Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Akshay Anant Mhatre

Thriller Others

4.7  

Akshay Anant Mhatre

Thriller Others

मी घालवलेली क्रिकेटची मॅच

मी घालवलेली क्रिकेटची मॅच

4 mins
830


     कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पीरकोन, उरण येथे शाळेत असताना क्रिकेटच्या मॅचेस चालू होत्या. 2006-07 चि गोष्ट, मी नववीत होतो. नववी 'अ' विरुद्ध नववी 'ब' असा विजेतेपदासाठी सामना रंगणार होता. आमच्या नववी 'ब' कडून अभिजीत आणि स्वप्निल तसेच नववी 'अ' कडून हर्षद, विशाल वगेरे नाणेफेकी साठी गेले. 'अ' चा संघ तुलनेने आमच्यापेक्षा वरचढ होता. आम्ही नाणेफेक ( Toss Win) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

       सामना सुरू झाला, आमच्याने धावा होत नव्हत्या, आमच्या विकेटही पडत होत्या. अभिजीतने 2-4 धावा जमवल्या. स्वप्निल ( डब्ल्या म्हणून प्रसिद्ध, स्वप्निल नाव खूप कमी जणांना माहित असेल ), निकेतन, कैलास एकामागून एक फलंदाज बाद होत राहिले. एका क्षणाला मी आणि माझा दादा आशिष आम्ही क्रिज वर होतो. मैदान खूप छोटे होते. आमच्या वर्गशिक्षकांनी माझ्यासाठी धावून 3 धावा काढल्या तर 100 Rs चे पारितोषिक लावले. दोन वेळा मी 2-2 धावा काढल्या पण 3 काही जमल्या नाही. मी बहुतेक सात धावा काढल्या त्या सामन्यात ; सामन्यातील सर्वोच्च असाव्यात त्या. सर्वांची नावे परफेक्ट नाही आठवत पण 'अ' कडे विशाल वगेरे चांगले गोलंदाज होते. आमच्या संघाने कश्याबश्या चार षटकात 22 धावा केल्या आणि 23 धावांचे अगदी सोप्पे आव्हान ( टार्गेट) नववी 'अ' समोर ठेवले.

   आम्हाला वाटतच नव्हते की आम्ही जिंकू किंवा सामना तरी करू. पहिले षटक दादाने म्हणजे आशिष ने टाकले, दादा डावखुरा जलदगती गोलंदाज (Bowler) . अभिजित मोकाशी आमचा यष्टीरक्षक( विकेटकीपर) होता. शरीरयष्टी लहान पण क्रिकेटची चांगली समज त्याला होती. पहिल्या षटकाच्या तिसर्‍या की चौथ्या चेंडूवर हर्षदचा खूप उंच झेल उडाला. अभिजीत ने सर्वांना "ये थांबा, ये थांबा " असा आवाज देऊन अशक्यप्राय झेल टिपला. 1983 च्या वर्ल्ड कप फायनल मधे कपिल देव ने विव रिचर्डस् चा झेल टिपून जो उत्साह भारतीय संघात निर्माण केला तसा उत्साह आमच्यात त्या झेल ने निर्माण केला. पहिल्या षटकात 5 धावा आणि 2 गडी बाद..

    

    दुसरे षटक घेऊन निकेतन आला. निकेतन पण आमचा 'पाणदिवे एक्सप्रेस' होता ; पण त्याचा षटकात जास्त धावा गेल्या अवांतर चेंडू गेले, 9 धावा गेल्या पण मला ते षटक आठवत कारण त्या षटकात मी एक झेल घेतला होता.

    

    तिसरे षटक घेऊन कैलास आला आणि त्या षटकात त्याने तीन सफलता घेतल्या धावा पण फक्त तीन दिल्या. या षटकामूळे सामना पुन्हा आमच्या बाजूने आल्यासारखे वाटले.

   

      शेवटचे षटक घेऊन बहुतेक मुकेश आला. शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती समोरच्या संघाला. आमच्या क्षेत्ररक्षणामुळे ( फिल्डिंग) सामना अटीतटीचा (tight) चालला होता. शेवटी एका चेंडूत धावा पाहिजे होत्या आणि नको तेच झाले. बॉल wide गेला आणि अवांतर धावसंख्येत भर पडली. आता एका चेंडूत एका धावेची गरज होती. आम्ही शाळेच्या गणवेशातच सामना खेळत होतो, पायात स्लीपर, सॅंडल जे काही असेल ते. मी पीच च्या लेग साईडला एकदम जवळच फिल्डिंग साठी होतो शेवटच्या चेंडू साठी रणनीती आखली. अभिजीत, स्वप्निल, कैलास, निकेतन, पराशर आमच्या सर्वांचे एकमत झाले की बॉल हातात आला की लगेच नॉन स्ट्राईक ला थ्रो करायचा. सर्वांनी चाणाक्ष रहा सूचना झाल्या. थ्रो फेकायचा की हीट करायचा डोक्यात विचार चालू होते. आमच्या विकेटकीपर ने कामरान ॲडम गिलख्रिस्ट सारख्या 3-4 टाळ्या वाजवून "कम ऑन,कम ऑन" असा आवाज दिला आम्ही पण सोबत टाळ्या वाजवल्या. चेंडू पडला आणि त्यांच्या सुदैवाने आणि माझ्या दुर्दैवाने चेंडू माझ्याकडेच आला. पॅरागॉन च्या जुन्या स्लीपर ने दगा दिला ; वादी थोडी सरकली ; चेंडू पहिल्या प्रयत्नात हातात आला नाही. दुसर्‍या प्रयत्नात चेंडू पकडला आणि थ्रो केला, खरतर बॉलर च्या हातात फेकायला पाहिजे होता पण डायरेक्ट हीट करायला गेलो. चेंडू फेकताना नॉन स्ट्राईकला धावणार्‍या लक्ष्मण च्या पायाला वगेरे थोडा लागला आणि चेंडू गेला दुसरीकडेच. हीट झाला असता की नाही माहित नाही पण लक्ष्मणची एक धाव पूर्ण झाली. आणि आम्ही सामना हरलो. बर्‍याच जणांनी मला ' चुतिया' नावाचा सन्मान दिला. "भाई, बॉल धरत होतास? निवट्या ( फक्त कुशल मासेमारी करणार्‍या लोकांच्या हातात मिळणारा मासा) धरत होतास? काय गोट्या खेळत होतास?. त्या दिवशी मला अँलन डोनाल्ड च्या 1999 च्या वर्ल्ड कपच्या भावना समजल्या. आपल्या स्पीड, accuracy, विकेट घेण्याची क्षमता यासाठी प्रसिद्ध असणारा डोनाल्ड आज फक्त त्या शेवटच्या धावेपुरता लक्षात आहे बहुतेक लोकांच्या. 

    असा होता मी घालवलेला, माझ्यामुळे हरलेला क्रिकेटचा सामना. जेव्हा जेव्हा कुठलाही सामना शेवटच्या चेंडूवर जातो तेव्हा मला तो क्षण आठवतो. तशीच धड धड राहते. आत्ताच गेल्या वर्षी आगदी 12 - 13 वर्षानंतर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड वर्ल्ड कप अंतिम सामन्यावेळी देखील तो क्षण माझ्या डोळ्या समोर आला. त्यानंतर काही वर्षानी आपले दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी एक स्टेटमेंट केली होती. 

" माझी अवस्था फुटबॉल मधल्या गोलकीपर सारखी झाली आहे. गोल किती आडवले हे एका सुटलेल्या गोल मुळे सर्वजण विसरले" 

   ही स्टेटमेंट वाचली तेव्हा पण मला तो सामना आठवला कारण तेव्हा पण त्या शेवटच्या एका चेंडूमुळे मी काढलेल्या 7 धावा, मी टिपलेला झेल सर्व विसरून तो शेवटचा चेंडू सर्वांच्या लक्षात राहिला.


Rate this content
Log in

More marathi story from Akshay Anant Mhatre

Similar marathi story from Thriller