Akshay Anant Mhatre

Abstract

3.5  

Akshay Anant Mhatre

Abstract

सुमाता

सुमाता

1 min
143


       शाळेत इन्स्पेक्शन होते त्यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी एकदा नारायण गंगाराम सुर्वे यांची छोटी गोष्ट सांगितली होती. आई हा विषय निघताच ती गोष्ट डोळ्यासमोर येते. नारायण गंगाराम सुर्वे अनाथ मूल म्हणून वाढले. जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या नारायणास सोडून दिले. मुंबईच्या 'इंडिया वुलन मिल' मध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्‍नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणास मात्यापित्यांचे छत्र दिले. नारायण सुर्वेंना एका कार्यक्रमात एका माणसाने विचारले होते "तुम्हाला ज्या बाईने कचरापेटीजवळ टाकले, तिचा तुम्हाला राग नाही का हो येत?" त्यावर नारायण सुर्वे म्हणतात, "ती माताच जर अडचणीत असेल तर ती तरी काय करणार" फक्त आई या शब्दाबद्दल किती नितांत आदर. 

            भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ'मध्ये ही खूप छान 2-3 वाक्ये आहेत. ती वाक्ये अशी आहेत... 

शंकराचार्य म्हणतात,"कुपुत्र असू शकतो, पण कुमाता भवती क्वचितच" खरंतर एका मौलिक पातळीवर माता ही फक्त सुमाताच असते आणि पुत्र हा कुपुत्रच असतो. जैविक सत्य हेच आहे.

     तुम्ही स्वतः सर्व प्रसंग डोळ्यासमोर आणून पहा 'माता ही फक्त सुमाताच असते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract