Annapurna manoj Lokhande

Drama Tragedy Action

4.0  

Annapurna manoj Lokhande

Drama Tragedy Action

आईचे दुःख

आईचे दुःख

2 mins
483


  काय लिहावे ते सुचतच नव्हते पण ठरवलं कि लिहावी एका स्त्रीची व्यथा. जीला मी अगदी जवळून पाहिलं. माझी आई. मी तीचे चांगले ,वाईट अनुभव मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ती आशी कशी आहे. मनात किती दुःख साचलेले आहे पण ती कधी दाखवत नाही. तीला वाटत की, आपण आपले दुःख मुलीला कशाला उगाच साांगायच ,तिला खूप त्रास होइल. पण एक सांगू का  मााझ्या आवाजावरून जर ती ओळखत असेेेल, की मी कााहीतरी लपवत आहे. तर मीही ओळखत असेेेल ना . किती विचारल तर काय नााही गं ...जरा सर्दी झाली ना ,त्यामूळ आवाज आसा येत आहे. बाकी काही नाही. 


  दर वेळी तिच असचं असतं पण आज तिची सहन शक्ती संंपली .आगदी हंबरडा फोडून रडत होती. मला कहीच कळले नाही की काय झालं होत. मला वाटत होत की उडत जाऊ कि कस पण तीच्या जवळ जा व तीला मीठीत घ्याव आणि विचाराव कि काय झालं. मी आहे ना ,तूझ्या बरोबर अस सांगून तीला आपल्या खूशीत झोपवायच होत तसच जस ती मला मी लहान असतानाा करायची...


     ती सांगत होती. की ,घरचे तीच्याशी चांगले वागत नाहीत ,तीला नीट बोलत नाहीत, तीच्यावर कसलेेही आरोप करतात. ती फक्त सहन करत राहते.  कीती दिवस तीन सहन करत रहायचं .ती आज उलट सुलट बोलली त्यांच्याा वागण्या चा जाब विचारला. तर ती वाईट ठरली. कारण तीच्या

बाजूनेे बोलणार कूनी नाही. माझे बाबा आज जर  या जगात असते तर त्यांनी अस होऊ दिल नसत. तीच्या पाठीशी उभे राहिले असते. तीला धीर दिला असता .ते असते तर तीला हे सगळंं सहन करायची गरज नसली असती.


    ती हे सगळं माझ्या भावांना सुुद्धा सांगू शकत नव्हती. कारण ते हे सगळं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते अजुन लहान होते. बाबांच्या आजारापनामुळे माझं लग्न् लवकर केेले. मला हया गोष्टीचा त्रास नाही होत. कारण ते आपल्या नातवंडांना तर पाहू शकले. याच मला समाधान वाटतं. 


   आईला जशी वागनूक मिळाली ती का? नवऱ्याच्या मागे त्याच्याच घरचे जर असे वागत असले तर त्या बाईने कसं जगायचं. माझ्या आईला मी, आणि माझ्या भावांंनी हयापासून वाचवले .पण तरी तीला वाटत असनार ना की तीचा जोडीदार, जो तीची साथ कधीच सोडणार नाही, तीच्यापासून कधीच दूर जानार नाही. असं वचन देऊन तीला कायमच सोडून निघून गेला. तो असता तर तीला हे सगळं सहन करायची गरज नसली असती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama