Akshay Anant Mhatre

Children Stories Others

4.7  

Akshay Anant Mhatre

Children Stories Others

कर्माची फळे

कर्माची फळे

2 mins
400


     एकदा काय होते, सुखदेव नवाच्या एका माणसाला समुद्रात 'कचक्या' चिंबोरा (मोठा खेकडा ) भेटतो. तो खूप खुश असतो; तेवढ्यात तिथे हसुराम नावाचा एक माणूस येतो. हसुराम म्हणजे मोठ्या ताकदीचा घमेंडी आणि स्वार्थी माणूस, तो चिंबोरा सुखदेवच्या हातातून हिसकावून घेऊन विकण्यासाठी जातो. सुखदेवने खेकड्याचे दात असलेले शिंगडे एकदम नीट बांधलेलं नसतान. चिंबोरा हसुरामच्या बोटावर चावतो

"रं, अशी कती चिंबोरी चावलीन काय नाय होय"

असा बोलून नंतर तो चिंबोरा 'दामाजी शेट' ला विकून दणकून पैसे घेऊन घरी येतो

 

     दुसरे दिवशी ज्या बोटावर चिंबोरा चावलेला असतो तो बोट जाम दुखतो. मग तो गावातल्या एका कंपाऊंडरकडे जातो. तो मलमपट्टी करतो. तरी जखम काय बरी होत नाही. मग तो उरणला एका डॉक्टरकडे जातो .. उरणचा डॉक्टर सांगतो की "बोट कापायला लागेल जखम वाढलीय" बोट कापून होते, मलमपट्टी होते. तरी दुखणं चालूच, बरा काही वाटत नाही... मग नंतर याला भीती वाटते तो 'पनवेल'च्या डॉक्टरचेकडे जातो. पनवेलचा डॉक्टर सांगतो "हसुराम, बाळा हात कापायला लागेल जखम खूप बेक्कार वाढली आहे." हात कापतात, मलमपट्टी होते. तरी काही दिवसांनी जखम तशीच. शेवटी मग तो जातो मुंबईच्या डॉक्टरकडे. मुंबईचा डॉक्टर सर्व इतिहास विचारतो. खेकडा चावला तर इतकी मोठी जखम! डॉक्टरला घाम फुटतो, डॉक्टर दवापाणी करतो आणि हसुरामला सांगतो, जा आणि सुखदेवची माफी माग.

 

एवढा झाला तरी हा हसुराम सुखदेवकडे मोठ्या ताठात जातो आणि बोलतो - "सुखदेव, एक तुझा चिंबोरा घेतला तं, शाप तरी कसला दिलास, कसली करणी केलीस माझ्यावर; माझा हात जेला बघ अख्खा"


सुखदेव बोलतंय - तुनी मना शिवं देऊन माझे मेहनतीचा चिंबोरा हातांशी वच्कून न्हेलास, मी वरती देवाचे कर तोंड करून इतकाच बोल्लु. (तू मला शिव्या देऊन माझ्या मेहनतीचा खेकडा हातातून हिसकावून घेतलास मग मी वर आकाशाकडे तोंड करून एवढाच बोललो) 


"देवा यानी मना याची ताकत दाखवली आता तू याला तुझी ताकत दाखव रं बाबा" (देवा, मला ह्याची ताकद दाखवली तू याला तुझी ताकद दाखव) 


Rate this content
Log in