Rashmi Nair

Others

2.1  

Rashmi Nair

Others

संगीताची आवड

संगीताची आवड

3 mins
587


                   आज महाविद्यालयातील वार्षिक उत्सवात रागेशच्या गाण्यांने सर्वांना वेड लावले . प्रत्येकाला त्याचे गाणे इतके आवडले की टाळ्या थांबतच नव्हत्या. प्रेक्षकांची वाह!वाह ! आणि उत्साह पाहून तो सुद्धा आनंदी झाला. त्याला आपल्या गायनावरचा विश्वास वाढला. त्याने स्वतꓽ ला वचन दिले की भविष्यात असच गायन करेल.

       लहानपणापासूनच त्याला गाण्याची खूप आवड होती. दुर्दैवाने त्याला संगीत शिकण्याची संधी मिळाली नाही. शाळेत शिकत असताना दररोज सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी काही मुले दररोज प्रार्थना गात असत. जेव्हा तो त्यांना पाहतो तेव्हा त्यालादेखील त्यांच्याबरोबर प्रार्थनेत सहभागी व्हायच होतं पण काय करावे हे माहित नव्हते.

              एके दिवशी तो आपल्या वर्ग शिक्षिका वीणा बाईंशी बोलला. त्या ही खूप आनंदी झाल्या . एकदा वीणा बाईंनी त्याला गाण्याच्या तासात गायला सांगितले. त्याने खूप सुंदर गाणे गायले. वर्गाच्या मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिले. त्याच्या बाईंनाही त्याचा आवाज आवडला. तीने त्याला संगीत शिकण्याचा सल्लाही दिला. मग तो म्हणाली "मला कोण शिकवेल ?" निराश रागेश म्हणाला . त्या म्हणाल्या "शिक्षक शिकवतील , "तु याची काळजी करु नको बेटा. मी आपल्या शाळेतील संगीत शिक्षकांशी बोलते ".

वीणाबाईंनी आपले वचन पाळले. जेव्हा संगीतचे गुरुजी शाळेत आले, तेव्हा रागेशला वीणाबाईंनी संगीतच्या गुरुजींना भेटायला स्टाफ रुममध्ये पाठविले. तिथे संगीताचे गुरुजी हार्मोनियमवर एक चाल वाजवताना आढळले. तो त्या चालीवर गाणे गात खोलीत शिरला. पण गुरुजींना काय वाटले कळेना . त्यांनी आपल्या जोडीदाराला विचारले, "हा कोण आहे?" ते दृष्टीहिन असल्यामुळे त्याला पाहू शकले नाही, ते नेहमीच काळा चष्मा लावायचे . म्हणून त्यांच्या सोबत नेहमी एक जोडीदारा असायचा .. त्यांचा जोडीदार म्हणाला "सर हा रागेश आहे, याच्चाच बद्दल वीणा बाई आता तुझ्याशी बोलण्यासाठी आल्या होत्या. "मग गुरुजी रागेशला म्हणाले" ठीक आहे, तू जिथे आहेस तिथूनच या चाली वर गाणे म्हण." सरांनी त्याला आदेश दिला . रागेशने ते मान्य केले आणि तो वाजवलेल्या चालीवर गाणे म्हणु लागला. हे ऐकून त्यांनी मधुनच अचानक चाल बदलली . त्यामुळे त्याच सुरही बदलले. ते म्हणाले "तो बेसुरा आहे तो कधीच संगीत शिकु शकणार नाही " असा जणु शापच दिला आणि त्याला परत वर्गात पाठवले. बिचारा रागेश, ज्या आशेने तो संगीत शिकण्यासाठी गेला, ती कधीच पुर्ण होणार नाही या कल्पनेने निराश झाला . त्याला वाटले त्याचे स्वप्न अपूर्ण राहिल .ह्या घटनेने तो मनापासुन अत्यंत दुखावला. त्यानंतर त्याला संगीत शिकण्यासाठी कोणत्याही गुरूकडे जाण्याची हिम्मत राहीली नाही . त्याच्या मनांत कायमची भीती होती.

   त्याच्या बाईंना जेव्हा हे कळले तेव्हा तिलाही खूप वाईट वाटले, कारण त्या खोलीच्या बाहेरच उभ्या होत्या आणि सर्वच ऐकत होत्या . रागेशच्या प्रतिभेने त्या प्रभावित होत्या . तिला पहिल्यांदाच वाईट वाटले की आपण संगीत शिक्षक नाही. त्याची खंत वाटली. पण वीणाबाईंनी रागेशला निराश होऊ दिले नाही. त्यांनी त्याची प्रत्येक प्रकारे मदत केली. त्यांनी त्याला एकलव्याची कथा सांगून प्रोत्साहित केले. सरस्वतीचा फोटो आणि प्राथमिक शास्त्रीय संगीताच्या काही कॅसेटसह त्याला एक छोटा टेप रेकॉर्डर दिला. हे सर्व पाहून रागेशला खूप आनंद झाला. वीणाबाई त्याला म्हणाल्या - "बाळा , मला पण खुप वाटत की तुला संगीत शिकवाव. पण तरीही मी तुला संगीत शिकवू शकत नाही. परंतु मी तुला संगीतची देवी, आई सरस्वतीची प्रतिमा देत ​​आहे. तू तीलाच आपला गुरु मानता आणि परिश्रमपूर्वक आणि श्रद्धेने सराव करा. मला आशा नाही माझा ठाम विश्वास आहे की तु यशस्वी होशील माझे आशीर्वाद आहेच आणि नेहमीच असतील.

     यानंतर, रागेशने मनापासुन परिश्रमाने सराव केला. हळू हळू तो मंदिरात भजन गाऊ लागला , त्याचे भजन खूप मधुर आणि कर्णप्रिय असायचे. सगळेच त्याचे खूप कौतुक केले.

   महाविद्यालयात तो ट्रॉफी घेतल्यावर त्याला लहानपणाची ही गोष्ट आठवली. तेव्हा त्याला वाटले की विद्यार्थ्याच्या प्रगतीत शिक्षकांची मर्जी आणि आशीर्वाद असणं अत्यंत महत्वाची बाब आहे. जेव्हा हे दोन त्याच्या बरेबर असल तर उद्देश्यपुर्ति आपोआप होते. तो त्याच वेळी वीणाबाईंनां दाखविण्यासाठी शाळेत परतला. त्याची ट्रॉफी पाहून वीणा बाईंना खूप आनंद झाला. तिने त्याला सल्ला दिला की त्यांच्या शाळेत संगीत शिक्षकांचे स्थान रिक्त आहे तु लवकर अर्ज दे. हे ऐकून रागेश खूष झाला आणि लगेच लिहून देतो. ज्या मुलांना संगीताची आवड आहे अशा मुलांच यशस्वी गायक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, बालपणातील कडूपणा विसरून त्याचे संपूर्ण आयुष्य मुलांना संगीत शिकण्यास समर्पित केले.                


Rate this content
Log in