STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

उपमेलाच तुझी गरज

उपमेलाच तुझी गरज

2 mins
170

 खरचं काय लिहावं तुझ्या साठी...

सकाळपासून मनात विचार चालुच.. पण एक सांगु...त्या बरोबरच अमिताभ बच्चन चे गाणे पण कानात आणि मनात ऐकायला येत होते .. ते म्हणजे ...


जिसकी बिवी लंबी उसका भी बडा काम है... 🧍🏻‍♀️


आणि मग काय... लगेच स्क्रिन वर बोट चालु लागले... 


एक सांगु... तुझ्या👆🏼 वाढदिवसानिमित्त काय तुला उपमा द्यावी... अग ... उपमेलाच तुमची गरज...🤩


 खरचं...ग...👉🏼


👀 मृग नक्षत्राप्रमाणे लाभलेल्या तुझ्या सौंदर्याचं वर्णन माझ्यासारख्या पामरीने काय करावे..???


खरचं..तुमच्या त्या उंच..सडपातळ बांध्याच्या शरीरयष्टी वरील🧍🏻‍♀️🧍🏻‍♀️ मुखकमलावर असलेल्या त्या जग साठविणा-या उत्तुंग यशाची स्वप्ने पाहणा-या नेत्राबद्दल काय बोलावं...👁️


तु बोलताना तुझ्या गुलाबी 👄 ओठातुन निघणा-या प्रत्येक शब्दाची कीमंत काय करावी.. पण.. 

खरचं.. ग सखी.. ,👉🏼


या सर्वापेक्षा तुझ्या स्वच्छ,निःस्पृह, निर्मळ पाण्यासारखा मनाचा मोठेपणा तनाच्या प्रत्येक सौंदर्य शिल्पापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे....


👉🏼तुझी आणि माझी भेट काही क्षणाची पण भेट होताच ... मला अगदी माझ्या टाचा वर करुन तुला बोलावं लागलं हे पाहुन मी खुप आनंदले.. आणि हे असचं बोलले तर आपण दोघे अगदी मनमुराद हसलो... अगदी पहीली च भेट ...पण त्यात तु आपलेस केल..

 खरचं ... ग सखी.., 👉🏼

जरी तु ... आमच्या केंद्रातुन बदली करुन गेलीस तरीही आजच्या सगळ्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्ट वरुन असेच वाटते की....*


😍नलाचे ज्या प्रमाणे दमयंतीवर😍

😍श्रीकृष्णाचे ज्याप्रमाणे राधेवर😍

😍चंद्राचे ज्याप्रमाणे चांदण्यावर😍

😍भव-याचे ज्याप्रमाणे फुलावर😍 

👉🏼अगदी त्याचप्रमाणे👈🏼

😍आमचे तुझ्यावर... प्रेम आहे...🥰


नाही का... 🥰🥰


खरचं ग सखी... 👉🏼


तुला उपमा देण्यासाठी खुप प्रयत्न केला... पण तुझ्या अल्लड, हळवी, भरीव सौंदर्याला उपमा देण्यासाठी अख्ख्या शब्दकोशात शब्दच सापडत नाही....


खरचं ग सखी...👉🏼


🌙 *तुला चंद्राची उपमा द्यावी..

तर त्याला ही दाग आहे... 🌔


🌞 तुला सुर्याची उपमा द्यावी

तर त्याला ही तेज आहे..💥


🌹 तुला गुलाबाची उपमा द्यावी

तर त्याला ही काटे आहेत...🌵


खरचं ग सखी...., 👉🏼


तुला उपमेची नाही...

 

 तर ....

उपमेलाच तुमची गरज आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance