विद्या विनयेन शोभते (रंगभूमी )
विद्या विनयेन शोभते (रंगभूमी )


पंकज आणि प्रवीण हे दोन भावंडं होती. पंकज छोटा भाऊ बी.ए. झालेला असतो. अभ्यासात लहानपणापासून मागे असल्यामुळे कसाबसा बी.ए. करतो. आणि एका शाळेत कारकून असतो. तो आई ,बाबा ,पत्नी दोन मुलांसमवेत बुलढाणा येथे असतो. पण तो स्वभावाने एकदम नम्र मिळून मिसळून राहणारा कुणालाही मदत करणारा असतो .तो खूप बोलका सर्वांची काळजी घेणारा , सर्वांची मने जपणारा असतो. आपल्या तुटपुंज्या पगारात आपल्या ऐपतीप्रमाणे सर्वांना जपतो. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतो. गावी शेती असते तीही बघतो.वडिलांनाहि पेन्शन असते .त्यात हे सर्व जण खूप छान राहतात. आई वडिलांचे तो कधीही मन दुखवत नाही.
प्रवीण हा मोठा भाऊ असतो तो लहानपणापासून अभ्यासात एकदम हुशार असतो. दहावी बारावीत तो मेरिटमध्ये उत्तीर्ण होतो. नन्तर पुण्याला शिकून तिथेच चांगल्या कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगारावर नोकरीला असतो. त्याची पत्नीही चांगल्या पगारावर नोकरीला असते. तीही हुशार असते. पण प्रवीण स्वभावाने अबोल, स्वतःच्याच विश्वात रमणारा , अभिमानी आणि मी माझ्या मेहनतीमुळेच या पदावर आहे असे समजणारा व मीपण दाखवून भावाला तुच्छ समजणारा असतो. त्यालाही दोन मुले असतात प्रवीण जेव्हा पत्नी सम्पदा व दोन मुले साक्षी आणि समीर सोबत बुलडाण्याच्या जातात तेव्हा कसेबसे दोन दिवस राहतो. तिथे प्रवीणचे कुटुंब गेल्यावर मात्र पंकजला खूप आनंद होतो. पंकजची पत्नी सीमाही त्याच्यासारखीच स्वभावाने मनमिळाऊ असते. त्यामुळे ते दोघेही दादा आल्यावर काय करू आणि काय नको असे होते. त्यांना सीमा निरनिराळे पदार्थ करून खाऊ घालते. त्यांची मुले राहुल आणि सोनाली यांनाही काका काकू आल्याचा त्यांची चुलत भावंडे आल्याचा खूप आनंद होतो पण साक्षी आणि समीर देखील त्यांनी केलेल्या आदरसत्काराचा मान न राखता तुच्छच लेखतात. पंकज सोनाली आणि राहुलला काहीतरी गिफ्ट देतो पण तेही एकदम हलक्या दर्जाचे असते राहुल आणि सोनालीही त्या गिफ्टनेही खुश होतात पण त्यांचा आनंद फक्त काका ,काकू आणि चुलत भावंडे समीर साक्षी आपल्या घरी आले यातच असतो. सीमा सतत एकटीच कामात राहून प्रत्येकीच्या आवडी निवडी जपते.सम्पदा तिला मदत करण्याचे दूर स्वयंपाक घरात जाऊनही बघत नाही. सीमा सर्व तिच्या हातात देते.सोनाली आणि राहुल अभिमानाने त्यांच्या मित्रांना आमचे चुलतभावंडे म्हणून ओळख करून देतात.
पंकज जेव्हा राहुल सोनाली आणि सीमासोबत पुण्याला जातो तेव्हा प्रवीण आणि त्याच्या कुटुंबियांना विशेष आनंद कधीच होत नाही ते त्यांचा आदर सत्कार तर नाहीच पण त्यांच्याशी तोंड भरून बोलतही नाही पण पंकज सर्वांसाठी येतांना खूप महागातले गिफ्ट घेऊन येतो प्रवीण मुलांना खूप खेळवण्याचा प्रयत्न करतो पण मुले ह्यांना घरातच ठेऊन सोनाली आणि राहुल ला त्यांनी हट्ट करूनही त्यांना न नेता स्वतः आपल्या मित्र मैत्रिणीसोबत खेळतात.सीमा यांच्याघरी स्वतःच आपल्यासाठी या सर्वांसाठी स्वयंपाक बनविते. आणि सर्वाना ऑफिसला डब्बेही देते आणि यांच्या कामाला गेल्यावर यांच्याकडे दोन गाड्या असूनदेखील प्रवीण कुटुंबियांना घेऊन हवे तिथे बसने फिरून येतो. सुट्टीच्या दिवशीही प्रवीण भावाला गाडीने फिरवत नाही.पण याची काहीही तक्रार पंकज आणि त्याच्या कुटुंबियाला नसते.. त्या सर्वाना प्रवीण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा खूप आदर आणि अभिमान असतो.. पंकज येतांना शेतातील सर्व नावीन्य प्रवीणला घेऊन येतो व एवढेच नव्हे शेत आईबाबांचे असल्यामुळे अर्धे शेतातील पिकाचे पैसे न चुकता दरवर्षी प्रवीण च्या अकाउंट मध्ये जमा करतो.
पंकजच्या कुटुंबियांना याची जाणीवही नसते कि प्रवीण व त्याचे कुटूम्बीय आपल्याला तुच्छ समजतात. सम्पदा च्या मैत्रिणी सीमासमोर घरी आल्या . तर संपदा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारते. सीमा त्यांचे सर्व आदरातिथ्य करते पण सम्पदा तिच्या मैत्रिणींना सीमाशी ओळखही स्वतःहून करून देत नाही. प्रवीण पंकजचे आईबाबाही जेव्हा प्रविणकडे येतात तेव्हा तेही असेच दहा पंधरा दिवस राहून जातात. प्रवीण ज्या पद्धतीने वागतो याचे कुणालाही वाईट वाटत नाही. उलट त्यांना सर्वांना प्रवीणचे कौतुकच वाटते.
असे करता करता ओघाने दोघांचीही मुले मोठी होतात. साक्षी आणि समीर प्रवीणचे मुले कशीबशी इंजिनिअर होतात.पण अभ्यासात जास्त हुशार नसल्यामुळे चांगली नौकरी त्यांना मिळत नाही ते दोघेही कमी पगारावर नौकरी करतात. याउलट राहुल आणि सोनाली अभ्यासात खूप हुशार निघतात. राहुल आय.ए.एस. ऑफिसर तर सोनाली एम.बी.बी.एस. होते सोनाली एका हॉस्पिटल मध्ये मुंबईला नौकरी करते तर राहुलचे पोस्टिंग पुण्यालाच होते. त्याला गाडी,बंगला मिळतो. तो आई,बाबा ,आजी,आजोबांनाही सोबत गावाहून कायम राहण्यासाठी घेऊन येतो.. प्रवीण स्वतःच्या मुलांच्या प्रगतीवर नाराज असतो. राहुल आणि सोनालीला अजूनही काका काकूंबद्दल तितकाच आदर असतो. राहुल न चुकता काका काकूला आणि चुलत भावन्डान्न भेटायला वेळ काढून आठवडा पंधरा दिवसातून एकदा आई,बाबा, आजी आजोबांनाही घेऊन जातो. राहुल एवढ्या मोठ्या पोस्टवर जाऊनही त्याच्या नजरेत सर्वांबद्दल खूप आदर असतो त्याचे पाय जमिनीवरच असतात. त्याचा हा नम्रपणा बघून प्रवीण,सम्पदा, ,समीर ,साक्षीही लाजिरवाणे होतात.आणि सोनालीची मुंबईहून आली कि न चुकता काका काकूंची भेट घेते व आणि राहुल प्रवीणच्या कुटुंबियांना न चुकता आग्रहाने घरी बोलावून एक गेट टुगेदर आयोजित करतो.
हे सर्व बघून प्रवीण आणि त्याच्या कुटुंबियाला स्वतःच्या वागण्याचा पच्छाताप होतो. तसे ते बोलून दाखवून माफीही मागतात. आणि प्रवीण शेवटी कबूल करतो "विद्या विनयेन शोभते."
तुम्ही उच्च विद्याविभूषित होऊन सर्वांचा मान ठेवलात,आदर राखलात तरच ती विद्या तुम्हाला शोभून दिसते.