पोट भरणारा एक भिखारी राहुलकडे आला. तसं पाहिलं तर या नश्वर जगात आपण सर्वच आपल्या जीवनाच्या खऱ्या दिशा म्हणजे योग्य करिअर साठी, स्वस्थ आरोग्यासाठी,आणि मुख्य म्हणजे पैसा कमविण्यासाठी भटकत आहोत. असो...

   

राहुल तसा नागपूरकर, पुण्याला आयटी मध्ये नौकरी करायला आलेला. सोमवार ते शुक्रवार 9ते 6 कंपनीत आयटी जॉब करणारा राहुल दिवाळीला घरी जायच्या तयारीत होता. थोडा उत्साहित पण तेवढाच निराश सुद्धा. कारण 28 वर्षाच्या राहुलला आता घरचे लग्न कर म्हणून मागे लागले होते.

त्यात हे गाणं त्याला जणू त्याच्या परिस्थितीशी मेळ घालणारं वाटतं होतं.


जॉब- ही एक बरबादी....

लग्न -ही एक बरबादी.....

लहानाचे मोठे होणं ही त्याच्या दृष्टीने एक बरबादी.

(असं त्याचं व्यक्तीगत मत).


तेवढ्यात एक अनाउन्समेंट होते... प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून सुटणारी "नागपूर-गरीबरथ" निर्धारित वेळेपेक्षा 2 तास उशिरा चालत आहे.....

आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल आम्हाला खेद आहे!  हा...हा...हा ..... असुविधेबद्दल खेद! परत एकदा ट्रेनने लवकर घरी पोहोचण्याचा सर्व प्रवाश्यांच्या 'अपेक्षेवर' पाणी फेरलं. ही आपली मानसिक tendency असते. पहिले अपेक्षा निर्माण करणं, आणि नंतर जर त्या पूर्ण करता येत नसतील तर आम्हाला खेद आहे, असं म्हणून माफी मागणं. असो.....


  राहुलचं बालपण तस खूप दुःखात गेलं, लहानपणीच पित्याच छत्र हरवलं. दोन बहिणी, आई यांची जबादारी अजानत्या वयात त्याच्यावर आली. कुठल्याही कार्यक्रमात गेला की नातेवाईक म्हणायचे, 'तुला खूप अभ्यास करून लवकर नोकरीवर लागायचे आहे, आता घरचा कर्ता-धर्ता तूच....आईची आणि बहिणीची जबादारी आता तुझीच'.( तसे आहोत आम्ही तुझ्या मदतीला)....पण खरं पाहता कोणीचं कोणाचं नसतं. त्याच्या बालसुलभ मनाला कधी मोठपणाची जाणीव आली कळलंच नाही. आपले बालपण तो कुठंतरी हरवून बसला होता.


शाळेतून घरी आल्यावर आईला घरकामात मदत ,अशी आईची अपेक्षा.... रविवारी भाजी, किराणा, काही दुरुस्तीचे काम ते संपवण्याची अपेक्षा.....

लहान बहिणींना फिरायला घेऊन जाणे, त्यांचे लाड- कौतुक करणे ही एक अपेक्षा... बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून राहुलला खर तर एम बी बी एस करून डॉक्टर बनायचे होते. पण त्याच्या या निर्णयात घरच्या मोठ्या लोकांची "अपेक्षा" जरा वेगळीच, त्यांनी राहुलच्या डॉक्टर बनण्याच्या निर्णयाला विरोध केला, कारण...

1) डॉक्टर बनायला लागतात 6 ते 7वर्षे.

2) आणि त्यानंतरही स्वतःच हॉस्पिटल उभारण म्हणजे स्वतःची भली मोठी जागा, वेगवेगळ्या मशिनरीज... खूप खर्च.


झालं...  आल्या करिअरच्या "अपेक्षा".... शेवटी सर्वांच्या "अपेक्षेला " मान देऊन आणि या विचारात हे 'अपेक्षेचं ओझं' कधीतरी संपेल....सगळ्यांच्या सहमतीने इंजिनीअरिंग करायचा विचार केला. म्हणजे 4 वर्षात नोकरी हमखास मिळणारच.


नागपूरला नामांकित कॉलेज मध्ये आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करून तो अभ्यंत्रिकीच्या तिसऱ्या वर्षातच इंटर्नशिप साठी पुण्याला गेला. इंटर्नशिप नंतर तीच कंपनी तुम्हाला नोकरी देणार ही राहुलसह सर्वांची "अपेक्षा" पण काही कारणास्तव राहुल तिथे नोकरी करू शकला नाही. असेच सहा महिने निघाले.......आता परत नौकरी च्या शोधात. एक एमएनसी मध्ये त्यांना हवी तशी प्रोफाइल मिळविण्याची कंपनी ची वेगळी "अपेक्षा"...

शेवटी राहुल ला तीस दिवसाच्या आत एका कंपनी मध्ये त्याला हवी तशी नोकरी मिळाली. त्याला वाटलं, चला, आता तरी अपेक्षांचं ओझं थोडं कमी होईल. पण......


या सर्वात मोठी जबादारी होती त्याच्यावर ती म्हणजे....दोन्ही बहिणींच्या लग्नाची. आता कंपनी मध्ये त्याच्या वयाचे, त्याच परिस्थितीत जॉईन करणारे कितीतरी मुलं, मुली....यात चांगलं काम करून छान salary package वाढवून घेण्याची राहुलची कंपनी कडून 'अपेक्षा'...या सर्व 'अपेक्षेवर' खरे उतरून राहुल ने पाच वर्षात आपल्या दोन्ही बहिणींची लग्न चांगल्या कुटुंबात करून दिली. आता तो आपला स्वतःचा फ्लॅट घेऊन आईला पुण्याला बोलवून तिथेच सेटल्ड व्हायच्या तयारीत होता.


   प्लॅटफॉर्म वर 2 तास कसे गेले काही कळलंच नाहीं. तेवढयात ट्रेन च्या हॉर्न चा आवाज आला... आणि तो आपल्या विचारांच्या तंद्रीतून जागा झाला. थ्री टायर एसीच्या आपल्या बर्थ वर जाऊन बसतो, आणि आता छानपैकी झोपायचं या विचारात तो झोपायची तयारी करतो. तेवढ्यात आईचा फोन...

"बेटा, या सात दिवसांच्या सुटीत आपण तीन, चार स्थळ बघायची.... आणि त्यातलीच एक मुलगी पसंत करून या वर्षी लग्न आटपू या....पण मुलगी मात्र सर्वांना घेऊन चालेल, सर्व छान सांभाळेल अशीच हवी हं".

हो गं आई, जशी तुझी इच्छा... आईला होकार तर दिला.... पण तो स्वतःच मनोमन पुटपुटला.


"ओझे हे अपेक्षांचे

कधीही न संपणारे

कधीही न संपणारे...."


खरचं वाचक मित्र-मैत्रीणींनो ' अपेक्षा ह्या अश्याच असतात, कधीच न संपणाऱ्या....एक संपली की दुसरी तयार....

कधी कधी वाटतं ना! 

अपेक्षा ह्या नकोतच....हो ना!


Rate this content
Log in

More marathi story from चारुलता राठी

Similar marathi story from Inspirational