Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Rashmi Nair

Others


5.0  

Rashmi Nair

Others


सासु आणि आई

सासु आणि आई

2 mins 570 2 mins 570

करिश्मा तिच्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला आली. खुप वर्षाने भेटली होती आणि रात्र पण खुप झाली होती. शैलीने एक दिवस तिच्या घरी रहण्यास आग्रह केला होता, म्हणुन ती राहली. तिचा तीन वर्षांचा मुलगा पिंटू फार लवकरच तीच्या बरोबर मिसळुन गेला होता. तिला सोडतच नव्हता. अचानक, फोनचा रिंगटोन ऐकु आला म्हणुन ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. आणि हॉलमध्ये येऊन फोन उचलला आणि व्हिडिओ कॉल पाहिला. तिच्या सासूने फोन केला होता. ती बाळाची चौकशी करण्यासाठी पूण्याहून फोन केला. तिला नातवाशी बोलायचे होते. सुनेने काहीही न बोलता फोनवर पिंटू फोन फोकस केला आणि पिंटुला मोठ्या डोळ्यांनी पाहून त्याला घाबरवल तो बिचारा घाबरुन आत पळाला.  हे पाहून सासुने फोन डिसकनेक्केट केला. ते पाहुन ती परत स्वयंपाक घरात गेली . करीश्मा हे पाहुन आश्चर्यचकित झाली.

     दुसर्‍या दिवशी सर्वजण न्याहारी करत होते, मग दुसरा कॉल आला. तोही एक व्हिडिओ कॉल होता, शैली आईला पाहुन आनंदाने फुलली. तिच्या बोलण्यावरून असे वाटले की तिच्या बाळाशी बोलू इच्छित असलेल्या तिच्या आईचा फोन होता. तिला थांबायला सांगुन, ती बेडरुममध्ये गेली. तो शांत झोपला होता, शैली एक क्षण पण वाया न घालवता झोपलेल्या बाळाला  उठवुन त्याच तोंड धुतले आणि मोठ्या प्रेमाने त्याला जवळ घेऊन आईशी गप्पा मारत बसली. त्याला फोन वर हे सांगायला लावलं "बोल बेटा, आजी,आय लव यु "

पिंटु पोपटासारखा बोलला . "आय लव यू" म्हणाला. हे ऐकून तीच्या आईला खूप आनंद झाला. प्रत्युत्तरादाखल, तीनेही तीच पुनरावृत्ती केली. त्यांच्यात संभाषण असेच चालू राहिले.

     करिश्मा , सासु आणि आईमध्ये इतका फरक पाहुन तिला आश्चर्यचकित झाली. पण ती गप्पच झाली . 


Rate this content
Log in