उपयोगी भेटवस्तू
उपयोगी भेटवस्तू


जेव्हापासून प्रितीची मैत्रीण-अमीनाने आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली, तेव्हापासून हाच प्रश्न तिच्या मनात चालला होता, लग्नाच्या भेटवस्तूमध्ये काय द्यायचे? पण तिला हे माहित नव्हते की आजच्या काळात भेटवस्तूबद्दल विचार करायला वेळ कोणाकडेही नाही. भेटवस्तूचे देण्या आणि घेण्यापर्यंतच महत्व आहे. त्यानंतर ते एका कोपऱ्यातच राहतात.
तिला असे वाटले की तिच्या मैत्रिणीच्या एकुलत्या एक मुलीला अशी भेट दिली पाहिजे जी नेहमीच लक्षात राहील.
ही भोळी कल्पना मनात ठेवून तिने पती अमित घरी आल्यावर न्याहारीनंतर चहा घेतल्यावर या विषयावर एकमेकांशी चर्चा केली. सर्वप्रथम, अमीत निर्णय तिच्यावर सोडून म्हणाला, "मी यात काय बोलू, तुला जे आवडेल ते दे.”
मग ती म्हणाली, “मी तिला एक भेट देऊ इच्छिते जी कायमची आठवणीत राहिल."
हे ऐकून अमित म्हणाला, “हे अगदी बरोबर आहे."
तिने रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तुंची यादी अमीतसमोर ठेवली. पण त्याला बर्याच गोष्टी अगदी सामान्य वाटल्या. त्यानंतर अमीतने स्पष्ट केले की, “या भेटवस्तू वस्त्र, भांडी, दागदागिने कोणत्याही जवळच्या नातेवाईक देतीलच तेच परत देण्यामध्ये काही अर्थ नाही.”
प्रिती म्हणाली, "मी तिला दागिने देऊ शकत नाही पण हो, मला भांडी द्यायला आवडेल. भांडी रोज वापरली गेली तर आपली आठवण करेल कारण त्यावर आमचे नाव असेल."
"बरं जशी तुझी इच्छा. पण जर आपल्या भेटवस्तुचा गैरउपयोग झाला तर...” तिचा नवरा म्हणाला.
ती आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली, "भांड्याचा गैरवापर पण होतो का कधी?!"
"असं का होऊ शकत नाही?"
"ते कसे?” प्रितीने विचारले.
“तुला माहिती आहे, सहा महिन्यांपूर्वी आमच्या ऑफिसमधील एका मुलीचं लग्न झाले. आम्ही सर्वांनी मिळुन तिला काही भांडी भेट म्हणून दिली, मग आमची भांडी अशा प्रकारे वापरता येतील हे आम्हाला ठाऊक नव्हते. मुलीचा नवरा बेवडा निघाला, त्याने दारुसाठी सर्व भांडी विकली आणि दारू पिऊन घरी आला. फक्त जेवणाचा डबा उरला आहे कारण दररोज जेवण आणते. एकेदिवशी ती ऑफिसमध्ये आली तेव्हा तिच्या कपाळावर जखमेला पट्टी बांधलेली दिसली. नंतर असे कळले की दारु पिऊन तिच्या नवऱ्याने तिला डब्याच्या झाकणाने इतका जोरदार वार केला की तिच्या कपाळावर जखम झाली.”
"अरे बाप रे!" तिच्या तोंडातून शब्द बाहेर आले. "मग काय झाले?”
अमित म्हणाला, "मग काय व्हायचं? जेव्हा त्याला ऑफिसमध्ये बोलवून समजवून सांगायचं ठरवलं तर ती मुलगी रडायला लागली आणि तिने नकार दिला. कारण तिला माहित होतं की सत्य बोलण्याच्या शिक्षेपासून कोणीही सोडवू शकत नाही.”
"नको रे बाबा! मला अशी भेटवस्तू मी देऊ इच्छित नाही. मग आपण भेट देणार नाही?”
अमित म्हणाला, "का देणार नाही, वधूला जे काही उपयोगी पडेल ते आपण देऊ!”
"तुमच्या नजरेत अशी काही वस्तू आहे, जी आपण तिला देऊ शकू?" प्रीतीने विचारले.
अमित स्मीतहास्य करत म्हणाला, "हो, आम्ही तिला गिफ्टचेक देऊ. जेव्हा तिला पाहिजे तेव्हा पैसे ती आपल्या बँकेत जमा करुन ठेऊ शकते. सहा महिन्यांत ती परत ते पैसे काढु शकते आणि तिची आवडती वस्तू खरेदी करू शकतो. तिलाच फक्त तिचे पैसे मिळतील आणि जोपर्यंत ती स्वतःच खर्च करत नाही तोपर्यंत सुरक्षित राहील." अमितने स्पष्ट केले.
"व्वा! ही खूप चांगली गोष्ट आहे. भेटवस्तू देण्याचा हा नवीन मार्गही मस्त आहे." प्रिती आनंदी होऊन म्हणाली.
"तर किती रुपयाचे गिफ्टचेक बनवायचं ते सांग, उद्या ऑफिसमधून येताना घेऊन येतो." अमितने विचारले.
"किमान हजार रुपये असेल तर ते चांगले होईल,” प्रिती म्हणाली.
"ओके मॅम, डन!" हे ऐकून ती हसली.
संध्याकाळी परत आल्यावर जेव्हा तिने रंगीबेरंगी गिफ्टचेक भेटवस्तूच्या रुपात प्रथमच पाहिली तेव्हा आनंदाने उडी घेतली. दुसर्या दिवशी दोघांनी लग्नाच्या हॉलमध्ये रॉयल एन्ट्री केली.