Annapurna manoj Lokhande

Drama Action Inspirational

4.6  

Annapurna manoj Lokhande

Drama Action Inspirational

विश्वास

विश्वास

1 min
561


एक विमान खूप उंच अंतरावर गेले होते. त्या विमानात खूप मोठमोठी माणसं होती. कुणी डाॅक्टर, कुणी इंजिनीयर, तर कुणी शास्त्रज्ञ होते आणि एक लहानशी मुलगी होती जी तिच्या बाहुलीशी खेळत होती. अचानक विमानावरचा ताबा सुटला. ते आकाशात खूप वेेगाने वाकडेतिकडे होत होते. सगळेच खूप घाबरले, मोठमोठ्यानेे ओरडू लागले. देेेेवाकडे प्रार्थना करू लागले, की आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ कर देवा आणि विमान पहिल्यासारखं व्यवस्थित चालू दे.


  थोड्या वेेळाने विमान चांगलेे चालू लागले. हे सगळं चालू असताना ती मुलगी शांतपणे तिच्या बाहुलीशी खेळत बसली होती. एका माणसाला रहावलं नाही आणि त्याने त्या मुलीला विचारलं, आपल्यावर एवढं मोठं संंकट आलं होतं आम्ही सगळे घाबरून गेलो होतो. पण तुझ्यावर  काहीच परिणाम झाला नाही? तुला ऐक येत नाही का? की तुला दिसतपण नाही?   


     यावर ती मुलगी म्हणाली, ऐकूही येतं आणि दिसतसुद्धा.

त्या माणसाने विचाारलं की मग तू शांत कशी काय बसलीस?  

तेव्हा ती मुलगी म्हणाली, की या विमानाचेे पायलट माझे बाबा आहेत आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ते मला मरणाच्या दारात कधीच सोडणार नाहीत. माझ्या बाबांवर माझा पूर्ण विश्वास आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama