Annapurna manoj Lokhande

Drama Tragedy Inspirational

3.7  

Annapurna manoj Lokhande

Drama Tragedy Inspirational

सासूरवाशिण

सासूरवाशिण

2 mins
388


     मी एक सासूरवाशिण आहे तसंच मी एक लेक पण आहे.   मग अस का ? .की माझं काम फक्त सासरी सगळे नीट करायचं. सगळ्यांची काळजी घ्या याची. घर नेहमी आनंदात कसं राहिलं याची काळजी करायचं. घरच्यांचा प्रत्तेक शब्द ऐकून ते जे सांगितलं तेच करायचं. त्यांच्या कुठल्याच गोष्टी विरोध करायचा नाही. ते चूक असलं तरी. 


    नेेहमी त्यांच्या सुखाचा विचार करायचा. कुठलीही गैर सोय होऊ दयायची नाही. हे सगळं मी मनापासुन करते. मी कधी  त्यांना परक  समजलं नाही. ही सगळी माणसंं माझीच आहेत असे मानले.  


     मग मी माझ्या माहेरच्या माणसांसाठी काहीच का करू शकत नाही? माझ्या वडिलांना मी सगळ्यात जवळची होते. त्यांच्या आजारपणात मी  त्याच्या सोबत असयला हवं होतंं. अस वाटत होतं की उडत जाऊ की कसं पण त्याची सेवा करावी .त्यांनी मी लहान असताना जशी माझी काळजी घेतली. तसंच मी ही त्यांची काळजी घ्यावी. पन मला हे शक्य नव्हतं कारण सासरी लक्ष देण्यासाठी कुणी नव्हतं. मुलं लहान होती. आणि डाॅ . लहान मुलांना दवाखान्यात येऊ देत नाही त्यामुळे मला बाबांसोबत शेवटचा क्षण घालवता आला नाही.  मला माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त जवळचे तेच होतेे. त्यांच्या जाण्याने मला खूप त्रास झाला. मााझ्या सगळ्यात जवळची व्यकती मला  कायमची सोडून निघून गेली. 


   माझं काही नहवत. पण माझे भाऊ लहान होते. त्यांना कााही समजत नव्हते. बाहेरच जग त्यांनी बघितलं नव्हतं.  बाबांच्या जानयाा मूूूळ आई पुर्ण पने खचून गेली भावांनी घराची जबाबदारी घेतली. त्यांना दूकानातून बाजर आनायच माहीत नहवत. ते आज घर चालवायला शिकले. त्यांचा गर्व ही वाटत होता.पण वाईट हि वाटत होत, कारण खुप लहान वयात त्यांना खूप मोठया प्रमाणावर कष्ट करावे लागले. खूप  वाईट दिवस गेले. माझ्या सासरी खूप पैसा होता पण मी कधी भावांची मदत केली नाही करू शकत नाही. कोणत्याही सनाला आईचा फोन आला कि ती बोलत होती.  अगं शेजारच्या मूली आल्यात सणाला फक्त तूच नाही. 


तुझी खूप आठवण येते कधी येशील लवकर ये तुज्या हातची बिर्याणी खायची इच्छा झाली आहे. ये लवकर. मी फक्त हो हो म्हणते येते पुढच्या महिन्यात अस म्हणत म्हणत वेळ मारायचे .पण मनाला खूप वाईट वाटत. की मी जितके  साासरचया सााठी जेवढ केल तेवढ नाही पण त्या च्या निमम तरी मला माहेरचया साठी करायचं होतं. पण मी कधी करू शकले नाही. 


   मला वाटतं की मुलीना दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे. कुठल्याही मुलीचं आस हाल होऊ नये. देेेेेवाकडे प्रार्थना करते.    


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama