Rashmi Nair

Others

2  

Rashmi Nair

Others

लबाड मुले

लबाड मुले

3 mins
656


  कार्तिक आणि अश्विनी दोघेही भावंड एकाच शाळेत शिकायला जायचे . दोघांनाही नृत्याची खूप आवड होती. त्याचा छंद पाहून शाळेतील शिक्षकाने वार्षिक उत्सवासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नृत्यात इतर मुलांसह त्या दोघांच नाव देखील लिहिले .दुसरया दिवशी सगळ्यांना प्रत्येकाला हजार रुपये आणण्यास सांगितले. शाळा सुटल्यावर दोघे भाऊ-बहिण घरी पळत सुटले.

       घरी आल्यावर दोघांनीही त्यांची आई संजीवनीशी बोलायला सुरवात केली.. तीने त्यांना समजावून सांगितले की हे, बघा, तुम्ही दोघेही नृत्यात भाग घेत आहात, हे चांगले आहे पण बाळा, त्यासाठी हजार रुपये देणे फार अवघड आहे. आपण खूप गरीब आहोत, आपल्याकडे इतके पैसे नाहीत. वडिलांना विचार. जर ते देऊ शकत असतील तर तुम्ही नृत्यात भाग घेऊ शकता.

     संध्याकाळी पापा घरी येऊन जेवण झाल्यावर दोघे भावंड एकमेकांशी बोलू लागले. ". बहीण भावाशी बोलते ,भाऊ बहिणीला बोलतो "तू बोल" पण दोघीही पप्पाला घबरत असल्यामुळे बोलत नाहीत. हे पाहून यशवंतने संजीवनीला विचारले, मग तीने संपूर्ण कहाणी सांगितली. यशवंतने सर्व गोष्टी जाणून घेतल्यावर आपला निर्णय घेतला. "तुमच्यापैकी कोणीही नृत्यात भाग घेणार नाही. अभ्यासाकडे लक्ष द्या. ते उपयोगी पडेल , हे नृत्य काही कामाचं नाही. ऐकून दोघांनी एकत्र बोलले " नाही पप्पा , आम्ही खूप अभ्यास करतो या पुढे पण अभ्यास करणार आणि आम्हालाही नृत्यात पण सहभागी व्हायचं आहे. " पण यशवंत सहमत नव्हता. दोघांनीही खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच काही यशवंताने ऐकल नाही. तो उठुन झोपायला गेला. हे दोघेही रडू लागले. ते दोघेही रडत रडतच झोपले.

   संजीवनीने नंतर त्याला समजावल. दुसर्‍या दिवशी यशवंतला पण आपल्या मुलांवर दया आली आणि त्या दोघांना बोलवून घेतले आणि शाळेत जाताना एक हजार रुपये दिले, दोघेही मोठ्या आनंदाने शाळेत गेले.

                                                               

     वर्गात गेल्यावर कार्तिकला समजले की त्याच्या मित्राच्या पप्पाने त्याला पैसे दिले नाहीत, म्हणून तो नृत्यात भाग घेणार नाही. कार्तिकने विचार केला, तो भाग घेत नाही, तर मीही घेत नाही. तो त्याच्या मित्रला नृत्यात भाग घेताना पाहून तो पण भाग घेण्यास तयार झाला. या दोघांना पाहुन अश्विनीपण तयार झाली . अर्ध्या सुट्टीत तो आपल्या बहिणीला भेटला आणि म्हणाला की जर " तुला भाग घ्यायच असेल तर तु घे मी स्वत: भाग घेणार नाही." हे ऐकल्यावर अश्विनी म्हणाली, "तू भाग का घेत नाहीस?" कार्तिक म्हणाला "कारण माझा मित्र सहभागी होत नाही." हे ऐकुन अश्विनी म्हणाली, "मग मी एकटीच राहणार आहे. पापा मला एकटीला भाग घेऊ देणार नाहीत. म्हणून मी पण भाग घेत नाही. " तीचे उत्तर ऐकून कार्तिक म्हणाला, "ठीक आहे, शिक्षकांशी बोलून आपण दोघांचेही नाव रद्द करतो " असे म्हणुन तो त्याच्या वर्गात गेला.

        संध्याकाळी वडील घरी आल्यानंतर कार्तिकने सर्व पैसे वडिलांकडे परत केले आणि म्हणाला, "बाबा, हे पैसे परत घ्या. मी नृत्यात भाग घेत नाही."

यशवंतने विचारले "काय झाले? काल तू खूप रडत होता, मी माझा अभ्यास चांगला करेन. मला भाग घ्यायच आहे.तुला पैसे पण दिले आज काय झाले?"

तो म्हणाला, "पपा तो माझा मित्र आहे न , तो भाग घेत नाही"

 "तो सहभागी कां होत नाही?" यशवंतने विचारले

"त्याच्या पापांनी त्याला पैसे दिले नाहीत" कार्तिक म्हणाला.

"कां दिले नाही? ते लोक आमच्यासारखे गरीब नाहीत तर दररोज त्याचे वडिल त्याला शाळेत सोडण्यासाठी गाडी घेऊन येतात." यशवंतने विचारले.

"मला माहित नाही" कार्तिक म्हणाला.

"त्याला जाऊ दे, पण तुला काय झाले, तुला भाग घ्यायच होते, आपल्या नावांसोबत आपल्या बहिणीचे नाव पण कां काढले त्याच्यामुळे? तुम्हां दोघांना भाग घेण्यासाठी पैसेपण दिले? तुम्ही भाग का घेतला नाही?"

तो काहीच न बोलता शांत बसला.

आपल्या मुलाकडून उत्तर न मिळाल्यामुळे यशवंत खूप चिडला.

बडिलांनी त्याच्याकडून पैसे घेतले आणि म्हणाले, " मी तुझा पप्पा असुन तुला नाही म्हाणालो तेव्हा तुला पटलं नाही .रडुन हट्ट करुन पैसे घेऊन गेला आणि मित्र भाग घेत नाही म्हणुन तु आता भाग घेत नाही . मुर्ख कुठला?  स्वताच तर नाव काढलच आणि बहिणीचे नावही तुझ्याबरोबर रद्द केल? लाज वाटत नाही "म्हणत रागाने कार्तिकला मारण्यासाठी हात उचलला एवढ्यात  संजीवनीने त्याचा हात पकडला . ती म्हणाली " जाऊ द्या आता तुमच्या मनासारखं झाल न दोघे नृत्यात भाग घेत नाही आणि पैसेपण परत घेऊन आले. "मुलाकडे वळुन रागाने म्हणाली " जर तुम्ही पुन्हा असे केले तर, पप्पा तर मारतीलच मी पण दोन-चार थोबाडीत मारीन " हे ऐकून कार्तिक घाबरला आणि कान धरुन म्हणाला " पप्पा आई माफ करा . पुन्हा असं कधीच करणार नाही "


                                    


Rate this content
Log in