Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

विनंती

विनंती

3 mins
2.8K


मित्रहो! कळकळीची विनंती तुम्हा सगळ्यांना .. आपली मते निसंकोचपणे मांडा . आपणासारख्याच्या मताची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे . कारण माझं असं वैक्तिक मत आहे की, कलावंत हा कलावंत असतो . तो छोटा , मोठा, श्रेष्ठ - कनिष्ठ कधीहे नसतो त्याला ईश्वराने एक अमोघ शक्ती दिलेली आहे. संवेदनशील मन दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाप्रती असलेली कळकळ अन अपार करुणा समाजाचं भलं व्हावं अशी प्रामाणिक इच्छा ...मान्य आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अन विविधता स्वभावात आहे असल्यामुळे आपण चांगलं काही आपल्या शैलीत लिहू शकता याची मला खात्री आहे ... फक्त एक जिदग्न्यसेपोटी हि कळकळीची विनंती .. बाकी वैयक्तिक स्वार्थ साधण्याचे अनेक मार्ग इतरत्र उपलबद्ध आहेच पण समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे. आपण समाजचे देणे लागतो. व्यक्ती हा समाजाकडून कळत नकळत खूप काही घेत असतो व ते काही औंशी परत कारण आवश्यक असत. वय्क्ती विकासाठी समाज, देश विकास व अखंड मानवजातीचा उत्कर्ष होण्यास आपला हातभार असावा खारीचा वाट असावा असं मनापासून वाट . आणखी काय बोलू , लिहू आपण जाणकार आहेत .... 

फक्त एवढी इच्छा पूर्ण करा मित्रहो ... ! ... 

        मला नेहमी प्रश्न पडतो की ,साहित्य निर्मिती कशी होते ? अशी कोणती शक्ती असावी कि लिहण्यास भाग पडते .लेखन वेळची चिंतन , मनन , ती अस्वस्थता  ती समाधीअवस्था , भावविवंश होऊन करुणा , प्रेम , राग आदी भाव भावना घेऊन एखादी साहित्यकृती , शिल्प , चित्र घडते तेव्हा त्या निर्मात्याला होणारा आंनद व त्यानंतर ते पाहून , वाचून ऐकून होणारा आनंद हे सगळं सगळं विलोभनीय , आणि आकलनाच्या पलीकडचं ... गायक संगीतकार सुंदर गीत बनवतात त्यातून मिळणार आनंद मिळतो सर्वच बाबतीत त्यामागील भूमिका इतके सहज समजू शकत नाही किंबहुना ते शब्दात आपण अचूकपणे मांडूही शकत नाही ... ,   

 साहित्य म्हणजे काय ? ते कसे तयार होते म्हणजेच निर्मितीप्रक्रिया याविषयी भारतीय आणि पाश्च्यात्य साहित्यकारांनीही वेगवेगळी मते मंदिल आहेत ते आपणास माहीतच आहेत . पण कुणीही परिपूर्ण व्याख्या करून सहाकल नसलं तरी काही लक्षण काही प्रमाणात खरे वाटतात . होते साहित्याचे प्रयोजन काय ?

भामह , रुद्रट, दंडी, सारखे याबाबत बोलताना म्हणतात ....ननू  शबदार्थो काव्यं , शब्दार्थो सहितं काव्यं , तर पाश्च्यात्य साहित्यकार याबाबत म्हणतात ....कविता म्हणजे संगीमय विचार , उत्कट भावनांचा उस्फुर्त अविष्कार म्हणजे काव्य ...अशा अनेकांनी काव्याच्या व्याख्या सांगितल्या असल्या तरी काव्याच्या , साहित्याच्या व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही . असे पटवून देताना एक साहित्यकाराने सुंदर उदाहरण दिल आहे .. तो म्हणतो काव्याची व्याख्या करणे म्हणजे एखाद्या या फुलावरून त्या फुलावर स्वछंद पणे बागडणाऱ्या सुंदर फुलपाखरं पाठीमागं धावण्यासारखं आहे . एक तर हाती लागत नाही . आणि सापडला तर त्याच सौंदर्य कोमेजून गेलेलं असत अन उरत ते फक्त त्याच कलेवर ..तेच कवितेच्या बाबतीत असत तिचा आस्वाद घ्या, आनंद लुटा . तिची चरफाड करून आपल्या काहीही हाती लागणार नाही .

मित्रहो !  तुम्हाला काय वाटत याविषयी जे काही वाटत ते लिहा बिनधास्त ... तुमच्या अनमोल विचारांची आम्हाला आवश्यकता आहे कृपया आपली मते जरूर जरूर मांडावेत प्रतीक्षा राहील ...

 संवेदनशील मनाकडून एखादी कृती घडते ती कलावंताच्या मनाची साद असते 

दुसरं संवेदनशील मन ते वाचून, ऐकून किंवा पाहून त्याला प्रतिसाद देत ते उमटलेले पडसाद असत .

१ ) रंग रेषांच्या माध्यमातून कुंचल्यातुन जेव्हा एखादं सुंदर चित्र रेखाटलं जात ती कलावंताच्या मनाची साद असते

दुसरं संवेदनशील मन ते पाहून त्याला प्रतिसाद देत ते उमटलेले पडसाद असतात . 

२) शिल्पकार शिल्प घडवतो ती कलावंताच्या मनाची साद असते ते शिल्प पाहून त्याला प्रतिसाद देत ते उमटलेले पडसाद असत .

३)  हे सारे कच्चे मटेरियल आमचे ....

स्फूर्ती, साहित्य, प्रेरणा, पुरस्कार 

चिंतन, मनन, संकलन, संपादन 

लिहणे, वाचणे, बोलणे, चित्र काढणे 

क्रीडा, वक्तृत्व, अभिनय करणे, शोध लावणे, शिल्प तयार करणे, सृजनात्मक शक्ती ( पेरणे)

हे सगळे कलाविष्कार याला लागते बुद्धी, शक्ती, सामर्थ्य प्रतिभाशक्ती 

भक्ती, कला, लहरीपणा. भाव भावना ...

शब्द, अक्षरे वाक्य पाने पुस्तके ..... 

दृक्श्राव्य साधने, छापखाने. माणूस असतो कलाप्रेमी ....

त्याच मन संवेदनशील मग तो रसिक असेल वाचक अभिनेता, शास्त्रतज्ज्ञ  

मित्रहो !  तुम्हाला काय वाटत याविषयी जे काही वाटत ते लिहा बिनधास्त ... तुमच्या अनमोल विचारांची आम्हाला आवश्यकता आहे कृपया आपली मते जरूर जरूर मांडावेत प्रतीक्षा राहील ... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational