Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Akshay Anant Mhatre

Abstract Others


4.7  

Akshay Anant Mhatre

Abstract Others


विद्रोह

विद्रोह

3 mins 481 3 mins 481

      लॉकडाऊन चालूच होता. बारावीचा निकाल लागला होता. एमपीएससीमधून अधिकारी झालेला मुंबईत STI पदावर कार्यरत मित्र सागर कांबळे याची 'मार्क्‍स'वादी समाज' नावाची फेसबुक पोस्ट वाचली. याचे त्याचे निकाल ऐकत होतो. बातम्या वाचनात येत होत्या. कोणी धारावीत टाकीवर बसून अभ्यास करून 85% मिळवले होते. एकजण 95% मिळवून डिप्रेशन मधे गेला होता. एकाने 90 % मिळूनही आत्महत्या केली होती. वाचून वाईट वाटत होते. मन प्रसन्न करण्यासाठी रात्री जेवल्यावर बाहेर पडलो. रस्त्यात गुड्डू आणि पराग बोलत बसले होते. मोबाईलमधे बघत बघत मी बोललो. 

 "जाम बेक्कार रं, 90% मिळून पण एकाने आत्महत्या केली, एकतर 95 % भेटून पण टेंशनमधे आलाय, डिप्रेशनमधे गेलाय."

गुड्डू माझ्याकडे बघत बोलला, "आरं हो रं, बारावीचा रिझल्ट हुता नं आज. माझा नंबर टाक. काय हाय बघ आपला रिझल्ट"

"दोन विषय गेलं रं आणि त्यातला एक पर्यावरण गेलाय."

पराग पट्कन म्हणाला, "काय साली तर्‍हा हाय, पर्यावरणानं 'नापास'. बाकीचं चार विषय तरी बरं भेटलं."


बोर्डाला पर्यावरणमधे नापास झालेली पहिलीच केस मी पहिली असल्याने मी आणि माझी शंका उपस्थित केली. "काय भाई पर्यावरण तरी कसा गेला रं तुझा?"

"आर दादं, प्रोजेक्ट घेऊन गेलो, सर बोलतांन - जा आता तारीख गेली पुढचे वर्षी वेळेवर घेऊन ये." आलो तसाच घरा आणि गेलो फंट्या चे सोबत गोडाऊन चा काम शिकाला.  मी पुन्हा विचारले,

"पण तुझेच बाबतीत असा का?"

गुड्डू हसत हसत - "आर दादा आपले मॅटरांना काय लिमिट हाय काय? कॉलेजला तर साला कोण पादला तरी गुड्डूचा नाव. आपल्याव करण्या आघाट एकदम. नापास नाय करतील, नायतर काय सत्कार करतीन माझा?"


पराग समजूतदारपणाच्या सुरात पुढे बोलू लागला, "गुड्डू, पुढचे वर्षी अभ्यास कर एक विषय उडवून टाक. आणि पर्यावरण प्रकल्प पण टायमिंग च्या आधी दे आणि पास हो बाबा एकदाचा"


"आरं कसला काय र पराग दाद, तो मधुकर ' जेएनपीटीन साहेब हाय तो . त्याचे पोराचा पहिला नंबर वर्गान. तिकडे बापासनी डोंगराला' जेसीबी' लावलाय. झाडा तोडतान, माती विकतात यार्ड बनवायला, नं मोजतान नोटा नुसत्या. डोंगर सपाट करीत हाणलाय. कॉलेजला पोराचा प्रोजेक्ट काय माहीत हाय?


' जमिनीची धूप आणि वनस्पती संवर्धन '


व्वा... ही चाळीस पन्नास पानं भरलीत, चार रंगाचे पेन वापरून. मार्क किती 48. ते पण पन्नास पैकी. A ग्रेड भेटली त्याला "


"माझा सोडा र, आपला सुजय बघा , कसला मखर बनवलेला गणपती होते तेव्हा. इकोफ्रेंडली का काय बोलताव त्या. बैठकवालं पाणी शिपायाला जातात झाडांना त्यांचे सोबत जातो दर रविवारी. घरा जवळचे माळान पण कसली मस्त झाडं लावलीत बघितलास ना. प्रोजेक्ट पुन कसला बनवलेला ' सेंद्रिय शेती' का काहीतरी. मार्क किती 28... 50 पैकी. 


मी आणि पराग निशब्द होऊन गुड्डू चा बोलणं ऐकत होतो. तो AB डीव्हीलीयर्स ने जस्प्रीत बूमराह ला बसुन षटकार मारावा त्या प्रमाणे बॅटिंग करत होता. त्याच बोलणं चालूच होतं . 


"ये काही बुद्धिजीवी लोकं अशीच रं... गांडीना पावडरी लावून शानोशौकीत जगणारी. आपल्याला यो असला देखावा आवडत नाय. आपण हांव ये असं, आतून बाहेरून सेम टु सेम" 


"काय दादं, तुम्ही मना सांगता पास हो एकदाचा. डी. एड, बी एड, डिप्लोमा, सायन्स ढीगभर डिग्र्या घेऊन पोरा घरांना बसलीन काही. आणि पास झालो तर मला काय अंबानी घरा बोलवायला येईल काय, - चल भावा तुझ्यासाठी रिलायन्स मधे एक जागा खाली केलीय. 


"चला रात झालीय, चाललो घरा, उद्या जाम काम हाय. तीन गाड्या आहेत. दोन एक्झामीन हायीत, कार्टिंग हाय. दम निंघल पुन कडकमधे पैसे सुटतील उद्या" त्याच्या पाठमोर्‍या आकृतीत मला नामदेव ढसाळांचा विद्रोह दिसला - 


"जिवाचे नाव xxx ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल तसं जगावे, मी तसा जगणार नाही"


Rate this content
Log in

More marathi story from Akshay Anant Mhatre

Similar marathi story from Abstract