Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Sanjay Raghunath Sonawane

Drama Inspirational


4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Drama Inspirational


वणवा

वणवा

4 mins 241 4 mins 241

एकांकिका 

(पात्र : कोकिळ पक्षी, चिमण्या, बिबट्या, आपट्याचे झाड, मुलगा, वाघ) 


झाड : थांब मला मारू नकोस...


मुलगा : (इकडे तिकडे पाहू लागला.) कोण आहे तिकडे?


झाड : इकडे पाहा मी झाड बोलत आहे. मला मारू नकोस. मला व माझ्या लेकरांना त्रास होतोय.


मुलगा : पण मी तुला झाड कसे म्हणू? तुला तर पाने नाहीत, फांदया नाहीत, अजून कोणती तुझी लेकरे?


झाड : सगळे काही सांगतो; पण तुला माहीत आहे? माझी अशी दशा कोणी केली?


मुलगा : कोणी केली तुझी अशी दशा? त्याचा माझ्याशी काय संबंध?

 

झाड : मीही तुझ्यासारखा लहान होतो. मी परिस्थितीचा संघर्ष करत मोठा झालो. माझ्या अंगाखांद्यावर आताच कुठे पक्षी किलबिलाट करत होते. संसार मांडू लागले होते. खेळत बागडत होते. पण नियतीला ते काही पहावले नाही. ही नियती दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती होती माणसाची लोभी वृत्ती.


मुलगा : मी अजून नाही समजलो?


झाड : तुला होळी हा सण आवडतो का?


मुलगा : होय तर. आम्ही त्या दिवशी खूप शिमगा खेळतो.


झाड : तुमचा हा शिमगा मला व माझ्या निष्पाप लेकरांना सजा ठरला आहे. या वर्षीच्या होळीसाठी काही लोकांनी माझे हात, पाय कापून नेले. माझ्या लेकरांची व आमची घरे उद्ध्वस्त केली. संसार उद्ध्वस्त झाला. आता कुठे पावसाळ्यात मला पाने, फांदया येऊ लागल्या होत्या. मी आनंदी झालो. स्वप्न रंगवू लागलो. पण पुन्हा माझ्या स्वप्नांवर कुऱ्हाड मारली. या माणसाने एक दिवसाचा सण साजरा करण्यासाठी कित्येक दिवसांपासून पाहात असलेले स्वप्न त्यांनी क्षणार्धात उद्ध्वस्त केले. तुम्ही दसऱ्याला जी पाने वाटली ती माझीच पाने होती.


दृष्य : (चिमणी व कोकीळ झाडाजवळ येतात.) 


मुलगा : अरे व्वा! चिमणी आणि कोकीळ किती दिवसांनी पाहिली.


झाड : यात आश्चर्य काय? थोड्या दिवसांनी त्यांचे चित्र दिसतील.


मुलगा : असे का म्हणतो?


चिमणी : थांब मीच सांगते, आमच्या किलबिलाट बंद होण्याला माणूस कारणीभूत आहे.


कोकीळ : तुला माझा मधुर आवाज ऐकायला येतो का?


मुलगा : नाही, पण त्याला माणूस जबाबदार कसा? तुमच्या पंखांना आणि पायांना काय झाले?


चिमणी : झाडे गेली आणि आमची घरे गेली. उंच आकाशात भरारी घेणे भयानक वाटू लागले आहे. तुझ्याचसारखी मुले पतंग उडवत असताना त्यांच्या मांज्यात माझे पंख गुरफटले गेले. त्या मांज्यासोबत मी दोन दिवस झाडावर अडकून पडले होते. काही भल्या माणसांनी मला तेथून सोडविले. आता मी पक्षी असूनही उडू शकत नाही.


कोकीळ : प्रदूषणामुळे माझाही जीव गुदमरला आहे. माझे मित्र, आप्त सुरक्षित जगण्यासाठी जागा शोधत भटकत आहे. तुम्ही आमची नाती तोडली. काही शिकार शौकिनांच्या हौसेसाठी माझा डोळा आणि पाय गमवावा लागला. आता मलापण कुठेतरी लपून बसावे लागणार आहे.


मुलगा : तुमची ही अशी दशा आमच्यामुळे झाली हे खरेच वाटले नव्हते. याची मला आता लाज वाटू लागली आहे. इथे एवढी हिरवळ आहे, साप तर नाही ना?


झाड : तू त्याबद्दल निश्चिंत रहा. कसे असतील इथे साप?


मुलगा : असे का म्हणतो?


झाड : तस्करांच्या सुळसूळटामुळे आधीच साप कमी झाले आहेत. काही माणसे माझ्या मित्रांना नागपंचमीसाठी घेऊन गेले. आता उरले सुरले भीतीपोटी बाहेरच येत नाही.


मुलगा : इथे इमारती होण्याआधी वाघाचे अस्तित्व होते हे कितपत खरे? इथले अवाढव्य डोंगर कुठे गेले? छोट्या, छोट्या नद्या कुठे गेल्या? यालाही माणूसच कारणीभूत आहे का?


कोकीळ : हे खुद्द वाघोबाच सांगतील.


वाघ : घाबरू नकोस मी तुला खाणार नाही. दुसऱ्यांनी जरी आमचे वाईट केले तरी त्याचे वाईट करण्याची आमची कृतघ्न बुद्धी नाही. मी काय तुझी शिकार करणार? ना मला नखे ना मला दात?


मुलगा : कुठे गेले तुझे दात आणि नखे? चित्रात तर तू फार शूर वाटत होता.


वाघ : शूरच होतो मी. साऱ्या जंगलात राजासारखा वावरायचो, शिकार करायचो; पण बिल्डरांनी जंगलांचीच शिकार केली. मला माझ्या घरातून हाकलले. पिंजऱ्यात बंद करून या जागी सोडले. आता मी शिकार विसरलो आहे. तू वाघांना शाकाहारी प्राणी म्हणू शकतोस. शिकारीला गेल्यावर परिसरातील कुत्रा मला पळवतो. सरकारचे वाघ बचाव धोरण आम्हाला लागू होत नाही. माणसांच्या परिसरात बिबट्या घुसला अशा बातम्या तुम्ही पाहता. स्वतःलाच विचारा कोणी घुसखोरी केली आहे?काहींनी आमचे निवारे, संसार, प्रजाती, पिढ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. माझा मित्र चित्ता तर नामशेष झाला आहे. काही दिवसांनी आमच्यावरसुद्धा अशीच वेळ येणार आहे. जिथे माझ्यासारख्या राजाची अशी दशा झाली तिथे माझ्या राज्यातील प्रजा कशी टिकणार?


झाड : आम्ही माणसांना सर्व दिले; पण त्यांनीच आम्हाला संपवायचा कट रचला. डोंगर गेले, इमारती आल्या. नद्या गेल्या, गटारे आली. स्वच्छ समुद्र गटारमय झाले. स्वर्गासारखी पृथ्वी नरकासारखी दिसू लागली. अजूनही वेळ गेलेली नाही. आमची व्यथा समजून घ्या. आमच्या अस्तित्वासाठी आम्ही तुमच्याकड़े हात पसरवत आहे. आम्हाला तुमच्या परोपकारी हातांची गरज आहे. विकास करा; पण आमचे भान राखा. झाडे लावा, झाडे जगवा. हे प्रत्यक्षात कृतीत आणा. अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Sanjay Raghunath Sonawane

Similar marathi story from Drama