Akshay Anant Mhatre

Others


4.4  

Akshay Anant Mhatre

Others


त्याग

त्याग

2 mins 83 2 mins 83

       मी एसटीने खूप प्रवास केला आहे. लांबचा प्रवास पण केला आहे. आता आता गेल्या 2-3 वर्षात माझा एसटीचा प्रवास कमी झाला. प्रवासात एक अनुभव खूप वेळा आला. कधी बसमधून प्रवास करताना शेजारची जागा रिकामी असते . आपण आपले पुस्तक, पिशवी किंवा बॅग ठेवलेली असते आणि बस निघण्याच्या तयारीत असताना शेवटच्या मिनिटाला कोणी प्रवासी आला तर आपल्याला वाटते की हे काय मला सगळे उचलायला लागले. खरे तर ती जागा आपली नव्हतीच, तरी आपल्याला असे वाटते. काही लोक एवढे कहर करतात की बॅग सीट वरुन उचलण्याची खूण करू नये म्हणून खिडकीतून बाहेर बघत असतात. त्यांना विनंती केली तरी त्रागा करत असतात ( खूप जण तो त्रागा मनातल्या मनात करतात). ट्रेन मधे पण चौथी सीट मागितली तर काही जण असे हाव भाव देतात की सात बारा वर नाव चढवायला सांगतोय. तुम्हाला, मला, सर्वांना कधी ना कधी असे अनुभव येतच असतात किंवा येतील कधीतरी.

    आपल्या सर्वांसाठी माझ्या वाचनात आलेली सरदार पटेल यांची गोष्ट - 1 नोव्हेंबर 1926 म्हणजे साधारण 93-94 वर्षांपूर्वी. जेव्हा सरदार पटेल अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन चे अध्यक्ष होते आणि स्थायी समितीची निवडणूक होती. सगळ्यांचा आग्रह होता की म्युनिसिपल कॉर्पोरेशन चा अध्यक्ष आणि स्थायी समितीचा अध्यक्ष एकच असेल तर कारभार चालवणे सोपे होईल. सगळ्यांच्या आग्रहाखातर सरदार पटेल निवडणुकीत उभे राहिले. 'दौलतराय' नावाचे गृहस्थ त्यांच्याविरुद्ध उभे होते. दोघांनाही 23-23 मते मिळाली. जेव्हा अध्यक्षाला निर्णायक मत द्यायची वेळ आली त्या वेळेला अध्यक्ष म्हणजे स्वतः सरदार पटेल यांनी, जे उमेदवारही होते त्यांनी स्वतःविरुद्ध मत दिले. जागा आपल्याला मिळू शकत असतानाही विरोधकांच्या मताचा आदर करत, विरोधी मताला प्राधान्य देत स्थायी समिती अध्यक्ष पदाचा 'त्याग 'केला. खरच मोठी लोक त्यांच्या कर्तृत्ववाने मोठी झालीत. माझा स्वतःचा अनुभव आहे एकदा एका कार्यक्रमात नावडत्या मोठ्या पाहुण्याला आपली खुर्ची सोडून त्यांना बसायला द्यावी लागेल म्हणून कोणी बघितलाच नाही अश्या प्रकारे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येकाचे असे अनुभव असतिल. म्हणून सरदार निराळे वाटतात. सरदार पटेल यांच्या छोट्या गोष्टीतून खूप मोठा बोध घेता येईल.


Rate this content
Log in