सुमनांजली बनसोडे

Romance

3.0  

सुमनांजली बनसोडे

Romance

शोधात किना-याच्या

शोधात किना-याच्या

1 min
1.2K


आज मी एकांत पारदर्शक मनाचे तुकडे जोडत होते... अस्वस्थ अश्रु धारा गाळुन ह्रदयावरच्या ओल्या जखमा धुऊन काढत होते... गार वारा तुझ्या आठवणींच्या रुपात येऊन त्या पाऊल वाटाकडे ओढत होता... तुझ्या आठवणीचे प्रतिक म्हणुन ठरलेल्या पाऊलवाटा..तिथे आणखी प्रांजळ मनाचा सुगंध दरवळत होता... केविल मुद्रेने आपल्या कडे पाहणा-या डोंगरद-या...

   तु माझ्या समवेत नाहीस म्हणुन त्यापण आता अधिकच केविलमुद्रेने पाहुन माझे सात्वंन करीत आहेत... त्या झाडाच्या छायेत येऊन मी स्तब्ध उभी आहे... 

फांद्यावरचा खोपा तिथेच होता.. त्यात राहणारी पाखरं मात्र दिसत नव्हती... 

मनाची अस्वस्थता पाहायला आपल्या तुझ्याविना.. ओसाड असलेल्या मिलन नगरीशिवाय कोणी नव्हती... 

    नयनातील अश्रुधाराचा प्रवाह वाढत होता... "भुतकाळातील ओल्या आठवणीत गुरफटत जाण्यापेक्षा भविष्यकाळातील सोनेरी स्वप्नात सतत रंग भरावे... त्यास आशावादी जगणे शिकवावे... हे तुझं वाक्य समोरच्या डोंगरद-यातुन तुझ्या मधुर आवाजात कानापाशी घुटमळत होते...

ह्रदयस्पर्शी ठरलेले तुझे हे वाक्य तुझ्या नितळ मनाची साक्षी देत होते .... जाता जाता माझ्याकडे सोपविलेले तुझे प्राजंळ मन मी ह्रदयात कोरुन ठेवले आहे.. त्यामुळे मला तुझी उणीव भासत नाही... 

पण, मला तुझा सहवास हवा होता .. कधीकधी वाटते तुझ्या सहवासा ऐवढे जीवन असते तर... 

   प्रश्नांच्या सागरात उतरल्यास त्यातील पाणी भेदरुन जीवघेणा खेळ खेळते... पण.. तुच... म्हटला होतास ना. प्रत्येक सागराला किनारा असतो... किना-याला प्रश्नांची उत्तरे असतात... तुझ्या ह्दयस्पर्शी वाक्या मुळेच आज मी तुझ्या वचनाची पूर्तता करणार आहे... प्रश्नांच्या सागरात चिंब भिजून किनारा शोधणार आहे..... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance