STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Drama Tragedy Inspirational

3  

Annapurna manoj Lokhande

Drama Tragedy Inspirational

नकुशी

नकुशी

2 mins
251

   एका शाळेत एकदा नवीन मॅडम आल्या होत्या. त्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत होत्या. सगळ्यांशी प्रेमाने वागायच्या . आणि त्या दिसायला खूप सुंदर होत्या. शाळेत सर्वांच्या त्या आवडत्या होत्या. एक दिवस मधल्या सुट्टीत  मॅडम आणि काही मूलीही जेेेवत होत्या. एका मुलिन विचारलं की मॅडम तूम्ही किती वर्षांचा आहात?  मॅडम म्हणालया 34 वर्षाची आहे .तेव्हा मूूली म्हणाल्या तुम्हाला कीती मूलं आहेत?मॅडम म्हणाल्या माझं लग्नच नाही झालं. मुली विचार करू लागल्या की मॅॅॅडम इतक्या सुंदर असुनसुद्धा् त्यांच लग्न कस काय झालं नााही. एका मुलिन विचारलं मॅडम हसल्या आणि म्हणाल्या तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि त्या गोष्ट सांगू लागल्या. 


      एका बाईला तीन मुली होत्या. ती चौथ्यांदा गरोदर होती. तीच्या नवऱ्याने तीला ताकीद केली. या वेेळी जर मूलगी झाली तर मी तीला रस्त्यावर सोडून निघून येेेईन. मला मूलगाच हवाय अस म्हणाला. तीला परत मुलगीच झााली. तीच्या नवऱ्याने ती घेेतली आणि रस्त्यावर सोडून निघून आला. ती बाई

खूप  रडली. तीला तीच्या मूलीबद्दल खूप वाईट वाटत होते. सकाळी उठून तीचा नवरा त्या मूूलीला कूनी घेऊन गेले का हे बघायला गेेला. तेव्हा ती तिथे होती. तो तिला घरी घेऊन आला. तीच्या आईला खूप आनंद झाला. हे रोज च ठरलेलं होत तो रात्री घेऊन जायचा आणि  सकाळी घेऊन यायचा. 


      एक दिवस त्याला कळल की देवाची ही इच्छा आहे की मी त्या मूूलीलाा सांभाळाव. तो तिला  घरी घेऊन गेला. पण तीला कधी माया लावली नाही. तीच तोंडसूधा बघितल नाही.  त्यांना ती नकूशी होती. नंतर त्याला मुलगा झाला आणि त्याची एक मुलगी वारली. असं तीनवेळा झालं आता त्याला तीन मूलं आणि एक मुलगी राहीली. त्याचीबायको पण  वारली.


      आता तो म्हातारा झाला होता. त्याची  तीन  मूलं त्याला  सोडून निघून गेले. शेवटी राहीली ती मुलगी तीचा त्यांनी कायम तिरस्कार केेला होता. आता ती त्यांची काळजी घेते त्यांना सांभाळते. तीच्या बाबांनी तीची माफी मागितली. ती मुलगी ही आता ते सगळंं विसरून गेली. हे सागून मॅडम म्हटल्या ती मुलगी कोण आहेे सांगू? ती मीच आहे. हे ऐकून सगळ्या मूली थक्क राहील्या. त्यांना त्यांच्या मॅडमचा अभिमान वाटू लागला. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama