STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Children Stories Horror Children

3  

Annapurna manoj Lokhande

Children Stories Horror Children

बालपणीच एक भूत 3

बालपणीच एक भूत 3

2 mins
165

   आम्ही सगळे शाळेत मधल्या सुट्टीत खेळत होतो. सगळे मुल मुली मिळून आम्ही लपाछपी खेळत होतो. खेळत खेळत मयुरी शाळेच्या मागच्या बाजूला गेली ज्याच्यावर राज्य होत त्याने सगळ्याला पकडलं होतं, पण फक्त तिच सापडत नव्हती. परत सगळ्यांनी मिळून तिला शोधल. पण ती सापडली नाही.

     खूप वेळ झाला मग मयुरी पळत पळत आली खूपच घाबरली होती. आम्ही सगळ्यांनी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिला एक बाई दिसली. जी भूत होती. तिने हिरव्या रंगाची साडी, हातात हिरव्या बांगड्या,पायात पैजण, कपाळावर मोठ्ठा हळीकुंक लावलं होतं, आणि केस मोकळे सोडले होते, तीचे केस खुपचं लांब होते, तिने एक बाळ घेतल होत आणि एका झाडाखाली बसली होती, तिचं हे सगळ बोलण ऐकून आम्ही सगळे खूप घाबरलो. तरी मी, मयुरी,शीतल, कोमल आम्ही सगळे गेलो बघायला    मयुरी घाबरली तिने मला दाखवल की तिला ती बाई कुठे दिसली होती. आणि लांबच थांबली. तिला बघून ह्यादोगीही तिथेच थांबल्या. मी तसचं धाडस करतकरत पुढे गेले. पण मला तिथे काहीच दिसले नाही तरी मी घबरल्याच नाटक केलं आणि तिथून पळत सुटले त्याही घाबरल्या आणि पळल्या आणि वर्गात आल्यावर त्यांनी मला विचारलं की, तुला दिसली का ग ती बाई . मी म्हणाले अग हो मला तिथे ती बाई दिसली पण तीने हिरवी नाही तर निळी साडी घातली होती. आणि तीच्याकड बाळ न्हवत. पण ती जीभ बाहेर काढून उभी होती. त्यामुळे मी घाबरले.

     आम्ही हे सगळ बाकी मुलांना सांगितलं ते म्हणाले की आत्ता सुट्टी झाली ना की आम्ही जाऊन बघतो. सुट्टी झाली आणि मुलं निघाली शाळेच्या मागे आम्ही पण गेलो मुलांनी पुढं जाऊन बघितलं आणि तेही पळत सुटले शाळेकडे. शाळेत आल्यावर आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला काय दिसल . एक म्हणाला मला लाल रंगाची साडी घातलेली बाई दिसली, दुसरा म्हणाला की माला. पिवळी साडी दिसली एक म्हणाला मला गुलाबी साडी दिसली . आम्हाला काहीच समजेना. पण तेव्हा पासून आम्ही सगळे तिकडे जायचं सोडून दिलं

 आणि शाळेच्या ग्राउंड वरच खेळत होतो. पण तेव्हा कळच नाही की मी जस त्यांना खोटं सांगितलं तसचं सगळ्यांनी एकमेकांना खोटच सांगितलं होतं तशी बाईचं न्हवती. आम्ही एकमेकांना घाबरवण्या सगळेच खोटं बोललो होतो. कारण आम्हाला सगळ्यांना शाळेच्या मागच्या बाजूला जायला बंदी होती कारण तिकडे खुप झाडी होती. आणि त्यात साप बीप असतात. मुलांना काही व्हायला नको म्हणुन शिक्षकांनी अफवा पसरवली होति की तिकडे एक भूत राहत तिकडे कुणीच जायचं नाही . त्यामुळं आम्ही एकमेकांनाच घाबरवल. पण आम्हाला सगळ्यांना माहीत होत की तिथे काहीच नाही. पण सगळ्यांना वाटत होत की आपण त्यांना भीती दाखवली आणि आम्हीच आम्हाला ननटत होतो.


Rate this content
Log in