मैत्रीण
मैत्रीण
राणी नावाची एक मुलगी होती. ती तिच्या आजोळी राहायची. एक छोटस गाव होत तिथे तिचे आज्जी- आजोबा, काका- काकू त्यांची मुलं असे सगळे राहत होते. राणीचे आईबाबा शहरात राहायचे. शहरातला खर्च भागत नाही म्हणून त्यांनी राणीला गावाकडे ठेवलं होतं. राणीला खुप लहान वयात आईबाबांपासून लांब राहावं लागलं ती त्यांना खूप miss करायची.तेही तिला खूप miss करत होते पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना तस करावं लागलं.
राणी खुप धडसी होती. दिसायला तर खुप सुंदर होती. सगळ्यांशी प्रेमाने वागायची. तिचा स्वभाव खूप चांगला होता. कोणाशी भांडत न्हवती, कोणाला उलट बोलत नव्हती, सर्वांची काळजी घ्यायची, सर्वांचा आदर करायची.. तसेच सगळ गाव तिचे खूप लाड करायचे. गावातील लोक तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघुन खूप आनंदी व्हायचे.
तिच्या वर्गात ती सगळ्यात हुशार होति. तिचे शिक्षक तिचा खुप लाड करायचे. तिचे खूप मित्र मैत्रिणी होत्या. कारण ती सगळ्यांशी चांगली वागत होती. तिला फक्त एवढच माहित होत की सगळ्यांना आनंदी ठेवायचं, कोणाकोणाला त्रास झालेला तिला आवडत न्हवत.ती प्रतेकाला मदत करायची. तिची एक मैत्रीण होती कोमल. तीचे आई बाबा न्हवते. त्यामुळे राणीला तीची खुपदया येतं. क
ोमल च्या घरचे तिला खूप त्रास देत होते. ती रोज राणीला सांगायची की तिच्या घरी तिच्याशी कशे वागतात. राणी खुप हळवी होती. तीचे आई बाबा हि शहरात राहत होते ना त्या मुळे तिचीही काहीशी तशीच अवस्था होती.
तिची काकू त्यांची मुलगी हे हे राणीला खुप त्रास देत होते. पण राणीला कोमलच वाईट इतकचं वाटत होत की राणीचे आईबाबा कधी कधी तिला भेटायला यायचे पण कोमल च तस न्हवत, ती तिच्या आईबाबां शी कधीच भेटू शकत नव्हती. त्यामुळे तिला खूप त्रास होत होता.
पण त्या दोघी खुप चांगल्या मैत्रीणी होत्या.त्या एकमेकांसोबत सगळ शेअर करत होत्या. राणी कोमलची खुप मदत करायची. तिच्या बाबाने तिच्यासाठी काही आनल की ती ते कोमल सोबत शेअर करत होती तिची अभ्यासात मदत करायची. तीचे कपडे,चप्पल, अशा वस्तू ती बाबांकडून मागून घ्यायची आणि तिला द्यायची. राणी आणि कोमल ची मैत्री खुप सुंदर होती.निखळ, निस्वार्थ होती. मैत्री कशी असावी, याचा कोणाला जर धडा घ्यायचा असेल तर त्यांनी राणी आणि कोमल ची मैत्री पहावी.
राणी सारखी मैत्रीण जर सर्वांकडे असती तर जगात कोणालाच काही दुःख राहिलं नसत,. प्रतेक व्यक्ती राणी सारखी असावी, प्रेमळ, निस्वार्थ, आनंदी सर्वांची मदत करणारी...